सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी-प्लुटोच्या नवपंचम योगामुळे मेहनतीचे फळ मिळेल. वडीलधाऱ्या मंडळींचे पाठबळ लाभेल. नोकरी-व्यवसायात सभेपुढे निडरपणे आपले मत मांडाल. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराल. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळवण्यासाठी त्यांच्या अटी मान्य कराव्या लागतील. जोडीदाराची स्थिती समजून त्याच्या समस्यांवर उपाय सुचवाल. भावनिक आधार द्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. पचन व उत्सर्जन संस्थेचे आरोग्य जपा.

वृषभ गुरू-चंद्राच्या केंद्र योगामुळे आलेल्या परिस्थितीवर व अडचणींवर मात करण्याची क्षमता वाढेल. अतिरिक्त खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक! बोलाल ते करून दाखवलेत तरच समाजात मानाचे स्थान मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार वागावे लागेल. सहकारी वर्गाची साथ मिळेल. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल. कौटुंबिक जबाबदारीचा भारचांगल्या प्रकारे पेलाल. ओटीपोटात दुखणे, श्वासाचे विकार त्रास देतील.

मिथुन चंद्र-मंगळाच्या प्रतियोगामुळे चंद्राच्या प्रयोगशीलतेला मंगळाच्या शक्तीची जोड मिळेल. तंत्रज्ञानासंबंधित क्षेत्रात प्रगती होईल. नोकरी-व्यवसायात व्यवहारकौशल्यामुळे अनेक फायदे पदरात पाडून घ्याल. सहकारी वर्गासह बोलणी करून त्यांचे प्रश्न समजून घ्याल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात अधिकच व्यग्र असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्यालाच पार पाडाव्या लागतील. हाडे, सांधे, मणका यांसंबंधी त्रास उद्भवतील. वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक!

कर्क चंद्र-नेपच्युनच्या युतीयोगामुळे अधिक भावनाशील व्हाल. इतरांचे बोलणे चटकन मनावर न घेता प्रथम त्यांचे म्हणणे समजून घ्यावे. नोकरी-व्यवसायात कर्तव्याला अधिक महत्त्व दिलेत तर प्रगतिपथावर वाटचाल कराल. सहकारी वर्गातील गरसमज दूर होतील. गायन-वादनासारख्या कलांमध्ये मन रमेल. ताणतणाव दूर कराल. घर व करिअर सांभाळताना जोडीदाराची धावपळ होईल. पाय दुखणे, पेटके येणे, अशक्तपणा जाणवणे हे सहन करावे लागेल.

सिंह चंद्र-हर्षलच्या युतीयोगामुळे आपले स्वतंत्र विचार बेधडकपणे मांडाल. चाकोरीबद्ध जगण्यापेक्षा थोडय़ा वेगळ्या वाटेने पुढे जाल. नोकरी-व्यवसायात नावीन्यपूर्ण गोष्टींचा अवलंब कराल. आíथक उन्नती होईल. येणी वसूल होतील. सहकारी वर्गाची  साथ लाभेल. जोडीदाराच्या कामात आपण मदत कराल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. एकमेकांशी चर्चा कराल. भावना समजून घ्याल. सांधेदुखी, मणक्याचे दुखणे, शीर दबणे असे त्रास सहन करावे लागतील.

कन्या बुध-शुक्राच्या युतीयोगामुळे वाचन, लेखन यांसारखे छंद जोपासाल. कला व बुद्धी यांचा सुंदर मिलाफ होईल. नोकरी-व्यवसायात बौद्धिक बळावर मुद्दा समर्थपणे मांडाल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदारासह मनमोकळा संवाद साधाल. कुटुंबात हलकाफुलका विनोद पेरून वातावरण ताजेतवाने ठेवाल. सर्दी, खोकल्याकडे दुर्लक्ष नको.

तूळ  मंगळ-नेपच्यूनच्या प्रतियोगामुळे भावनांवर ताबा ठेवणे कठीण होईल. समस्येचा अधिक विचार करण्यापेक्षा त्यावरील उपाय शोधणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात पूर्वी आखलेल्या योजना अमलात आणाल. सहकारी वर्गाला आवश्यक ती मदत कराल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल. जोडीदाराच्या मदतीने कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. लहान-मोठे प्रवास कराल. ग्रंथींना सूज येणे, रक्तस्राव होणे अशा त्रासांबाबत वैद्यकीय सल्ला घ्यावा.

वृश्चिक चंद्र-शुक्राच्या समसप्तम योगामुळे समोरच्या परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघाल. मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. नोकरी-व्यवसायात अधिकाराच्या पदावरूनही माणुसकीची जाण ठेवाल. गरजूंना मदत कराल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने मोठी जबाबदारी पार पाडाल. जोडीदारासह प्रवास योग संभवतो. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. काही प्रश्न अनुत्तरितच राहतील. त्यासाठी अजून थोडा काळ जाऊ द्या.

धनू चंद्र-गुरूच्या केंद्रयोगामुळे अडीअडचणींवर मात कराल. नोकरी-व्यवसायात योग्य निर्णय घेणे कठीण जाईल. सारासार विचार करून मगच नक्की करावे. सहकारी वर्गाकडून झालेल्या चुकांची किंमत आपल्याला मोजावी लागेल. जोडीदार आपली स्थिती समजून घेईल. खंबीरपणे पाठीशी उभा राहील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. एखादी लाभकारक घटना आशेचा किरण दाखवेल. अतिश्रमामुळे मांडय़ा भरून येणे, पचन मंदावणे हे त्रास उद्भवतील.

मकर चंद्र-बुधाच्या समसप्तम योगामुळे झटपट निर्णय घेऊन ते आचरणात आणाल. बऱ्याच लहान-मोठय़ा गोष्टी बारकाव्यांसह स्मरणात ठेवाल. नोकरी-व्यवसायात कल्पनाशक्ती पणाला लावाल. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. कामानिमित्त प्रवास कराल. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. आपापल्या कार्यक्षेत्रातील प्रश्नांवर एकमेकांसह मोकळी चर्चा कराल. कौटुंबिक समस्या शिस्तीपेक्षा प्रेमाने सोडवा. पचनकार्य सुधारा. योगाभ्यास फार उपयोगी पडेल.

कुंभ शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे किचकट कामे करताना चिकाटी दाखवाल. कुशलतेने जबाबदाऱ्या पार पाडाल. नोकरी-व्यवसायात साधकबाधक विचार करून लोकांच्या हिताचा निर्णय घ्याल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्ग कामाची चालढकल करेल. जोडीदाराची प्रगती होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल.  रागावर नियंत्रण ठेवाल. मान, खांदे, दंड दुखणे वा सुजणे असे त्रास संभवतात.

मीन गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे पूर्वापार चालत आलेल्या रूढींचे पालन कराल. अडल्या-नडलेल्यांना मदत कराल. नोकरी-व्यवसायात काही नव्या ओळखी होतील. मोठय़ा व्यक्तींचा सहवास लाभेल. यश, कीर्ती मिळवाल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. कुटुंबासाठी थोडी धावपळ करावी लागेल. मज्जासंस्थेचे आरोग्य जपा. वैद्यकीय सल्ला आवश्यक!