सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे अनावश्यक खर्च वाढेल. कामात चिकाटी राखून ठेवणे आवश्यक! अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरी व्यवसायात धिम्या गतीने प्रगती कराल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. सहकारी वर्गाला भावनिकदृष्टय़ा आधार द्याल. त्यांची मने जिंकाल. जोडीदारासह वाद न घालता एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. पोटाच्या तक्रारी वाढतील. वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील. सात्विक आहार घ्यावा.

वृषभ चंद्र-शुक्राच्या केंद्रयोगामुळे कुटुंब सुख व गृहसौख्य चांगले मिळेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती कराल. आवडत्या छंदासाठी वेळ राखून ठेवाल. नोकरी-व्यवसायात मनाजोगते यश मिळवाल. वरिष्ठांच्या नव्या संकल्पना अमलात आणण्यासाठी बौद्धिक मेहनत घ्याल. सहकारी वर्गाला अडचणीत सहाय्य कराल. जोडीदारापासून दूर असलात तरी नात्यातील प्रेमात भर पडेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. लघवीची जळजळ झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मिथुन चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे कार्यपूर्तीसाठी विविध उपाय योजाल. नेहमी प्रयत्नशील राहाल. अचानक नव्या जबाबदारीचा स्वीकार करावा लागेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. सहकारी वर्गावर विसंबून राहू नका. आपसातील तंटे मोकळ्या चच्रेने मिटवाल. जोडीदाराचे वेळापत्रक खूपच व्यस्त असेल. नातेवाईकांना सहाय्य कराल. निर्णय घेताना घाई नको. मणका व मूत्रिपडाचे आरोग्य जपा.

कर्क चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे व्यवहार कुशलतेने परिस्थिती हाताळाल. स्मरणशक्ती व कल्पनाशक्तीच्या जोरावर कामगिरी फत्ते कराल. नोकरी-व्यवसायात लेखी करार होतील. काळजीपूर्वक निरीक्षण उपयोगी पडेल. सहकारी वर्गाकडून कामे वेळेत करून घ्याल. जोडीदारासह जुळवून घ्यावे लागेल. एकमेकांना भावनिक आधार द्याल. कौटुंबिक वातावरण बरे राहील. नस आखडणे, शीर दबणे तसेच जखमेत पू होणे हे त्रास सहन करावे लागतील.

सिंह चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे खेळ, व्यायाम यांची आवड जोपासाल. ध्येय साध्य करण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवाल. नोकरी-व्यवसायात योग्य बाजी माराल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. सहकारी वर्ग कायद्याच्या कामात मदत करेल. आपली िहमत वाढवेल. लहान मोठे प्रवास कराल. जोडीदारासह जुळवून घ्याल. दोघे मिळून नातेवाईकांना सहाय्य कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. रक्ताभिसरण संस्थेत बिघाड झाल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत.

कन्या चंद्र-गुरूच्या प्रतियोगामुळे बौद्धिक शक्तीचा योग्य वापर कराल. नावलौकिक वाढेल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचे मत पटवून घ्याल. त्यांच्या म्हणण्यानुसार अंमलबजावणी कराल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदाराच्या अडचणी समजून घ्याव्या लागतील. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्यात जास्त ऊर्जा खर्ची पडेल. डोकं शांत ठेवा. सूज येणे, पू होणे अशा तक्रारी सतावतील.

तूळ चंद्र-नेपच्युनच्या नवपंचम योगामुळे बुद्धिमत्तेला कलात्मकतेची जोड मिळेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. नोकरी-व्यवसायात यश मिळवाल. धीराने अडचणींवर मात कराल. वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सहकारी वर्गाकडून योग्य प्रकारे कामे करवून घ्याल. जोडीदारासह बोलताना शब्द तोलून मापून वापरा. गरसमज टाळा. कौटुंबिक पातळीवर नवे आव्हान पेलाल. दंड व खांदे यांच्या शिरा आखडल्यास अंगावर काढू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट!

वृश्चिक चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे वाक्चातुर्याची झलक दाखवाल. आíथक घटकांचा पूर्वविचार कराल. नोकरी-व्यवसायात कामानिमित्त देशी-विदेशी प्रवास करावा लागेल. वरिष्ठांचे सहाय्य मिळेल. सहकारी वर्गासह वाद न घालता त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाईल. नवे चांगले अनुभव गाठीशी बांधाल. नातेवाईक व कुटुंबीयांच्या गाठीभेटी होतील. रक्तदोष वा कोरडेपणामुळे त्वचेला इंफेक्शन होईल. ताबडतोब औषधोपचार घ्यावा.

धनू चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे सात्त्विक गुणांना पोषक वातावरण मिळेल. विद्य्ोच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे गुण लक्षात घेऊन ते स्वत:मध्ये अंगीकाराल. त्यांच्या अनुभवातून मौलिक धडे मिळतील. सहकारी वर्ग मदतीचा हात पुढे करेल. मित्रमंडळींसह वेळ आनंदात जाईल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. शंका-कुशंकांना मुळीच थारा देऊ नका. ओटीपोट, मणका व उत्सर्जन संस्था यांचे आरोग्य जपावे.

मकर रवी-चंद्राच्या षडाष्टक योगामुळे आचार व विचारात भिन्नता आढळेल. शांत डोक्याने विचार करून मत मांडा. नोकरी-व्यवसायात थोडे झगडून यश प्राप्त करावे लागेल. स्वत:ला सिद्ध करताना इतरांना कमी लेखू नका. सहकारी वर्गाची साथ मिळेलच असे गृहीत धरू नये. जोडीदार आपली परिस्थिती नीट समजून घेईल. वैचारिक देवाणघेवाण कराल. कौटुंबिक समस्या सोडवताना सर्वाचा विचार कराल. अंतस्रावी ग्रंथींच्या कार्यात बिघाड होण्याची शक्यता भासते.

कुंभ चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे भावनांवर विचारांचा ताबा मिळवाल. हातून चांगले लेखन होईल. नोकरी-व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांचे पाठबळ मिळवाल. सहकारी वर्गाला, मित्रमंडळींना योग्य मार्गदर्शन कराल. जोडीदाराची उन्नती होईल. लहान-मोठे प्रश्न चच्रेने सोडवाल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. शुभ समारंभात नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. धाप वा श्वासाचा त्रास झाल्यास प्राणायाम व इतर हलका व्यायाम आवश्यक!

मीन रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे मानसिक समाधान मिळेल. थोडय़ा फार प्रयत्नांनी यश मिळाले तरी पुढचे श्रम थांबवू नका. नोकरी-व्यवसायात कामामध्ये सातत्य ठेवा. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्ग सोपवलेल्या कामात दिरंगाई करतील. जोडीदारासह वाद नको. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. हृदय व मणक्याचे आरोग्य जपा. आहारावर नियंत्रण आवश्यक!