01vijay1मेष परिस्थिती फारशी अनुकूल नाही. ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ असा पवित्रा तुम्ही ठेवलात तर त्याचा निश्चित उपयोग होईल. व्यापार-उद्योगात बाजारातील चढउतार आणि स्पर्धकांची तयारी याकडे लक्ष ठेवले तर तुम्हाला धनप्राप्तीचा एखादा मार्ग मिळू शकेल. तुमचे विचार गुप्त ठेवा. नोकरीमध्ये तुमची एखादी अडचण वरिष्ठ समजून घेतील. ‘हेही नसे थोडके’ असा तुमच्या मनात विचार येईल. घरगुती कार्यक्रमात पसे खर्च होतील. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा ‘प्रयत्नांती परमेश्वर’ असे मानणारी तुमची रास आहे. या आठवडय़ात तुमचे उद्दिष्ट गाठणे या एकाच गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. व्यापार-उद्योगात पशाची थोडीफार तंगी असेल. पण तुमचे हितचिंतक आणि आíथक संस्था तुम्हाला मदत करण्याची तयारी दर्शवतील. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे श्रेय लगेच मिळणार नाही. घरामधला माहोल मौजमजेचा असेल. आवश्यक आणि चनीच्या वस्तूची खरेदी होईल.

मिथुन तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. त्यासाठी कंबर कसून तयार राहा. व्यापार-उद्योगातील कामात अनावश्यक खर्च कमी झाल्याने मनावरचा तणाव कमी होईल. नवीन नोकरीच्या कामात विलंब झाला असेल तर त्यामध्ये प्रगती दिसू लागेल. चालू नोकरीमध्ये अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याकडे तुमचे लक्ष असेल. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या वागण्या-बोलण्यामुळे किंवा प्रकृतिस्वास्थ्यामुळे चिंता निर्माण झाली असेल तर ती कमी होईल.

कर्क प्रत्येक काम पूर्ण करताना स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, याची तुम्हाला आठवण येईल. सभोवतालच्या व्यक्तींना खूश ठेवून त्यांच्याकडून एखादे काम पूर्ण करून घेण्यासाठी बरीच यातायात करावी लागेल. व्यापार-उद्योगात मालाची विक्री आणि फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता मध्यस्थांचा आणि प्रसिद्धीमाध्यमांचा उपयोग करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर जास्त अवलंबून राहू नका. शक्यतो शारीरिक दगदगीची कामे टाळा.

सिंह ग्रहमान तुम्हाला अनुकूल आहे. त्यांच्या जोरावर तुम्हाला आता पुढील मजल मारायची आहे. व्यापार-उद्योगात महत्त्वाच्या कामांना गती देण्यासाठी पूर्वीच्या ओळखी आणि हितचिंतकांकडून तुम्हाला मदत मिळेल. सप्ताहाचा प्रारंभ आणि शेवट लाभदायक ठरेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वगुणांचा आणि उत्साहाचा संस्थेला आणि सहकाऱ्यांना जास्त उपयोग होईल. घरामध्ये एखादा मेळावा किंवा शुभसमारंभ यामुळे वेळ मजेत जाईल. छोटा प्रवास घडेल.

कन्या ‘इच्छा आहे तेथे मार्ग आहे’ हे तुम्ही बोलून नव्हे तर कृतीने सिद्ध करून दाखवाल. व्यापार-उद्योगात थोडीशी विश्रांती घ्यायची आणि आरामात काम करायचे तुम्ही ठरवाल. पण एखादे नवीन काम मिळाल्याने तुमच्यातील पशाचे आकर्षण पुन्हा एकदा जागृत होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना एकत्र आणण्यासाठी एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन कराल.

तूळ गेल्या एक-दोन आठवडय़ांत एखाद्या कामात असमाधान निर्माण झाले असेल तर ते काम हातात घेऊन मार्गी लावणे हेच तुमच्यापुढील उद्दिष्ट असेल. जे आपल्याजवळ आहे त्याचा फायदा कसा घेता येईल याचा विचार करा.  कारखानदारांना कामाचा वेग वाढविण्यासाठी जादा गुंतवणूक करणे भाग पडेल. आíथक बाजू थोडीशी सुधारेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. घरामध्ये पूर्वी ठरलेला समारंभ पार पडेल.

वृश्चिक एखाद्या लांबलेल्या कामात गती आल्याने तुमचा जीव भांडय़ात पडेल. व्यापार-उद्योगात फायदा आणि उलाढाल वाढविण्याकरिता सध्याच्या कार्यपद्धतीत थोडेसे फेरबदल करावेसे वाटतील. त्यासाठी योग्य ते नियोजन कराल. एखादे काम पूर्ण करण्याकरिता छोटासा प्रवास करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अवघड कामावर तुमची नेमणूक करतील. घरामध्ये एकाच आठवडय़ात विविध प्रकारचे कार्यक्रम असल्यामुळे वेळ कसा गेला हे तुम्हाला समजणार नाही.

धनू आठवडय़ाची सुरुवात दमदार होईल. भेटीगाठीवर जी कामे अवलंबून आहेत त्या कामांना मुहूर्त लाभेल. व्यापार-उद्योगात काही नवीन कामे मिळण्याचा संकेत मिळेल. त्यावर ठोस निर्णय घेण्यापूर्वी त्यातील आकडेमोड नीट समजून घ्या. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून मदत होईल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा वेग वाढविण्याकरिता सहकाऱ्यांच्या दाढीला हात लावावा लागेल. घरामध्ये एखादा निर्णय लांबला असेल तर त्यामध्ये सर्वानुमते तोडगा निघेल.

मकर धनस्थानातील मंगळ अनुकूल असल्याने तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. व्यवसाय-उद्योगात धनप्राप्ती मनासारखी असेल. नोकरीमध्ये आपणहून जी जबाबदारी स्वीकारली आहे, ती थोडीशी त्रासदायक ठरेल. तुमच्याकडून कामात थोडा आळस होण्याची शक्यता आहे. घरामध्ये खास कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या-जाणाऱ्याचे स्वागत करावे लागेल. त्याकरिता थोडा वेळ आणि पसे राखून ठेवा. नातेवाईकांसमवेत मनोरंजन कार्यक्रमात आंनदाने सहभागी व्हाल.

कुंभ जरी अडथळे असले तरी त्यावर तुम्ही हिकमतीने मार्ग शोधून काढाल. त्याच त्याच कार्यपद्धतीत थोडासा बदल करायचे ठरवाल. व्यापार-उद्योगात कार्यक्षमता आणि कामाचा दर्जा वाढविण्याकरिता नवीन गुंतवणूक करावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी बदली किंवा कामाच्या स्वरूपात फेरफार हवे असतील तर वरिष्ठांकडे मागणी जरूर करा, पण त्यापूर्वी नवीन कामाचा अंदाज घ्या. घरामध्ये सर्व काही चांगले असेल, पण तुमची हुकूमशाही इतरांना आवडणार नाही.

मीन प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडावी यासाठी काहीही करण्याची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात उलाढाल अणि प्राप्तीचे प्रमाण वाढविण्याकरिता आवश्यक भांडवलाची तरतूद करा. नोकरीमध्ये चांगल्या प्रोजेक्टकरिता तुमची निवड होईल. त्यामुळे कष्ट वाढतील, पण पसेही जास्त मिळतील. घरामध्ये एखादा छोटेखानी समारंभ पार पडेल. त्यामध्ये तुम्ही उत्सवमूर्ती बनाल. सामूहिक कार्यक्रमाची आणि मनोरंजनाची तुमची इच्छा पूर्ण होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com