मेष यश मिळाले की माणसाला सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या वाटतात. या आठवडय़ात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार करून मगच निर्णय घ्या. व्यापार उद्योगात हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. नोकरीमध्ये हाताखालच्या व्यक्तीने केलेले काम तपासून पाहिल्याशिवाय वरिष्ठांसमोर ठेवूनका.  घरामध्ये बुजुर्ग व्यक्तीचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल. प्रिय व्यक्तीशी रुसवेफुगवे होतील.

वृषभ पशाविषयी तुम्हाला जबरदस्त आकर्षण असते. त्याकरिता काहीही करण्याची तुमची तयारी असते. व्यापारउद्योगात किरकोळ काम करत बसण्यापेक्षा एक मोठा हात मारावा याचा मोह होईल पण तो खरा नव्हे. त्यापेक्षा चालू असलेले काम व्यवस्थितपणे उरका. नोकरीमध्ये तुमच्या कामात तुम्ही काटेकोरपणे राहणे चांगले. वरिष्ठांशी कोणत्याही मुद्दय़ावर हुज्जत घालू नका. घरामध्ये  सगळ्यांशी संबंध सलोख्याचे ठेवा.

मिथुन ग्रहमान थोडासा चकवा निर्माण करणारे आहे. त्यामुळे स्वप्न न बघता तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. व्यापारउद्योगात नवीन काम स्वीकारताना त्यातील संभाव्य धोके समजून घ्या. पशाची गुंतवणूक करण्यापूर्वी निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. घरामध्ये एखादा नवीन हितसंबंध जोडला जाण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने तुम्ही काही चांगले बेत ठरवाल. विद्यार्थ्यांनी घोकंपट्टीवर विश्वास ठेवूनये.

कर्क ग्रहमान तुम्हाला विचार करायला लावणारे आहे. प्रत्येक निर्णय घेताना इकडे आड तिकडे विहीर अशी तुमची परिस्थिती असेल. व्यापार-उद्योगात कोणताही निर्णय निश्चित करण्यापूर्वी त्याचे भविष्यात काय परिणाम होतील, याचा नीट विचार करा. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना त्यासंबंधी सर्व माहिती मिळवा. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामाच्या निमित्ताने सहकाऱ्यांचा चेहरा आणि मुखवटा यातील भेद लक्षात येईल.

सिंह एखाद्या व्यक्तीवर तुम्ही जेव्हा विश्वास टाकता तेव्हा व्यवहार बाजूला ठेवता. या तुमच्या स्वभावामुळे तुमचीच कधी-कधी फसवणूक होते. या आठवडय़ात याबाबतीत काळजी घ्या. व्यापारउद्योगात एखाद्या मुद्दय़ावरून भागीदाराशी गरसमज होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी ऐकावे जनाचे करावे मनाचे हा कानमंत्र लक्षात ठेवा. घरामध्ये काही तात्त्विक मुद्दय़ावरून जोडीदाराशी मतभेद होतील.

कन्या ग्रहमान असे दर्शविते की मनाने तुम्हाला काम करण्याची खूप उभारी असेल, पण त्यातील यश शरीरस्वास्थ्यावर अवलंबून असेल. त्यामुळे प्रकृतीकडे पहिल्यांदा लक्ष द्या. व्यापारउद्योगात तुमची थोडीशी गरसोय होईल.  नोकरीच्या ठिकाणी कामाला गती देण्यासाठी धक्का स्टार्ट पद्धतीने काम करावे लागेल. सहकाऱ्यांना आमिष दाखवावे लागेल. घरामध्ये सर्वजण तुमच्या सल्ल्याप्रमाणे वागणार नाहीत.

तूळ एखादी गोष्ट मिळाली की माणसाची हाव वाढत जाते त्यानुसार या आठवडय़ात तुम्हाला जे मिळालेले आहे त्यावर समाधान वाटणार नाही. व्यापारउद्योगात अनोळखी व्यक्तींवर एकदम विश्वास टाकू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खूश करण्याकरिता बढाया मारल्यात तर तुमचेच काम वाढेल. हातात घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय इतर गोष्टीत लक्ष घालू नका. घरामध्ये  एखाद्या व्यक्तीशी समजुतीचा घोटाळा होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक ग्रहमान तुम्हाला कोडय़ात टाकणारे आहे. ज्या कामापासून तुम्ही लांब जात होता ते काम करायला लागल्यामुळे तुमची चिडचिड होईल. व्यापारात कामाच्या मानाने पसे कमी मिळतील. छोटय़ा-मोठय़ा सुधारणा करून तुमच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना नेमके काय पाहिजे आहे ते समजणे कठीण होईल. तुमच्या शंकेचे वेळीच निरसन करून घ्या.

धनू ग्रहमान मृगजळ निर्माण करणारे आहे. ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून आहात त्या व्यक्ती आयत्यावेळेला त्यांचा शब्द फिरवतील. नोकरीमध्ये कामाची नीट पाहणी केल्याशिवाय वरिष्ठांना होकार देऊ नका. नाहीतर तुम्हीच तुमच्या शब्दामध्ये अडकाल. नवीन नोकरी स्वीकारण्यापूर्वी ज्या संस्थेमध्ये तुम्ही जाणार आहात त्याची माहिती काढा. घरामध्ये तुमचा सल्ला चांगला असूनही इतरांना तो पटणार नाही, याचे तुम्हाला वाईट वाटेल.

मकर माणसाला एखादी गोष्ट मिळत गेली की त्याची हाव वाढत जाते. या आठवडय़ात सर्व काही चांगले असून एखादी स्वप्नमयी कल्पना तुम्हाला आकर्षति करेल. त्याचा थोडा पाठलाग केल्यावर असे लक्षात येईल हे मृगजळ आहे. व्यापारउद्योगात पशाच्या अतिमोहाने नको त्या व्यक्तींशी संगत धरू नका. नोकरीच्या ठिकाणी हातात घेतलेले काम पूर्ण झाल्याशिवाय घोषणा करू नका. घरामध्ये तुमच्या एखाद्या शब्दाने इतरांचा गरसमज होईल.

कुंभ उत्तम कल्पनाशक्ती आणि बौद्धिक क्षमता तुमच्या राशीला लाभलेली आहे. त्याचा चांगला वापर करता आल्याने तुम्ही या आठवडय़ात खूश असाल. व्यापारउद्योगात कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे याचे नीट नियोजन करा. आठवडय़ाच्या शेवटी अचानक लाभ संभवतो. नोकरीच्या ठिकाणी कर्तव्य श्रेष्ठ की मौजमजा असा प्रश्न येईल. घरामध्ये एखादी स्वप्नाळू कल्पना सगळ्यांना दंग ठेवेल.

मीन ग्रहमान असे सुचविते की ज्या प्रमाणात तुम्ही कष्ट कराल त्या प्रमाणात तुम्हाला फळ मिळेल. व्यापारउद्योगात अनोळखी व्यक्तींशी पशाचे व्यवहार करण्यापूर्वी त्यांची नीट माहिती काढा. नोकरीच्या ठिकाणी अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या कामात लक्ष घाला. संस्थेच्या राजकारणात भाग न घेणे चांगले. घरामध्ये छोटय़ा मोठय़ा कारणावरून तुमचे वादविवाद होतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com