News Flash

दि. १६ ते २२ नोव्हेंबर २०१८

जुनी देणी आळस न करता वेळेत देऊन टाका.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मेष मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला आनंदाने काम करायचे असेल तर त्यासाठी शरीर भक्कम असायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. व्यवसाय-उद्योगात पशाचा ओघ चालू असेल. जुनी देणी आळस न करता वेळेत देऊन टाका. नोकरीच्या कामात अतिआत्मविश्वास टाळा. वरिष्ठांच्या सूचना शांतपणे ऐकून घेऊन कामाला सुरुवात करा. घरामध्ये माझे तेच खरे असा दृष्टिकोन न ठेवता इतरांचे म्हणणे ऐका.

वृषभ प्रतिकूल परिस्थितीत माणसाच्या निश्चयी स्वभावाची खरी परीक्षा होते. याची चुणूक तुम्ही इतरांना दाखवून द्याल. एखादे अवघड काम मार्गी लावण्यासाठी कंबर कसून सिद्ध व्हाल. व्यापार-उद्योगात छोटय़ाछोटय़ा कामातून जास्त पसे मिळवा. स्पर्धकांची तुलना करून त्रास करून घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या स्वरूपात लहान-मोठे बदल होण्याची शक्यता आहे. घरामध्ये तुम्ही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही.

मिथुन तुमचा मानसिक उत्साह खूप असेल. परंतु यश मिळविण्याकरिता तुम्हाला मनाचा निर्धार करणे आवश्यक आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले तर तुमच्या कामात खंड पडू शकेल. व्यापार-उद्योगात नवीन काम स्वीकारा. त्यापूर्वी त्यातील अटी आणि शर्तीचा अभ्यास करा. पशाचे प्रमाण यथातथा राहील. नोकरीच्या ठिकाणी इतरांना न जमलेली कामे वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील घरामधील जबाबदाऱ्या वाढतील.

कर्क ग्रहस्थिती संमिश्र आहे. प्रत्येक गोष्ट मिळविण्याकरिता तुम्हाला कष्ट पडतील. व्यापार-उद्योगातील स्पर्धा तीव्र होईल. भविष्यातील  प्रगतीकरिता तुम्हाला वेगळी पद्धत शोधावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन तुम्हाला विशेष उपयोगी पडेल. बेकार व्यक्तींना बऱ्याच प्रयत्नांनंतर छोटे-मोठे काम मिळेल. घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा प्रसंग साजरा होईल. ही बाब खर्चीक असेल.

सिंह तुमचे घर आणि करिअर या दोन्ही गोष्टींना महत्त्व आल्यामुळे तुमची बरीच धावपळ होईल. कोणत्या कामाला किती प्राधान्य द्यायचे हे नीट ठरवा. व्यापार-उद्योगात जे काम तुम्हाला भविष्यात करायचे आहे, त्याच्यासंबंधी निष्णात व्यक्तीशी सल्लामसलत कराल. नोकरदार व्यक्ती त्यांचे कष्ट वाढविण्यासाठी वरिष्ठांच्या हो ला हो म्हणतील. घरामध्ये बऱ्याच दिवसांनंतर छोटासा कार्यक्रम ठरेल. या कार्यक्रमात तुमचा पुढाकार असेल.

कन्या ग्रहमान संमिश्र आहे. एखादे काम तुम्ही करायला घ्याल, पण त्यातील अडथळे पाहिल्यानंतर तुमचे मनोधर्य क्षणभर कमी होईल. अशा वेळी हितचिंतकांकडून तुम्हाला मदत होईल. नोकरीच्या ठिकाणी जे काम अवघड आहे ते काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. व्यापारीवर्गाला आठवडय़ाची सुरुवात चांगली आहे. घरामध्ये दीर्घकाळानंतर एखादी वंदनीय व्यक्ती हजेरी लावेल. त्या व्यक्तीचे विचार ऐकून तुम्ही प्रभावित व्हाल.

तूळ व्यापार-उद्योगात संपूर्ण आठवडा प्रचंड धावपळीत जाईल. ज्या कामात तुम्ही जाणूनबुजून आळस केला होता ते पूर्ण करण्याकरिता गिऱ्हाईक आग्रह धरतील. जुनी देणी द्यावी लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता मान-पाठ एक करावी लागेल. बेकारांना काम मिळविण्याकरिता तत्त्वांशी थोडी तडजोड करावी लागेल. घरामध्ये इतरांचा मान राखण्याकरिता इच्छा-आकांक्षेवर मुरड घालावी लागेल. तब्येत सांभाळावी.

वृश्चिक व्यापार-उद्योगात घेतलेले कर्ज परत करावे लागेल. काही अनावश्यक खर्च उपटल्यामुळे तुम्हाला थोडासा तणाव जाणवेल. घरामधल्या व्यक्ती जे चांगले काम तुम्ही केले आहे ते विसरून जातील आणि चुकांवर बोट ठेवतील. त्याचा राग येऊन त्यांचा अपमान कराल. नोकरीमध्ये कामाचा डोंगर असेल. त्यामुळे तुम्हाला स्वत:कडे लक्ष द्यावे लागेल. ज्यांना रक्तदाब, हृदयविकार आहे त्यांनी काळजी घ्यावी.

धनू एकेकाळी चांगल्या वाटणाऱ्या  गोष्टींमध्ये गुंतागुंत झाल्यामुळे आता काय करायचे असा तुमच्यापुढे प्रश्न असेल. तुमचे हितचिंतक तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतील. व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण थोडेसे कमी होईल. त्यामुळे पशासंबंधी चिंता राहील, पण आयत्या वेळी पसे मिळतील. नोकरीच्या ठिकाणी आपण बरे, आपले काम बरे असा दृष्टिकोन ठेवा. घरामध्ये तुमचे म्हणणे योग्य असूनही कोणालाही पटणार नाही.

मकर लक्ष्मीचा आदर करणे या तुमच्या स्वभावानुसार काम छोटे असू दे किंवा मोठे त्यातून कमाई होणार असेल तर तुम्ही ते स्वीकारता. या आठवडय़ामध्ये एखादे जुने काम नव्या रूपाने मिळेल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता कदाचित प्रवास करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी छोटय़ा प्रोजेक्टच्या निमित्ताने विशेष सवलतींकरिता तुमची निवड केली जाईल. घरामध्ये लहान-मोठय़ा व्यक्तींचे लाड कराल.

कुंभ एखादी गोष्ट मनात आणल्यावर ती केल्याशिवाय तुम्हाला चन पडणार नाही. व्यापार-उद्योगात ज्यांनी एकेकाळी नकारघंटा ऐकविली होती त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल. बँक अथवा इतर मार्गाने पसे उभे करता येतील. नोकरीमध्ये पूर्वी जादा काम केले असेल तर त्याचा मोबदला हातात पडेल. त्यामुळे केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटेल. घरामध्ये नातेवाईकांसोबत वेळ कसा गेला हे समजणार नाही.

मीन प्रत्येक कामात तुम्ही पुढाकार घ्याल.  आनंदी स्वभावाचा फायदा मिळेल. व्यापारीवर्गाला एखादा नवीन प्रोजेक्ट हाती घ्यावासा वाटेल. त्याकरिता आवश्यक भांडवलाची जुळवाजुळव करावीशी वाटेल. नोकरीच्या ठिकाणी एखादे अवघड काम हातात घ्याल. ते काम पूर्ण करण्याकरिता वरिष्ठांचे मार्गदर्शन विशेष उपयोगी पडेल. नवीन नोकरीच्या शोधासंबंधी घरात गुप्तता पाळावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2018 1:01 am

Web Title: astrology 16 to 22 november 2018
Next Stories
1 भविष्य : दि. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१८
2 भविष्य : दि. १९ ते २५ ऑक्टोबर २०१८
3 भविष्य : दि. १२ ते १८ ऑक्टोबर २०१८
Just Now!
X