News Flash

दि. १६ ते २२ जून २०१७

घरामध्ये सर्व काही चांगले असेल. तुमची एखादी इच्छा पूर्ण करून घ्याल.

राशिचक्र

01vijay1मेष ग्रहमान कोडय़ात टाकणारे आहे. जुन्या प्रश्नावर पडदा पडला असे समजून नवीन प्रश्नात लक्ष घालाल. पण पुन्हा एकदा जुने प्रश्न डोके वर काढतील. व्यापार-उद्योगात नवीन कामे स्वीकारताना  आíथक आणि इतर कुवतीचा नीट विचार करा. नोकरीमध्ये कामाचा व्याप वाढेल. नवीन आणि जुनी अशी दोन्ही कामे हाताळताना अधिकाराचा वापर करावा लागेल. घरामध्ये सर्व काही चांगले असेल. तुमची एखादी इच्छा पूर्ण करून घ्याल.

वृषभ गेल्या पाच-सहा महिन्यांत चक्रावून टाकलेल्या प्रश्नामध्ये काही तरी मार्ग मिळाल्यामुळे तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल. तुमच्या दृष्टीने एखादे महत्त्वाचे आणि तातडीचे काम असेल तर ते मार्गी लावा. व्यवसाय-उद्योगात पूर्वीची काही येणी लांबली असतील तर ती वसूल करण्यासाठी जिभेवर साखर पेरावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामातून तुमचा फायदा आहे अशा कामांना तुम्ही प्राधान्य द्याल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये जुन्या प्रॉपर्टीसंबंधीचे प्रश्न हाताळले जातील. त्यामध्ये सबुरीने मार्ग निघेल.

मिथुन ज्या प्रश्नांना तुम्ही विसरून जाण्याचा प्रयत्न केला होता त्याची पुन्हा एकदा आठवण येईल. पण या वेळी तुम्ही मनाने खंबीर असाल. घाबरून न जाता येणाऱ्या प्रश्नांना मोठय़ा धीराने तोंड द्याल. व्यापारीवर्गाने स्पर्धकांच्या गोटात काय चालले आहे याची माहिती घेऊन त्यांचे बेत ठरवावे. आíथक बाजू जुनी वसुली झाल्यामुळे थोडीफार सुधारेल. नोकरीमध्ये मनाप्रमाणे काम करण्याचा तुमचा बेत असेल. त्यानुसार तुम्ही तुमचे वेळापत्रक आखून ठेवाल.

कर्क काहीही कारण नसताना जी कामे विनाकारण लांबलेली होती त्यांना गती देण्यासाठी तुम्ही सिद्ध व्हाल.  व्यापार-उद्योगात हातातले पसे जपून खर्च करा. सरकारी नियम आणि कायदेकानू यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. नोकरीमध्ये तुमची एखादी मागणी वरिष्ठांनी लांबवलेली असेल तर त्यांची त्यांना आठवण करून द्या. दैनंदिन कामाचा व्याप वाढेल. घरामध्ये सगळय़ांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील. त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल.

सिंह गेल्या तीन-चार महिन्यांत मागे पडलेल्या घरगुती गोष्टी किंवा व्यक्तिगत प्रश्न पुन्हा डोके वर काढतील. त्याचा सामना खंबीर मनाने कराल. व्यापार-उद्योगात ज्या पशाचा तुम्ही नाद सोडून दिला होता ते पसे हातात पडण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये एखादे अवघड काम सहकाऱ्यांना न जमल्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये जी गोष्ट इतरांना प्रेमाने समजणार नाही ती तुम्ही धाकाने समजून सांगाल.

कन्या ज्या कामांना गेल्या दोन-तीन महिन्यांपासून विनाकारण नाट लागला होता ती कामे हातावेगळी करण्याचा तुम्ही निश्चय कराल.  व्यापार-उद्योगात इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत हे दाखविण्याकरिता सनसनाटी निर्णय घ्याल, त्यामुळे भविष्यामध्ये आíथक फायदा वाढण्याची खात्री वाटेल. नोकरीमध्ये एखाद्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये निवड होईल. त्यानिमित्ताने तुम्हाला विशेष अधिकार आणि सवलती मिळतील. घरामध्ये तुम्ही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. एखादी दीर्घकाळची इच्छा पूर्ण होईल.

तूळ गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये तुम्हाला जे अनुभव आले होते त्यावरून तुमची काही मते निश्चित झाली असतील. त्याचा आता तुम्हाला सर्व ठिकाणी उपयोग होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यापार-उद्योगात चालू कामाव्यतिरिक्त काही तरी नवीन करावेसे वाटेल. जुन्या ओळखींचा उपयोग होईल. नोकरीमध्ये  वरिष्ठ त्यांच्या मतलबाकरिता खूश ठेवण्याचा प्रयत्न करतील. घरामध्ये लांबलेल्या कामांना मुहूर्त लाभल्यामुळे तुमचा जीव भांडय़ात पडेल.

वृश्चिक ग्रहमान संमिश्र आहे. प्रत्येक समस्येतून आपण काही तरी शिकतो त्याचा भविष्यात उपयोग होतो. याचा अनुभव येईल. व्यापारीवर्गाला नवीन हितसंबंध प्रस्थापित झाल्याने बरे वाटेल. पशाची तंगी सोडविण्याकरिता छोटे-मोठे कर्ज घ्यावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ दिलेले आश्वासन पाळणार नाहीत. पूर्ण होत आलेल्या कामामध्ये वेगळी कलाटणी मिळेल. घरामध्ये माझे तेच खरे असा दृष्टिकोन ठेवू नका. आनंद वाढविण्याकरिता थोडा वेळ व्यासंगात घालवा.

धनू सर्व गोष्टी स्थिरस्थावर झाल्या असे वाटून तुम्ही थोडेसे नििश्चत व्हाल. एवढय़ामध्ये छोटा-मोठा अडथळा निर्माण होईल. पण या आठवडय़ात तुमचे नतिक धर्य चांगले राहील. व्यापार-उद्योगातील पशाची आवक थोडीफार सुधारेल.  नोकरीमध्ये एखाद्या किचकट प्रोजेक्टमध्ये नाइलाजाने लक्ष घालावे लागेल. वरिष्ठ तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील.  घरामध्ये सर्व काही चांगले असेल.

मकर जी कामे काही तांत्रिक कारणांमुळे रखडलेली होती, त्या कामांना आता हळूहळू गती यायला सुरुवात होईल. या संधीचा ताबडतोब फायदा उठवा. राहिलेले पसे वसूल करण्याचा प्रयत्न करा. एखादे काम पूर्ण करण्याकरिता मध्यस्थाची मदत घ्यावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी कंटाळवाणे काम आटोक्यात आल्यामुळे बरे वाटेल. नवीन नोकरीच्या कामाला गती येईल. घरामध्ये तुमचे म्हणणे इतरांना पटायला वेळ लागेल. त्याचा राग मानू नका. एखादा घरगुती कार्यक्रम ठरल्यामुळे नातेवाईकांशी गाठीभेटी होतील.

कुंभ ग्रहमान महत्त्वाकांक्षा वाढविणारे आहे. थोडय़ा यशावर तुमचे समाधान होणार नाही. सभोवतालची परिस्थिती फारशी उत्तम नसल्यामुळे तुम्हाला टप्प्याटप्प्याने प्रगती करावी लागेल. व्यापार-उद्योगात जी कामे हातामध्ये आहेत ती पूर्ण करा. आणि वसुली करा. नवीन कामाच्या मागे धावून तुमची शक्ती खर्च करू नका. नोकरीमध्ये एखादे नवीन प्रोजेक्ट काही काळाकरिता लांबण्याची शक्यता आहे. घरामध्ये मुलांच्या प्रश्नावरती तोडगा शोधून काढाल.

मीन जे निर्णय तुम्ही भावनेच्या भरात घेत होता त्यातील वास्तव काय आहे हे आता तुमच्या लक्षात येईल.  व्यापार-उद्योगातील ज्या कामांमुळे दुर्लक्ष झाले होते ते काम आता तीन-चार महिने लांबेल. हातामध्ये पसे पडतील पण तुम्हाला ते अपुरेच वाटतील. नोकरीच्या ठिकाणी स्वत:चे काम पूर्ण केल्यानंतर वेळ मिळाला तर सहकाऱ्यांना मदत करा. घरामधल्या बारीकसारीक गोष्टींमध्ये तुम्हाला लक्ष द्यावे लागेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 1:01 am

Web Title: astrology 16th to 22nd june 2017
Next Stories
1 भविष्य : दि. ९ ते १५ जून २०१७
2 दि. २ ते ८ जून २०१७
3 भविष्य : दि. २६ मे ते १ जून २०१७
Just Now!
X