20 January 2018

News Flash

दि. १७ ते २३ मार्च २०१७

ग्रहमान संमिश्र आहे. आठवडय़ाची सुरुवात थोडीशी कंटाळवाणी होईल.

विजय केळकर | Updated: March 17, 2017 1:05 AM

राशिचक्र

01vijay1मोष ग्रहमान संमिश्र आहे. आठवडय़ाची सुरुवात थोडीशी कंटाळवाणी होईल. पण नंतर कामे जलदगतीने पुढे सरकू लागतील. व्यापारउद्योगातील महत्त्वाच्या कामांना गती देण्यासाठी छोटा प्रवास किंवा गाठीभेटी पार पाडाव्या लागतील. कालांतराने तुमचा फायदा होईल. नोकरीमध्ये एखादे किचकट काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. ते काम न कंटाळता तुम्ही पूर्ण केल्यामुळे त्यांना कौतुक वाटेल. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाची नांदी होईल.

वृषभ तुमच्यामध्ये अनेक कलागुण दडून राहिलेले असतात. त्याला जेव्हा वाव मिळतो तेव्हा तुम्ही खूश असता. या आठवडय़ात अशी एखादी संधी चालून येण्याची शक्यता आहे. व्यापारउद्योगात कामाचे प्रमाण थोडेसे कमी असल्यामुळे जाहिरात आणि प्रसिद्धी या गोष्टींमध्ये थोडासा वेळ आणि पसे खर्च कराल. नोकरीच्या ठिकाणी जादा काम करून जादा पसे मिळण्याची संधी मिळत असेल तर ती तुम्ही सोडणार नाही. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये ‘आधी कर्तव्य, मग मौजमजा’ असा क्रम असेल. सगळ्यांची मने सांभाळावी लागतील.

मिथुन कोणतीही गोष्ट सातत्याने करायला तुम्हाला आवडत नाही. त्याच त्याच कामाचा तुम्हाला कंटाळा येतो आणि नवीन प्रयोग करून बघावेसे वाटतात. व्यवसाय-उद्योगात एखादे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावेसे वाटेल. त्या नादात नेहमीच्या कामाकडे थोडेसे दुर्लक्ष होईल. पशाची आवक समाधानकारक राहील. नोकरीमध्ये वरिष्ठ थोडय़ा काळापुरते तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टकरिता बदलीच्या कामाला पाठवतील. बेकार व्यक्तींना काम मिळाल्यामुळे त्यांचा जीव भांडय़ात पडेल.

कर्क काही माणसे आपल्या सहवासात विशिष्ट कारणापुरती येतात आणि ते कारण संपल्यावर निघून जातात. या आठवडय़ामध्ये अशा प्रकारचा अनुभव येण्याची शक्यता आहे. थोडा काळ तुम्हाला चुकल्यासारखे वाटेल. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या भिडस्त स्वभावामुळे नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. बदली हवी असेल तर प्रयत्न करा. घरामध्ये कामाच्या वेळेला सर्वाना तुमची आठवण येईल. तुम्ही याचा फायदा घेऊन तुमचा एखादा हट्ट पुरवून घ्याल.

सिंह तुमची रास मनस्वी वृत्तीची रास आहे. पण या आठवडय़ात भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व असते, हे तुम्हाला विसरून चालणार नाही. व्यापार-उद्योगात आíथक बाजूकडे सतत लक्ष ठेवा. नोकरीमध्ये एखादे काम व्यवस्थित झाले आहे, असे तुम्हाला वाटेल. पण ते पुन्हा एकदा तपासून पाहा. कामाचा तणाव वाढल्यामुळे मधूनच तुमची चिडचिड होईल. घरामधल्या एखाद्या सदस्याविषयी थोडी चिंता वाटेल.

कन्या तुम्ही नेहमी शांत असता त्यामुळे तुमच्या मनात काय आहे हे इतरांना लवकर समजत नाही. या आठवडय़ात तुमच्यामध्ये काही एक विशेष प्रावीण्य असेल तर त्याचे दर्शन तुम्ही इतरांना घडवून आणाल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश करण्याकरिता नेहमीची कार्यपद्धती उपयोगी पडणार नाही. त्यासाठी जनसंपर्काचा अवलंब करावा लागेल. नोकरीमध्ये तुमच्या बुद्धीला खाद्य देणारे एखादे काम मिळेल. त्याचा तुम्ही पूरेपूर उपयोग कराल. मात्र श्रेय द्यायला वरिष्ठ थोडासा उशीर करतील.

तूळ ‘कळतं पण वळत नाही,’ अशी तुमची स्थिती या आठवडय़ात होईल. ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून होता त्यांची अडचण निघाल्याने तुमची गरसोय होईल. काही कामे नाइलाजाने लांबवावी लागतील. व्यापार-उद्योगातील सरकारी कामाच्या नियमांमुळे थोडासा विलंब होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुम्ही पूर्ण केलेले आहे ते काम पुन्हा करायला लागल्याने तुमची चिडचिड होईल. नवीन नोकरीच्या कामात, प्रयत्नात शिथिलता येऊ देऊ नका.

वृश्चिक जोवर एखाद्या व्यक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास बसत नाही तोवर तुम्ही त्या व्यक्तीशी अंतर ठेवून वागता. या आठवडय़ात ज्या व्यक्तींवर तुमचे खरे प्रेम आहे त्याच्याकडे मन मोकळे कराल. व्यापार-उद्योगात बाजारातील परिस्थिती पाहून तुम्ही तुमचा पवित्रा ठरवाल. पशाची आवक थोडीशी सुधारेल. नोकरीमध्ये स्वत:च्या मतलबाकरिता वरिष्ठांची खुशामत कराल. तुमचे उद्दिष्ट साध्य होईल. घरामध्ये काही ठरावीक लोकांशी तुम्ही आपुलकीने वागाल. पण इतरांवर अन्याय करू नका.

धनू एकीकडे तुम्हाला तुमची महत्त्वाकांक्षा स्वस्थ बसू देणार नाही तर दुसरीकडे घरामधली नतिक कामे पार पाडावी लागतील. या दोन्हींचा समन्वय साधून वेळेचे नियोजन करावे लागेल. व्यापार-उद्योगामध्ये ज्या कामात सुस्ती आली होती त्याला चालना द्यायचा प्रयत्न कराल. नोकरीमध्ये तुम्ही तुमच्याच पद्धतीने काम करायचे ठरवाल. घरामध्ये प्रिय व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यामुळे थोडीशी चिंता निर्माण होईल.

मकर प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही तरी कौशल्य असतेच असे एखादे कौशल्य तुमच्याजवळ असेल तर त्याचा या आठवडय़ात उपयोग होईल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता विशेष प्रयत्न करावे लागतील. जाहिरात आणि प्रसिद्धी अशा कारणाकरिता पसे खर्च होतील. नोकरीमध्ये कितीही काम केले तरी वरिष्ठांना ते कमीच वाटेल. कामामधला वेग वाढविण्याकरिता एखादा शॉर्टकट शोधावा लागेल. घरामध्ये सगळ्यांना तुमचा सल्ला पटेल. पण तसे कोणी मान्य करणार नाही.

कुंभ तुमची रास शनिप्रधान असल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा तुम्ही जास्त दिखावा करीत नाही. या आठवडय़ामध्ये तुमच्याकडे काही विशेष कौशल्य असेल तर त्याचा उपयोग होईल. व्यापार-उद्योगात आíथक कमाई वाढविण्याकरिता  जादा भांडवलाची गरज पूर्ण होऊ शकेल. तुमचा जीव भांडय़ात पडेल. नोकरीच्या ठिकाणी जादा काम करून जादा पसे मिळविण्याची संधी मिळेल. बेकार व्यक्तींना तात्पुरती नोकरी मिळेल. घरामध्ये तुमच्या बोलण्यामुळे वातावरण आनंदी व उत्साही राहील.

मीन स्वभावत: तुम्ही रसिक आणि संवेदनशील आहात. ज्या वातावरणात तुम्ही असता त्याचा तुमच्यावर बराच परिणाम होतो. व्यापार-उद्योगात मात्र जे काम हातात घ्याल ते निश्चयाने पार पाडा. नोकरीच्या ठिकाणी ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असा प्रकार टाळा. वरिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य माना. तुमच्या विशेष कौशल्याला मागणी राहील. घरामध्ये सर्व जण तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील. हातातले पसे जपून वापरा.
विजय केळकर- response.lokprabha@expressindia.com

First Published on March 17, 2017 1:05 am

Web Title: astrology 17 to 23 march 2017
  1. No Comments.