11 December 2018

News Flash

दि. १७ ते २३ नोव्हेंबर २०१७

गरज पडल्यास अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

daily horoscope

मेष जी गोष्ट तुमच्या मनामध्ये आहे ती पूर्ण करण्याकरिता या आठवडय़ामध्ये तुम्ही अधीर असाल. व्यापार-उद्योगात कितीही मोह झाला तरी घाईने निर्णय न घेता त्याचे नीट नियोजन करावे. गरज पडल्यास अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरीच्या ठिकाणी एखादे काम ठरवलेल्या वेळेपूर्वी करण्याकरिता तुम्ही तुमचे इतर कार्यक्रम बदलाल. पण त्यामुळे काही चूक झाली तर ती वरिष्ठांना आवडणार नाही.

वृषभ चांगले आणि वाईट याचा समसमान वाटा करून घ्यायचा हे तुम्हीच ठरवायचे आहे. कोणताही निर्णय या आठवडय़ात भावनेच्या भरात घेऊ नका. व्यापार-उद्योगात पसे मिळण्याची तुम्हाला घाई असेल. त्याकरिता शॉर्टकट घेण्याचा मोह टाळा. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठ एकामागून एक कामे सांगून गोंधळात टाकतील, पण त्यांनी शांतपणे विचार करून एक एक काम हाताळणे चांगले. घरामध्ये एखाद्या प्रश्नावरून तुमचा रागाचा पारा वर जाईल. वस्तुस्थिती समजल्यानंतर तुम्ही शांत व्हाल. मुलांकडे लक्ष ठेवा.

मिथुन तुमची रास खूप बोलकी आहे. विविध विषयांवर गप्पा मारायला तुम्हाला खूप आवडते. तशी व्यक्ती मिळाल्याने बरे वाटेल. व्यापार-उद्योगात एखादे काम खूप सोपे वाटेल, पण ते काम करायला गेल्यानंतर दुरून डोंगर साजरे असा प्रकार घडेल. त्याकरिता कष्ट करण्याची तयारी ठेवा. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमची स्तुती करतील आणि एकेक काम तुमच्या मागे लावून देतील. घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटवून देण्याकरिता बरीच शक्ती खर्च करावी लागेल. घरगुती खर्च वाढतील.

कर्क कळतं पण वळत नाही अशी तुमची स्थिती होण्याची शक्यता आहे. एखादी गोष्ट तुम्ही इतरांना समजून सांगण्याचा प्रयत्न कराल. व्यापार-उद्योगात स्पर्धकांविषयी जी माहिती तुम्हाला मिळेल, त्यातील सत्य काय आहे ते जाणून मग निष्कर्ष काढा. नोकरीच्या ठिकाणी कामाला हळूहळू वेग येईल. एखादे काम अचानक वरिष्ठांनी तुमच्यावर सोपवल्यामुळे तुमचे आठवडय़ाचे गणित मागेपुढे होण्याची शक्यता आहे. घरामध्ये तुमची प्रेम आणि आपुलकी सर्वाना हवीहवीशी वाटेल.

सिंह एखादी गोष्ट मनात आल्यानंतर ती ताबडतोब पार पडली पाहिजे, असा तुमचा आग्रह असतो. पण या आठवडय़ामध्ये तुमच्या कामाचे नियोजन शांत चित्ताने केले तर त्याचा दर्जा उत्तम राहील. व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण थोडेसे कमी वाटेल, पण तुमच्या हातात भरपूर पसे पडतील. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामातून स्वार्थ साध्य होईल, अशा कामाला तुम्ही प्राधान्य द्याल. घरामध्ये बजेटबाहेर जाऊन पसे खर्च कराल.

कन्या नेहमीच्या कामाचा जरी व्याप वाढला असला तरी आता तुम्हाला घरातील गरजांना प्राधान्य द्यावे लागेल. हे सगळे करताना तुमची धावपळ उडेल. व्यापार-उद्योगात काही अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याकरिता छोटा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामातून तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा आहे, ते काम करायला मिळेल. तुम्ही आळस झटकून आलेल्या संधीचा फायदा घ्याल. घरामध्ये एखादी नतिक जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. या परीक्षेतून तुम्ही सहीसलामतपणे बाहेर पडाल.

तूळ ‘विचार आधी का कृती आधी’ असा तुमच्या मनात संघर्ष असेल, पण या आठवडय़ात तुम्ही कृतीला जास्त महत्त्व द्याल. व्यापार-उद्योगात एखादे प्रतिष्ठा वाढवणारे काम तुमच्या वाटय़ाला येईल. नोकरीमध्ये जे अधिकार तुमच्याकडे आहेत, त्याचा  गरजेपेक्षा जास्त वापर करण्याचा मोह होईल. वरिष्ठ तुमच्या सल्ल्याला मान देतील. घरामध्ये आवडत्या व्यक्तींची हजेरी लागल्यामुळे एकाच वेळी अनेक बेत ठरवाल. आठवडा भरगच्च गेल्यासारखे वाटेल.

वृश्चिक उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी तुमची रास आहे. गेल्या दोन-आठवडय़ात किरकोळ कारणांनी तुमची गरसोय आणि चिडचिड चालू असेल, तर त्यावर आता तुम्ही मार्ग शोधून काढाल. व्यापार-उद्योगात अपेक्षित पसे हातात पडण्यासाठी कोणत्याही मार्गाचा तुम्ही अवलंब कराल. नोकरीमध्ये कोण काय बोललंय याला महत्त्व न देता जे तुम्हाला हवे असेल त्यावर लक्ष केंद्रित कराल. घरामधल्या व्यक्तींना आपुलकीचा सल्ला द्याल.

धनू सहसा चाकोरीबद्ध मार्ग तुम्ही सोडत नाही, पण या आठवडय़ामध्ये एखादी भन्नाट आयडिया तुमच्या मनात येईल. त्याचा तुम्ही पाठपुरावा कराल. व्यवसाय-उद्योगात नवीन पद्धतीची योजना अमलात आणायचे ठरवाल. ही कल्पना गिऱ्हाईकांना आवडेल. नोकरीच्या ठिकाणी जादा कमाईची संधी तुम्हाला मिळेल. काही जणांना परदेशी जाता येईल. घरामध्ये तुमचे विचार सुरुवातीला इतरांना पटणार नाहीत, पण नंतर त्यातूनच सगळ्यांचा फायदा होईल.

मकर स्वप्न पाहणारी तुमची रास नाही. तुम्ही सतत नियोजन करता, पण या आठवडय़ात एखादी भन्नाट कल्पना तुमचे लक्ष आकर्षति करेल. ती पूर्ण करण्याकरिता धाडस करण्याची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात जे काम तुम्ही करणार आहात त्यातून चांगली प्राप्ती निर्माण होण्याची तुमची शक्यता निर्माण होईल. जोडधंद्यातून फायदा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी मतलबाकरिता आवडीच्या कार्यक्रमाचे नियोजन कराल. घरामध्ये तुम्ही पूर्वी काही आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण करावे लागेल. मित्र-मत्रिणींचा छोटा मेळावा ठरेल.

कुंभ इतरांनी आग्रह करूनही ज्या कामामध्ये तुम्ही लक्ष दिले नव्हते, त्या कामात नाइलाजाने लक्ष घालावे लागेल. त्यावरून थोडेसे वादविवाद होतील. व्यापार-उद्योगात जितके जास्त काम तितकी जास्त कमाई असे समीकरण असेल. नोकरीमध्ये एखाद्या महत्त्वाच्या कमिटीवर तुमची नेमणूक होईल. वरिष्ठांनी बढतीचे आश्वासन दिले असतील तर नजीकच्या भविष्यात उपयोगी पडतील. घरामध्ये तुमच्या हट्टी स्वभावाचा त्रास होईल. तुम्ही तुमची एखादी इच्छा पूर्ण करून घ्या.

मीन ग्रहमान हळूहळू सुधारत आहे. एखादे काम आपल्याला जमत नाही या विचाराने तुम्ही चिथावून जाल. कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करण्याचा निश्चय कराल. व्यापार-उद्योगात विनाकारण लांबलेल्या कामांना वेग यायला सुरुवात होईल. आíथक स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसू लागतील. नोकरीमध्ये वरिष्ठांना तुमची अडचण समजावून सांगा. घरामध्ये ज्या प्रश्नावरती मतभेद झाले होते त्यावर तुम्ही तोडगा शोधून काढाल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on November 17, 2017 1:08 am

Web Title: astrology 17 to 23 november 2017