News Flash

भविष्य : दि. १९ ते २५ ऑक्टोबर २०१८

‘जुने ते सोने’ या म्हणीची आठवण येईल.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मेष ‘जुने ते सोने’ या म्हणीची आठवण येईल. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका. व्यापार-उद्योगात सध्या चालू असलेली कामाची पद्धत बदलावीशी वाटेल. त्यातील नफा-तोटय़ाचे गणित कागदावर मांडून बघा. नोकरीमध्ये वरिष्ठ अचानक कामाची पद्धत बदलून टाकतील. त्यामुळे धावपळ व दगदग वाढेल. बेकार व्यक्तींनी नवीन नोकरी स्वीकारण्याच्या निर्णयात फार वेळ घालवू नये. घरामध्ये किरकोळ गोष्टीवरून मानपानाचे प्रसंग उद्भवतील.

वृषभ ‘अडला नारायण गाढवाचे पाय धरी’ अशी तुमची परिस्थिती होईल. सभोवतालच्या व्यक्तींकडून मतलब साध्य करून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्या कलाने वागावे लागेल. व्यापार-उद्योगात बाजारातील चढ-उतारांकडे बारकाईने लक्ष ठेवा. बँक किंवा इतर मार्गाने थोडय़ा काळापुरते कर्ज काढावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मूड सांभाळणे कठीण जाईल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींशी एखाद्या प्रश्नावरून वादविवाद होतील.

मिथुन सभोवतालच्या व्यक्तींना तुम्हाला मदत करायची इच्छा असेल, पण काही कारणाने ते शक्य होणार नाही. अशा वेळेला तुम्हाला मनाचा हिय्या करून आंतरिक बळ जागृत केले पाहिजे. व्यापार-उद्योगात देण्या-घेण्याच्या बाबतीत काटेकोर राहा.  नोकरीमध्ये वरिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य माना. घरामध्ये लहान-मोठय़ा व्यक्तीच्या गरजा सांभाळता सांभाळता तुमची तारेवरची कसरत होईल. अतिविचार आणि अतिश्रम कटाक्षाने टाळा.

कर्क तुमची दोन वेगवेगळी रूपे या आठवडय़ामध्ये सभोवतालच्या व्यक्तींना पाहायला मिळतील. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही एकदम आधुनिक असाल, पण घरामध्ये पाऊल ठेवल्यानंतर तुमच्यातील परंपरा जपण्याची वृत्ती जागृत होईल. व्यापार-उद्योगात पशाची आवक समाधानकारक असेल. घरामध्ये तुमचे विचार मोठय़ा व्यक्तींना पटणार नाहीत. त्याचे तुम्हाला वाईट वाटेल, पण त्यांचे तुम्ही समाधान कराल.

सिंह बाजारात जी गोष्ट नवीन असते ती गोष्ट आपल्याकडे असावी असे तुम्हाला कायम वाटते. पण या आठवडय़ामधे ‘जुने ते सोने’ ही गोष्ट लक्षात ठेवा. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश करण्याकरिता जिभेवर साखर पेराल. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांची परवानगी घ्यायला विसरू नका. घरामध्ये एखाद्या तात्त्विक मुद्दय़ावरून मोठय़ा व्यक्तींशी वादविवाद होऊन तुमचे म्हणणे मान्य करावे लागेल.

कन्या ग्रहमान तुमच्या दृष्टीने चांगले आहे. दीर्घकाळ मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी व उत्साही दिसाल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. अपेक्षित आणि अनपेक्षित मार्गाने लाभ झाल्यामुळे तुम्ही स्वत:वर खूश असाल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याची चांगली संधी तुम्हाला दिली जाईल. घरामधील माहोल आनंददायी असेल.

तूळ संपूर्ण आठवडा धावपळीत जाणार आहे. त्यामुळे कामाचे नियोजन करणे अत्यावश्यक ठरेल. व्यापार-उद्योगामध्ये घाईने आíथक गुंतवणूक करू नका. नोकरीच्या ठिकाणी कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे हे तुम्ही नीट ठरवा. नाहीतर फालतू कामात वेळ जाईल. आणि महत्त्वाचे काम अर्धवट राहील. घरामधल्या एखाद्या सदस्याची मागणी अपूर्ण राहिली असेल तर ती पूर्ण करावी लागेल.  प्रकृतीचे चढ-उतार जाणवतील.

वृश्चिक ‘कठोर परिश्रमाला पर्याय नाही’ या म्हणीची तुम्हाला या आठवडय़ात आठवण येईल. पण जे काम तुम्ही आता करणार आहात त्यातून नजीकच्या भविष्यात चांगला फायदा होईल. व्यापार-उद्योगात चांगले पैसे मिळाल्यामुळे पूर्वीचे काही कर्ज फेडता येईल. नोकरीच्या ठिकाणी स्वत:चे महत्त्व वाढविण्याकरिता सहकाऱ्यांना मदत कराल. घरामध्ये एखादा बऱ्याच पूर्वीचा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे.

धनू जीवनामध्ये सगळ्या गोष्टी एकदम मिळत नसतात. एक गोष्ट मिळवायला गेले की दुसऱ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो, याची आठवण तुम्हाला या आठवडय़ात येईल. व्यापार-उद्योगात मिळालेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या तत्त्वांशी तडजोड करावी लागेल. कोणतेही बेकायदेशीर काम करू नका. नोकरीच्या ठिकाणी संस्थेने आखून दिलेल्या नियमांनुसार काम करा.  घरामध्ये लहान-मोठय़ा व्यक्तींची मोट बांधणे कठीण होईल.

मकर प्रत्येक माणूस मूडी असतो. तुम्हीही याला अपवाद नाही. सध्या चांगल्या ग्रहांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिल्यामुळे काहीतरी नवीन करून बघावेसे वाटेल. मात्र त्याकरिता वेडावाकडा धोका पत्करू नका. व्यापार-उद्योगात चुकीची संगत टाळा. नोकरीच्या ठिकाणी मिळालेल्या अधिकाराचा गरवापर करण्याचा मोह होईल, तो कटाक्षाने टाळा. वरिष्ठांची आज्ञा लक्षात ठेवा. घरामध्ये दोन पिढय़ांतील विचारांची तफावत जाणवेल.

कुंभ वातावरणाची अनुकूलता वाढल्याने तुम्ही आता थोडेसे अतिमहत्त्वाकांक्षी व्हाल. प्रत्येक गोष्ट इच्छा केली की मिळण्याची सवय होईल. व्यापार-उद्योगात नवीन काम जरूर स्वीकारा, पण पूर्वीचे काम सोडताना ‘जुने ते सोने’ हे लक्षात ठेवा. नोकरीच्या ठिकाणी मिळालेले अधिकार योग्य कारणाकरिता वापरा. त्यामध्ये गडबड केलेली वरिष्ठांना आवडणार नाही. जुने सहकारी भेटतील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीचे मूड सांभाळावे लागतील.

मीन तुमचा आत्मविश्वास वाढेल. अवघड काम हातात घेण्याची तुमची इच्छा असेल. व्यापार-उद्योगात एखादा प्रोजेक्ट लांबवला असेल तर त्याचा फेरविचार होईल. नोकरीच्या ठिकाणी जे बदल होतील त्यामुळे त्याचा सुरुवातीला त्रास होईल. घरामध्ये तुमच्या मूडी स्वभावामुळे इतरांमध्ये मिसळण्यास अवघड जाईल. मोठय़ा व्यक्तींची मने सांभाळताना चिडचिड होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:01 am

Web Title: astrology 19th to 25th october 2018
Next Stories
1 भविष्य : दि. १२ ते १८ ऑक्टोबर २०१८
2 भविष्य : दि. ५ ते ११ ऑक्टोबर २०१८
3 भविष्य : दि. २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०१८
Just Now!
X