सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष नव्या उत्साहाने नव्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या मागे लागाल. एखाद्या गोष्टीचा सर्वागाने विचार करून ती कृतीत आणाल. नोकरी-व्यवसायातील पदाचा योग्य उपयोग करून नेमक्या व्यक्तींची कामावर नेमणूक कराल. सहकारी वर्गाची नाराजी पत्करावी लागेल. पण नंतर आपल्या निर्णयाला ते संमती देतील. जोडीदाराच्या विचारांनी पुढे जाल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. आवडत्या छंदासाठी वेळ काढाल.

वृषभ बुध, राहूच्या नवपंचम योगामुळे नेहमीच्या चाकोरीबाहेर जाऊन वेगळे विचार कराल. आपल्या या विचारांशी बरेचजण सहमत होणार नाहीत. हजरजबाबी आणि वाक्चातुर्य यांच्या सादरीकरणातून अनेक बिकट प्रसंगातून शिताफीने बाहेर पडाल. ‘मागाल तरच मिळेल’ या नव्या न्यायाचा अवलंब करून नोकरी-व्यवसायात फायदा करून घ्याल. जोडीदारात आणि आपल्यात झालेले गैरसमज मोकळेपणाने बोलून, मुद्दे मांडून दूर कराल.

मिथुन शुक्र, हर्षल केंद्र योगामुळे वैचारिक अस्थिरता जाणवेल. अनेक जबाबदाऱ्या अंगावर घेण्यापेक्षा एकेक काम हातावेगळे करा. म्हणजे कामाची प्रत सुधारेल. कामावरील एकाग्रता भंग करणारी अनेक प्रलोभने आजूबाजूला असतील. पण त्यांच्याकडे लक्ष न देता कामाला प्राधान्य द्याल. आणि ‘हम भी कुछ कम नहीं’ हे सिद्ध करून दाखवाल. नोकरी-व्यवसायात सावधानी बाळगा. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील.

कर्क गुरू, प्लुटोच्या एक राश्यांतर योगामुळे एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान संपादन कराल. या ज्ञानाचा लोकोद्धारासाठी कसा उपयोग करता येईल याचाही विचार कराल. जनमानसात प्रतिष्ठेचे स्थान मिळवाल. वरिष्ठांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न कराल. त्यांच्या मनाजोगते काम करण्यात स्वत:ला झोकून द्याल. सहकारी वर्गाची साथ मिळेल. जोडीदाराशी जुळवून घ्याल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी अंगावर न काढता वेळीस औषधोपचार करणे!

सिंह रवी-मंगळाच्या लाभ योगामुळे प्रेरणादायी घटना घडतील. मिळालेल्या नव्या उमेदीतून यशाच्या दिशेने वाटचाल कराल. आत्मविश्वास वाढेल. सहकारी वर्गाच्या फायद्याचाही विचार कराल. नेतृत्व कराल. त्यांच्या समस्या वरिष्ठांपुढे मांडाल. जोडीदाराच्या भावनांची कदर कराल. भावनिक आधार द्याल. नोकरी-व्यवसायात मनाप्रमाणे प्रगती कराल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नियमित व्यायामामुळे आरोग्य चांगले राहील.

कन्या आवाक्यात असलेल्या गोष्टींचेच आश्वासन द्या. दिलेला शब्द पाळा. त्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागले तरी त्याची तयारी ठवा. लहान-मोठे प्रवास यशस्वी होतील. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची कामे पूर्ण कराल. महत्त्वाचे निर्णय घेताना संभ्रमात पडाल. मानसिक स्थिती आणि व्यावहारिक समस्या यांबाबत जोडीदाराशी चर्चा केल्यास जोडीदार चांगला सल्ला देईल.

तूळ शुक्र-हर्षलाच्या केंद्रयोगामुळे ‘मनात आले आणि करून मोकळे झाले’ याचे परिणाम भोगावे लागतील. त्यापेक्षा अशा विचारांना वेळेवर मुरड घालावी. आवडत्या छंदात मन रमवाल. नोकरी-व्यवसायात मनाविरुद्ध गोष्टी घडतील. सहकारी वर्गाचा पाठिंबा मिळणार नाही. आपले म्हणणे थोडे वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न कराल आणि यशस्वी व्हाल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील.

वृश्चिक रवी-नेपच्यूनच्या चतुर्थातील युतीयोगामुळे अंत:प्रेरणा मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. त्यातून मानसिक समाधान मिळेल. नोकरी-व्यवसायात धिम्या गतीने प्रगती कराल. सहकारी वर्गाला आपले मत पटेल. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. आहारासंबंधी विशेष काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक  वातावरणात थोडी मरगळ पसरेल. लहान-मोठा प्रवास फायदेशीर ठरेल.

धनू अडचणींवर मात करत पुढे जात असताना दमलात तरी थांबू नका. नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास कराल. वरिष्ठ आपले म्हणणे ऐकून घेतील. संधीचे सोने कराल. सहकारी वर्गाची साथ मिळेल. जोडीदाराबरोबर चांगले सूर जुळतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. आप्तेष्टांसाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल. उत्सर्जन संस्थेचे विकार सतावतील. आपल्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींच्या भेटीचा योग संभवतो.

मकर बुध-राहूच्या नवपंचम योगामुळे नवे करार फायदेशीर ठरतील. दूरदृष्टीने घेतलेले निर्णय सर्वाच्या हिताचे असतील. नोकरी-व्यवसायानिमित्त केलेल्या प्रवासांमुळे यश पदरी पडेल. जोडीदाराचा रुसवा प्रेमाने दूर कराल. कौटुंबिक वातावरण समिश्र राहील. घरात नवा उत्साह निर्माण करण्यासाठी नव्या कल्पना लढवाल. रोजच्या धावपळीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होईल. घरगुती उपाय, शांत झोप आणि व्यायाम यांचा अवलंब उपयोगी ठरेल.

कुंभ  रवी-नेपच्युनच्या युती योगामुळे सेवाभावी वृत्तीला पोषक वातावरण मिळेल. हातून गरजूंसाठी चांगले कार्य घडेल. मानसिक समाधान मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराल. वरिष्ठांकडून पाठबळ मिळेल. सहकारी वर्ग मदतीला तत्पर असेल. जोडीदारासह चांगला संवाद साधाल. एकत्रितपणे नव्या योजनांचा बेत आखाल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. नवे विषय अभ्यासाल.

मीन गुरू-प्लुटोच्या एकराश्यांतर योगामुळे सामाजिक कार्यात हिरिरीने सामील व्हाल. नोकरी-व्यवसायात नव्या जोमाने कामाला लागाल. वरिष्ठांनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या सहकारी वर्गाच्या मदतीने वेळेच्या आत पूर्ण करून दाखवाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. लेखन, वाचन, प्रवास हे आपले छंद जोपासाल. जोडीदार त्याच्या विश्वात व्यस्त असेल. आजारी व्यक्तींची शुश्रूषा प्रेमाने कराल.