13 December 2017

News Flash

दि. २ ते ८ जून २०१७

प्रत्येक कामामध्ये तुम्ही उत्साहाने पुढाकार घ्याल.

विजय केळकर | Updated: June 2, 2017 1:01 AM

राशिचक्र

01vijay1मेष प्रत्येक कामामध्ये तुम्ही उत्साहाने पुढाकार घ्याल. मात्र नेमके कशाला महत्त्व द्यावे याविषयी साशंकता असेल. व्यापार-उद्योगात नवीन कामे मिळविण्याकरिता केलेले प्रयत्न ओळखींच्या व्यक्तीमुळे उपयोगी पडतील. नोकरीच्या ठिकाणी एखादे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याविषयी वाच्यता करू नका. घरामध्ये वडिलोपार्जति इस्टेट किंवा जुन्या प्रॉपटींसंबंधीचे प्रश्न हाताळावे लागतील.

वृषभ स्वप्न आणि सत्य यामध्ये फरक असतो. याची आठवण तुम्ही ठेवलीत तर या आठवडय़ामध्ये एखादे अवघड काम मार्गी लावू शकाल.  व्यवसाय किंवा उद्योगात एखाद्या अनपेक्षित प्रश्नात तोडगा निघाल्यामुळे तुमच्या मनावरचे ओझे कमी होईल. जोडधंद्यामधून थोडीफार कमाई झाल्यामुळे तुमच्या मनाला उभारी येईल. नोकरीमध्ये तुम्ही केलेल्या कामाचे वरिष्ठ कौतुक करतील. तुम्हाला मूठभर मांस चढल्यासारखे वाटेल. घरामध्ये अत्यावश्यक खर्चाकरता पशाची तरतूद करावी लागेल. मुलांकडे लक्ष द्या.

मिथुन सतत नवीन कल्पना तुमच्या मनात घोळत असतात. अनेक विचारांची गर्दी असल्यामुळे नित्यक्रमाचे विस्मरण होणार नाही याची काळजी घ्या. व्यापार-उद्योगात आíथकदृष्टय़ा जी महत्त्वाची कामे आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा. नवीन प्रोजेक्टकरिता लागणाऱ्या पशांची जुळवाजुळव करावी लागेल. नोकरदार व्यक्तींना चालू असलेल्या कामामध्ये वरिष्ठांनी लुडबुड केलेली चालणार नाही.  व्यक्तिगत जीवनात तुमचा थोडासा मौजमजेचा मूड असेल. मुलांना योग्य ते मार्गदर्शन कराल.

कर्क एखाद्या निमित्ताने आपले कोण आणि परके कोण यातील भेद तुमच्या लक्षात येतील. त्याचा तुमच्या भविष्यात चांगला उपयोग होईल. व्यवसाय-उद्योगात नवीन काम मिळण्याच्या दृष्टीने काही नवीन संधी उपलब्ध होतील. मात्र या सगळ्याचे जमा-खर्चाचे आकडे कागदावर नीट मांडा. नोकरीमध्ये महत्त्वाचे काम शक्यतो वेळेत आणि वरिष्ठांच्या मर्जीनुसार उरका. सहकाऱ्यांवर अतिविश्वास ठेवूनका. घरामधल्या मोठय़ा व्यक्तींचे बोलणे तुम्हाला पटणार नाही.

सिंह तुम्ही कितीही नाही म्हटलात तरीही सत्ता आणि पसा या दोन गोष्टींविषयी तुम्हाला जबरदस्त आकर्षण असते. या आठवडय़ात अशाच एखाद्या फसव्या कल्पनेमुळे तुम्ही स्वत:ची फसवणूक करण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात एखादे मोठे प्रोजेक्ट तुमचे लक्ष आकर्षति करेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसमोर बढाया मारू नका. नाही तर तुम्ही शब्दात अडकाल. घरामध्ये लहान-मोठय़ा व्यक्तींचे समाधान करणे अवघड होईल.

कन्या सध्या राशीतील गुरूने तुमची महत्त्वाकांक्षा वाढविली आहे. एखादा चुकीचा मार्ग हाताळला जाण्याची शक्यता आहे. त्यापासून लांब राहा. नोकरीमध्ये स्वत:च्या फायद्यासाठी संस्थेकडून मिळणाऱ्या सवलतींचा गरफायदा घ्याल. ज्यांना बदली हवी आहे त्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश करण्याकरिता त्यांची खुशामत कराल. मात्र त्या नादात एखादी विशेष सूट द्यावी लागेल. घरामध्ये काहीही कारण नसताना वडीलधाऱ्या व्यक्तींशी मतभेद होतील. तुम्ही तुमच्या मुद्दय़ावर अडून राहाल.

तूळ आपल्याकडे जे नाही त्याचा विचार न करता आपल्याकडे जे आहे त्याचा विचार करा. त्यामुळे तुमचे काम अधिक चांगल्या प्रकारे होईल. व्यापार-उद्योगात भूलभुलय्या निर्माण होईल. उत्पन्न वाढविण्याकरिता एखादा नवीन प्रयोग करावासा वाटेल. त्याचा विचार न करता नेहमीच्या पद्धतीने काम करा. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी कंटाळून केलेल्या एखाद्या कामाचा तुम्हाला उपयोग होईल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींशी तात्त्विक मतभेद होतील. पण त्यांचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल.

वृश्चिक प्रत्येक माणूस आशावादी असतो. सध्याचे ग्रहमान जरी तुम्हाला खूप अनुकूल नसले तरी तुम्ही त्यातून एखादा चांगला मार्ग शोधून काढाल. व्यापार-उद्योगात काही निर्णयाच्या बाबतीत तुम्ही स्वप्नाळू बनाल. त्या दिशेने वाटचाल करायला लागल्यावर ‘दुरून डोंगर साजरे’ असा अनुभव येईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एखादे आमिष दाखवून तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. घरामध्ये आवडत्या व्यक्तींचे हट्ट पुरवणे भाग पडेल. कामाचा तणाव असूनही थोडीशी मजा कराल.

धनू एखादे काम सहजासहजी पूर्ण झाले तर त्याचे आपल्याला महत्त्व वाटत नाही, पण त्याच कामामध्ये कष्ट पडले की त्याची किंमत कळते. या आठवडय़ात असा एखादा चांगला अनुभव येईल. व्यापार-उद्योगात नवीन प्रयोग करायला जाऊ नका. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांचा मूड सांभाळणे कठीण होईल. घरामध्ये एखादा अवघड निर्णय तुम्ही यशस्वीपणे घ्याल.

मकर ग्रहमान तुमची मन:स्थिती द्विधा करणारे आहे. फारसे काम करायचे नाही, आराम करायचा, असे तुम्ही ठरवाल आणि पुढल्या क्षणी कामाला लागाल. व्यापार-उद्योगात कामाला म्हणावा तितका वेग येणार नाही. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये तुम्हाला अडकून पडल्यासारखे होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सूचना नीट ऐका नाहीतर केलेले काम वाया जाईल. बेकार व्यक्ती गोंधळात पडतील. घरामध्ये न टाळता येणारे खर्च निर्माण होण्याची शक्यता आहे. मुलांना मदत करण्यासाठी तुम्ही योग्य ते मार्गदर्शन कराल.

कुंभ एखादा अवघड प्रश्न असेल तर त्यामध्ये तुम्ही पटकन मार्ग काढाल. छोटय़ा प्रश्नामध्ये मात्र तुमचा विनाकारण गेंधळ होईल. अशा वेळी हितचिंतक तुम्हाला मदत करतील. व्यापार-उद्योगात एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी मध्यस्थाचा उपयोग करावा लागेल. नोकरीमध्ये एखादे काम पूर्ण करण्याकरिता छोटा प्रवास करावा लागेल. सहकारी मतलबाकरिता तुमची स्तुती करतील. घरामध्ये महत्त्वाच्या प्रश्नावर उलट-सुलट चर्चा होईल. निर्णय पुढे ढकलला जाईल.

मीन योग्य व्यक्तींच्या संपर्काअभावी जी कामे अडून राहिलेली होती ती आता पुढे सरकण्याची चिन्हे दिसू लागतील. तुमच्या हालचालीत वेग येईल. व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने जी तातडीची कामे आहेत त्यांना ताबडतोब वेग द्या. नंतर साहस महागात पडेल. नोकरीच्या ठिकाणी जनसंपर्काशी निगडित व्यवहार आहेत त्यात स्वत: लक्ष घाला.  घरामध्ये एखाद्या निर्णयात गोंधळ होईल, पण सप्ताहाच्या शेवटी सर्व काही ठीक होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on June 2, 2017 1:01 am

Web Title: astrology 2 to 8 june 2017