News Flash

दि. ४ ते १० सप्टेंबर २०१५

मेष कोणत्याही परिस्थितीत आनंदी आणि उत्साही राहणारी तुमची रास आहे.

मेष कोणत्याही परिस्थितीत आनंदी आणि उत्साही राहणारी तुमची रास आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणचे वातावरण खुलवून टाकता. व्यापार-उद्योगात जितके जास्त काम तितके जास्त पसे असे समीकरण असल्यामुळे तुमची भरपूर काम करण्याची तयारी असेल. नोकरीमध्ये एखाद्या विशिष्ट कामागिरीकरिता वरिष्ठ आणि तुमची संस्था तुमची निवड करतील. घरामध्ये एखाद्या निमित्ताने तुमच्या हौशी स्वभावाला उधाण येईल. दीर्घकाळानंतर लांबच्या व्यक्तीला भेटण्याचे संकेत मिळतील.

वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानातील मंगळ आणि पंचम स्थानातील बुध तुम्हाला अनुकुल आहेत. शुक्र मार्गी झाला असल्यामुळे त्याचीही अनुकुलता आहे. व्यापारी वर्गाला आठवडय़ाची सुरुवात थोडीशी खर्चिक वाटेल, पण नंतर गमावलेले पैसे कमावता आल्यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकता येईल. नोकरीमध्ये प्रत्येक बाबतीत वरिष्ठ तुमच्यावर अवलंबून असतील. कदाचित छोटा प्रवास करावा लागेल. घरामध्ये कोणाशी तरी रूसवे फुगवे होतील पण तुमची भुमिका सामंजस्याची ठेवलीत तर सर्व काही ठीक होईल.

मिथुन सतत नावीन्याच्या शोधात असणारी तुमची रास आहे आणि जेव्हा त्याला भरपूर वाव मिळतो, त्या वेळी तुमची कळी खुललेली असते. व्यापारउद्योगात पशाची आवक वाढविण्याकरिता एखादी खास योजना अमलात आणण्याचा तुमचा संकल्प असेल. त्याकरिता आवश्यक असणारे भांडवलाची तरतूद करावी लागेल. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना काम मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या मागण्या काही अटींवर मान्य करतील. घरामध्ये कोणाशी मतभेद झाले असतील तर ते मिटवायला चांगला सप्ताह आहे.

कर्क ज्या कामाविषयी तुम्हाला प्रचंड उत्सुकता होती आणि जे काम रखडले होते ते मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने तुम्ही प्रचंड आनंदी आणि उत्साही बनाल. व्यापार-उद्योगात तुमचे इरादे बुलंद असतील. ते जरी खर्चीक असले तरी त्याचा आग्रह तुम्ही धराल. गिऱ्हाईकांना शब्द देण्यापूर्वी गरजेपेक्षा थोडी जास्त मुदत मागून घेणे तुमच्या दृष्टीने हितावह ठरेल. बेकार व्यक्तींना काम मिळू शकेल. घरामध्ये एकत्र बसून सर्व सदस्य एखाद्या शुभ कार्यक्रमाविषयी चर्चा करतील. बठे खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहे.

सिंह ‘तेरडय़ाचा रंग तीन दिवस’ असा प्रकार होण्याची शक्यता आहे. बरेच काही करण्याची तुमची उमेद जागृत होईल. व्यापार-उद्योगात वातावरणाची थोडीफार साथ मिळाल्याने खूप मोठे कर्ज घेऊन मोठा प्रोजेक्ट सुरू करावासा वाटेल. बेकार व्यक्तींनी जास्त चिकित्सा केली नाही तर त्यांना नोकरी मिळू शकेल. सध्याच्या नोकरीत विशिष्ट मतलबांकरिता वरिष्ठ तुम्हाला साथ द्यायला तयार असतील. घरामध्ये काही खर्चीक बेत ठरतील, पण त्याकरिता पसे खर्च करण्याची कोणाचीच तयारी नसेल.

कन्या एखादा निर्णय आपल्या हातून चुकीच्या पद्धतीने घेतला जातो, पण याची जेव्हा आपल्याला जाणीव होते त्या वेळेस तो आपण दुरुस्त करतो. हेच तुमचे मुख्य उद्दिष्ट असेल. व्यापारउद्योगात जमा-खर्चाची ताळेबंदी करून बघा, म्हणजे तुमच्या हातून कुठे आणि कशी चूक झाली ते लक्षात येईल आणि त्यावर तातडीने काही तरी तोडगा काढाल. नोकरीमध्ये तुम्ही करीत असलेल्या कष्टाची वरिष्ठांना जाणीव झाल्याने तुम्हाला एखादी सुविधा द्यायला ते तयार होतील. घरामधले सदस्य मोठमोठे बेत करतील.

तूळ अनेक चांगले बेत मनात असल्यामुळे तुम्ही एकंदरीत खूश दिसाल. व्यवसाय-उद्योगामध्ये तुमचा रचनात्मक दृष्टिकोन आणि कल्पकता याचा वापर करून स्पर्धकांच्या पुढे एक पाऊल टाकण्याचा तुमचा विचार असेल. पशाची आवक वाढेल. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे काम करण्यामध्ये मजा वाटेल. संस्थेतर्फे काही विशेष सवलती जाहीर केल्या जातील. घरामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल. प्रत्येक जण आपल्या आवडीनिवडी पूर्ण करण्याकरिता सज्ज असेल.

वृश्चिक एखाद्या मोठय़ा कामामध्ये छोटे छोटे अडथळे येत असतील तर ते दूर झाल्यामुळे प्रगतीचा मार्ग खुला होईल. व्यापार-उद्योगामध्ये आपण इतरांपेक्षा वेगळे कसे आहोत, हे सिद्ध करण्याकरिता तुमची चाकोरीबाहेर जाण्याची तयारी असेल. नोकरीमध्ये तुमचे काम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असणारे स्वातंत्र्य मिळाल्याने तुम्ही समाधानी दिसाल. घरामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या आवडी-निवडीनुसार कार्यक्रम ठरवील. मात्र पशांची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार होणार नाही.

धनू अनेक वेळेला आपल्याला पसे खर्च करावे लागणार आहेत हे आपल्याला माहीत असते, पण ते कोणत्या कारणाने आणि किती असेल याचा अंदाज येत नाही. व्यापारउद्योगातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एखादी मोठी गुंतवणूक करावी लागेल. नोकरीमध्ये जे काम सहकाऱ्यांना समजले नव्हते ते तुम्हाला समजल्यामुळे वरिष्ठ नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये कोणालाही नाराज करायचे नाही. या उद्देशाने सगळ्यांचे म्हणणे तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल. घाईने कोणालाही आश्वासन देऊ नका.

मकर कोणत्याही कारणाने तुमचे पशाचे गणित मागेपुढे झाले की तुम्ही अस्वस्थ होता आणि लगेचच त्यावर उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न करता. व्यापार उद्योगाच्या क्षेत्रात चांगल्या संधी दृष्टिक्षेपात येतील. त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचे तुम्ही ठरवाल. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे महत्त्व असल्याने वरिष्ठ तुमच्याकडून जादा काम करून घेतील. तुम्ही त्यातून स्वत:चा मतलब साध्य कराल. घरामध्ये लांबच्या नातेवाईकांशी आणि मित्रमंडळींशी काही कारणांनी संपर्क होईल. त्यांच्याबरोबर वेगवेगळे कार्यक्रम ठरवतील.

कुंभ जेव्हा अनपेक्षित कारणामुळे पसे खर्च होतात, त्या वेळी आपला गडबड-गोंधळ होतो. व्यापार-उद्योगात आलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आता स्वत:च्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून ठरविलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी ‘आधी केले मग सांगितले’ अशी तुमची कामाची पद्धत असेल. त्यामुळे कामाचा उरक दांडगा राहील. घरामध्ये तुम्ही प्रत्यक्ष कोणालाही विरोध न करता आपले म्हणणे खरे करून दाखवाल. जोडीदाराशी जुळवून घेण्याकरिता तुमचे धोरण थोडेसे लवचीक ठेवा.

मीन आवडत्या व्यक्तींकरिता तुम्ही जर काही विशेष नियोजन करून ठेवले असेल तर त्याचा कसा आणि किती उपयोग होईल हे निश्चित कळेल. व्यापार-उद्योगात ‘धक्का स्टार्ट’ या पद्धतीने काम करणे भाग पडेल. एखाद्या मध्यस्थाचाही वेळ प्रसंगी उपयोग करून घ्यावा लागेल. नोकरीमध्ये एखादे महत्त्वाचे काम हाताळताना वरिष्ठांनी दिलेल्या सूचना नीट लक्षात घेतल्या तर ते काम चांगल्या पद्धतीने पार पाडू शकाल. घरामध्ये सगळ्यांचा मूड मौजमजेचा असेल.
विजय केळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 1:06 am

Web Title: astrology 21
टॅग : Astrology,Bhavishya
Next Stories
1 दि. २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०१५
2 दि. २१ ते २७ ऑगस्ट २०१५
3 दि. १४ ते २० ऑगस्ट २०१५
Just Now!
X