सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी-हर्षलच्या लाभयोगामुळे आपल्या कर्तृत्वाला धडाडीची जोड मिळेल. सामाजिक क्षेत्रात कार्य कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे पटणार नाही. तरीही त्याप्रमाणेच वागावे लागेल. सहकारीवर्ग आपल्या मताशी सहमत असेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. एकमेकांशी विचारविनिमय करून महत्त्वाचे निर्णय घ्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. घडलेल्या घटनांचा मानसिक त्रास करून घेऊ नका. तब्येतीची चिंता नको.

वृषभ शुक्र-चंद्राच्या नवपंचम योगामुळे परिस्थितीचा साधकबाधक विचार कराल. वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करून चांगले तेवढेच विचारात घ्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना आवश्यक ती मदत कराल. वेळेवर काम पूर्ण कराल. योग्य व्यक्तींची निवड कराल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारीवर्ग साहाय्य करण्याची तयारी दाखवेल. जोडीदार आपले म्हणणे सोडणार नाही. अशा वेळी आपणच प्रेमाने वैचारिक पेच हळुवार सोडवाल. आरोग्य चांगले राहील.

मिथुन भाग्यस्थानातील चंद्र-नेपच्यूनच्या युती योगामुळे बुद्धीला मानसिक शक्तीची पुष्टी मिळेल. कलेची नवनिर्मिती कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा खंबीर पािठबा मिळेल. त्यामुळे आपली प्रगतीकडे वाटचाल होईल. सहकारीवर्गातील हितशत्रूंवर मात कराल. जोडीदाराशी वाद न घालता आपले मत शांतपणे मांडाल. इतर कुठलीही अपेक्षा ठेवू नका. कौटुंबिक वातावरण ठीक राहील. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार संभवतील.

कर्क चंद्र-गुरूच्या लाभयोगामुळे आपल्या सत्त्वगुणात भर पडेल. प्राचीन विद्या, शास्त्र यांच्या अभ्यासात व्यस्त रहाल. नोकरी-व्यवसायात अचानक नव्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतील. सहकारीवर्ग यात आपली मदत करेल. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष मदत घ्यावी लागेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रातील समस्यांनी त्रस्त असेल. त्याला भावनिक आधार द्याल. योग्य सल्ला द्याल. ओटीपोट, उत्सर्जन व रक्ताभिसरण संस्था यांचे आरोग्य सांभाळावे.

सिंह रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे अनेक कामे सहज हातावेगळी कराल. नव्या ओळखी होतील. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या अडचणीच्या वेळी त्यांना मदत कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. ज्येष्ठ जाणकारांच्या ओळखीमुळे लाभ होतील. सहकारीवर्ग आपल्या शब्दाचा मान ठेवेल. आपल्या उपकारांची परतफेड करेल. जोडीदार कल्पक विचारांचा उपयोग करून समस्यांवर उपाय शोधेल. आरोग्य चांगले राहील.

कन्या रजोगुणी शुक्र आणि सत्त्वगुणी गुरूच्या समसप्तम योगामुळे आनंद व उत्साह वाढेल. कलेला बौद्धिक प्रोत्साहन मिळेल. लेखन कराल. नोकरी-व्यवसायात मानाचे पद भूषवाल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारीवर्गाला मदत कराल. जोडीदाराशी चर्चा करून कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे शोधाल. प्रदूषित पाण्यापासून सावधान!

तूळ चंद्र-गुरूच्या लाभयोगामुळे कामातील अडचणी दूर होतील. अपेक्षित मदत मिळेल. आवडीच्या छंदासाठी वेळ राखून ठेवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. आíथक लाभ संभवतो. सहकारीवर्ग नेमून दिलेले काम वेळेत पूर्ण करील. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करेल. आपण त्याचे कौतुक कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. फोड, गळू झाल्यास त्यात पू होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक शुक्र-शनीच्या षडाष्टक योगामुळे लहान लहान गोष्टींमध्ये अडचणी येतील. कार्यपूर्ती होण्यात विलंब होईल. तरी धीर सोडू नका. सातत्य ठेवा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मतानेच पुढे जावे लागेल. त्यातही अडचणी येतील. सहकारीवर्गाकडून मदत मिळेल. जोडीदार आपली परिस्थिती समजून घेईल. वेळप्रसंगी मौलिक सल्ला देईल. धीर देईल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवण्यात जोडीदाराचा मोठा वाटा असेल. मानसिक त्रास करून घेऊ नका.

धनू रवी-हर्षलच्या लाभयोगामुळे रवीच्या तेजाला हर्षलाची तडफदार साथ मिळेल. नोकरी-व्यवसायात आपल्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल कराल. सहकारीवर्ग मदत करेल. सामाजिक क्षेत्रात नेतेपद स्वीकाराल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून जोडीदारासाठी वेळ काढावा. दोघांतील गरसमज प्रेमाने दूर कराल. बुद्धिमत्तेला कलात्मकतेची जोड मिळेल. घरातील एखाद्या सदस्याचा प्रवासयोग संभवतो. एकंदर आरोग्य चांगले राहील.

मकर शुक्र-नेपच्यूनच्या केंद्रयोगामुळे दोन्ही ग्रहांच्या कारकत्वांना पुष्टी मिळेल. कला, साहित्य, छंद यात प्रगती कराल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना राबवाल. आपल्या व संस्थेच्या हिताच्या गोष्टींसाठी वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारीवर्गाकडून मदत मिळेल. मित्रमंडळींकडून मात्र फार अपेक्षा नकोत. उच्च ध्येय गाठण्याची स्वप्ने बघाल. कर्तव्य व भावना यातील संघर्षांत भावनांना जास्त महत्त्व द्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील.

कुंभ गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे प्राचीन विद्यांच्या अभ्यासात प्रगती कराल. दुसऱ्यांना मदत कराल. नोकरी-व्यवसायात योग्य वेळी घेतलेल्या अचूक निर्णयामुळे वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारीवर्गाचे प्रश्न व्यवस्थापन समितीपुढे मांडाल. मित्रमंडळी, ज्येष्ठ नातलग यांच्यासाठी धावपळ करावी लागेल. जोडीदाराच्या साथीने कुटुंब सदस्यांमध्ये समतोल राखाल. आपल्या भावना मोकळेपणाने त्याच्यापुढे मांडाल. आरोग्य ठीक राहील.

मीन चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे नवीन विषय शिकण्याची इच्छा दर्शवाल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून आपल्या फायद्याचा विचार कराल. नोकरी-व्यवसायात अडचणी आल्या तरी वरिष्ठांच्या सहकार्याने त्यावर मात कराल. सहकारीवर्ग जमेल तशी मदत करेल. जोडीदार बालगोपालांसह मन रमवेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलाल. डोळ्यांचे आरोग्य जपा.