09 August 2020

News Flash

राशिभविष्य : दि. २२ ते २८ नोव्हेंबर २०१९

मंगळ-हर्षलच्या प्रतियोगामुळे धडाडी व उत्साह वाढेल.

सोनल चितळे

मेष मंगळ-हर्षलच्या प्रतियोगामुळे धडाडी व उत्साह वाढेल. सांपत्तिक अडचणीला धीराने सामोरे जाल. अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सहकारी वर्ग मदतीसाठी पुढे येतील. एकत्र काम करताना जुळवून घ्यावे लागेल. जोडीदार स्वत:चे म्हणणे खरे करून दाखवेल. सध्या तरी फारसा विरोध दाखवू नये. कौटुंबिक वातावरण संतुलित ठेवण्याचा प्रयत्न कराल. कोरडेपणामुळे त्वचा विकार उद्भवू शकतात.

वृषभ रवी व चंद्र या भिन्न कारकत्व असलेल्या तरीही एकमेकांना पूरक व पोषक असलेल्या ग्रहांच्या लाभयोगामुळे प्रयत्नांना यश मिळेल. नोकरी व्यवसायात गरजूंना मदत कराल. परदेशी संस्थांसह करार कराल. सहकारी वर्गाला अडचणीतून बाहेर काढाल. विचारपूर्वक व दूरदृष्टीने निर्णय घ्याल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. कुटुंबासाठी त्याच्याकडून आíथक साहाय्य मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. लघवीसंबंधित त्रास वाढतील.

मिथुन शुक्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे कला व तंत्रज्ञानाचा सुयोग्य मिलाप दिसून येईल. बुद्धिमत्ता व आकलनशक्तीची चुणूक दाखवाल. रेंगाळलेल्या कामांना गती द्याल. चाकोरीपेक्षा वेगळा विचार मांडाल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदाराची परिस्थिती समजून घ्याल. त्याच्या कार्यक्षेत्रातील अडचणींवर उपाय सुचवाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. माकडहाडाला मार बसल्यास वैद्यकीय उपचार व विशेष काळजी घ्यावी लागेल.

कर्क चंद्र-बुधाच्या युती योगामुळे वाक्चातुर्याची प्रभावी झलक दाखवाल. भाषेवरील प्रभुत्व उपयोगी पडेल. नोकरी व्यवसायात हजरजबाबी उत्तरामुळे संकट टळेल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाकडून वेळेत काम पूर्ण करून घेण्यासाठी त्यांच्या आवश्यक गरजा पुरवाल. जोडीदाराची मानसिक व भावनिक स्थिती जपाल. त्याला नवा उत्साह व उभारी द्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. श्वसनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको.

सिंह चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे धाडस व कर्तृत्व दाखवाल. क्षुल्लक कारणाने अस्वस्थ न होता घडलेल्या घटनेचा शांतपणे विचार करावा. नोकरी-व्यवसायात बाजी माराल. वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवाल. सहकारी वर्गाची मदत कराल. जोडीदारासह जुळवून घ्यावे. शब्दाने शब्द वाढवू नये. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कुटुंब सदस्यांचे सहकार्य लाभेल. सांधेदुखी, पाय सुजणे व दुखणे असे त्रास होतील. औषधोपचारासह नियमित आहार व व्यायाम आवश्यक!

कन्या चंद्र-गुरूच्या युतीयोगामुळे कार्यकुशलता वाढेल. प्रत्येक कामात रस घ्याल. नोकरी व्यवसायात आíथक प्रगती कराल. ज्येष्ठ वरिष्ठांचे अनुभव मार्गदर्शक ठरतील. सहकारी वर्गाचे प्रश्न समजून घ्याल. जोडीदाराचा चांगला पािठबा मिळेल. दोघे मिळून सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. श्वसनाचे विकार सतावतील.

तूळ चंद्र-नेपच्युनच्या नवपंचम योगामुळे नवी स्फूर्ती व प्रेरणा मिळेल. नोकरी-व्यवसायात अडचणींवर मात करावी लागेल. सत्याची कास धराल. सहकारी वर्गाकडून काम करून घ्याल. त्यांच्या मागण्या पूर्ण कराल. जोडीदाराच्या विचारांशी जुळवून घेणे कठीण असले तरी तसे करावे लागेल. जास्त ताणू नये. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न कराल. नातेवाईकांकडून विशेष लाभ होतील. खांदादुखीकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय उपचार करावेत.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे शारीरिक शक्ती वाढेल. मानसिक चंचलता दूर करण्यासाठी योग विद्य्ोचा आधार घ्यावा. नोकरी-व्यवसायात स्वतचे म्हणणे इतरांवर थोपवायचा प्रयत्न कराल. सहकारी वर्ग फारसे ऐकून घेणार नाही. तक्रारींचा सूर लागेल. जोडीदारसह चांगले जुळेल. एकमकांची परिस्थिती समजून घ्याल. भावनिक आधार द्याल. मित्रमंडळींना मदत करण्यासाठी खर्चाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

धनू गुरू-शुक्राच्या युतीयोगामुळे लाभलेला वारसा जोपासाल. नावलौकिक मिळवाल. बुद्धिमत्तेला कलात्मकतेची साथ मिळेल. मित्रमत्रिणींकडून विशेष लाभ होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा तात्पुरता विरोध मुद्देसूद भाषणातून दूर कराल. त्यांचा विश्वास संपादन कराल. देशविदेशात कामानिमित्त प्रवास कराल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. संसर्गजन्य आजारांपासून सावध राहा. योग्य ती काळजी घेणे गरजेचे!

मकर गुरू-चंद्राच्या लाभयोगामुळे सेवावृत्तीने गरजूंची मदत कराल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी व्यवसायात आपण दिलेल्या सल्ल्याचा योग्य फायदा होईल. नावलौकिक वाढेल. सहकारी वर्गाला चांगले मार्गदर्शन कराल. त्यांच्या वैयक्तिक प्रगतीचाही विचार कराल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. दोघे मिळून एखाद्या विधायक कार्यात सहभागी व्हाल. समाजकार्यात योगदान द्याल. कौटुंबिक समस्या भावनिक पातळीवरून अलगद सोडवाल. पोट सांभाळा.

कुंभ चंद्र-शनीच्या लाभयोगामुळे विचार करून निर्णय घ्याल. भावनांवर विवेकाचा संयम राहील. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. नव्या संधीचे चीज कराल. सहकारी वर्ग आपली कामे चोख करतील. अडीअडचणींवर मात कराल. जोडीदारासह जुळवून घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या मदतीला धावून जाल. अडकलेली कामे ओळखींमुळे पुढे सरकतील. पित्त विकारावर योग्य औषध घ्यावे लागेल.

मीन गुरू-चंद्राच्या युतीयोगामुळे कष्टाचे चीज होईल. हाती घेतलेली कामे उशिरा का होईना पण पूर्णत्वास न्याल. नोकरी-व्यवसायात अडचणींवर विचारपूर्वक मात कराल. संयम व धर्य दाखवाल. सहकारी वर्गाला आवश्यक ती मदत कराल. जोडीदाराचे विचार समजून घ्याल. एखादा वादाचा मुद्दा असला तरी त्याची चर्चा आत्ता नको. उत्सर्जन संस्था सांभाळावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2019 1:01 am

Web Title: astrology 22nd to 28th november 2019
Next Stories
1 राशिभविष्य : दि. १५ ते २२ नोव्हेंबर २०१९
2 भविष्य : दि. ८ ते १४ नोव्हेंबर
3 राशिभविष्य : दि. १ ते ७ नोव्हेंबर
Just Now!
X