15 December 2018

News Flash

दि. २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०१८

व्यापारउद्योगात लक्ष्मी चंचल असते याचा प्रत्यय येईल.

मेष मधाभोवती ज्याप्रमाणे मधमाशा गोळा होतात त्याप्रमाणे ज्यांचा तुमच्याशी मतलब आहे त्या व्यक्ती तुम्हाला खूश करण्याचा प्रयत्न करतील. तुमची विवेकबुद्धी जागृत ठेवा. व्यापारउद्योगात लक्ष्मी चंचल असते याचा प्रत्यय येईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खूश करण्याकरिता फार पुढे पुढे करू नका. नाही तर तुमची जबाबदारी वाढेल. घरामध्ये काही खर्चीक बेत ठरतील. मौजमजेला सर्वजण पुढे असतील.

वृषभ तुमची रास व्यवहारी आहे. कठीण प्रसंगामध्येसुद्धा तुम्ही शांतपणे विचार करून एखादा चांगला मार्ग शोधून काढता. या आठवडय़ात तुमच्या या गुणाचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल. व्यापारउद्योगात केलेले कष्ट कधी वाया जात नाहीत याची प्रचीती येईल. पूर्वी केलेल्या कामातून पसे मिळतील. नोकरीमध्ये लाभदायक प्रोजेक्टकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये दीर्घकाळानंतर  लांबच्या नातेवाईकाला भेटण्याचा योग संभवतो.

मिथुन एखादे मोठे ध्येय पुढे असल्याशिवाय आपल्या कामाला वेग येत नाही. या नियमानुसार या आठवडय़ात तुम्ही भरपूर काम करायचे ठरवाल. व्यापारउद्योगात पूर्वी केलेल्या कामातून गिऱ्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी सांगण्यापूर्वीच तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन कराल, त्यामुळे त्यांना बरे वाटेल. घरामध्ये मंगलकार्याची नांदी होण्याची शक्यता आहे. नवीन जागेच्या शोधात यश मिळेल.

कर्क शांतपणे आणि बारकाईने तुम्ही विचार केलात तर तुम्हाला तुमच्या कामात काय चुका झाल्या हे लक्षात येईल आणि प्रगतीचा एखादा नवीन मार्ग सुचेल. व्यापार उद्योगात पुढल्या एक-दोन आठवडय़ामध्ये पसे मिळण्याची लक्षणे दिसू लागतील. सप्ताहाच्या शेवटी जुन्या ओळखीचा कुठेतरी उपयोग होईल. नोकरीच्या ठिकाणी मात्र डोके थंड ठेवून काम करा.  मनामध्ये काही शंका असतील तर त्याचे निरसन करून घ्या.

सिंह पेरल्याशिवाय उगवत नाही या म्हणीची आठवण ठेवा. या आठवडय़ात तुम्ही जे काम करणार आहात त्याचा उपयोग तीन-चार आठवडय़ानंतर होईल. व्यापारउद्योगात जेवढे काम जास्त तेवढे पसे जास्त अशी तुमची स्थिती असेल. घडय़ाळाच्या काटय़ानुसार काम करावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी एखादे आमिष दाखवून वरिष्ठ तुमच्याकडून जास्त काम करून घेतील.  घरामध्ये अत्यावश्यक कारणांकरिता पसे खर्च होतील.

कन्या ग्रहस्थिती सुधारत असल्यामुळे ज्या बाबतीत तुम्हाला निराशा आली होती त्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल. तुमचा उत्साह वाढेल. व्यापार-उद्योगात खूप पसे नाही मिळाले तरी हातात घेतलेले काम पूर्ण केल्याचा आनंद तुम्हाला मिळत राहील. कामगारांकडून सहकार्य मिळविण्याकरिता त्यांना खूश ठेवावे लागेल. बेकार व्यक्तींना काम मिळण्याची शक्यता निर्माण होईल. घरामधला लांबलेला कार्यक्रम निश्चित होईल.

तूळ सुखाचा जीव दुखात टाकणे म्हणजे काय हे तुमच्याकडे बघून समजेल. सर्व काही ठीक चालू असताना एखादी स्वप्नमयी कल्पना तुम्हाला आकर्षति करेल. ही गोष्ट जरी अव्यवहारी असली तरी तुम्हाला त्याचेच आकर्षण वाटेल. व्यापारउद्योगात काम पूर्ण करण्याकरिता शिस्तबद्ध काम करावे लागेल. हातामध्ये भरपूर पेसे खुळखुळतील. घरामध्ये आवडत्या व्यक्तींचे हट्ट पुरवावे लागतील.

वृश्चिक सप्ताहाची सुरुवात तणावात होईल. पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतशी तुमची चिंता कमी होईल. व्यापारउद्योगात तेच तेच काम करायचा कंटाळा येईल. त्यामुळे फक्त आíथक व्यवहार हाताळून बाकीची कामे तुम्ही इतरांवर सोपवून द्याल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामाविषयी तुमच्या मनात बरीच धास्ती होती ते काम सुरळीतपणे पार पडेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीच्या जीवनातील एखादा शुभप्रसंग साजरा होईल.

धनू सध्या राशीतील शनीच्या भ्रमणामुळे तुम्ही थोडे निराश झाला आहात. पण या आठवडय़ात वाळवंटात ओएॅसिस सापडल्यावर जसा प्रवाशांना आनंद होतो तसा तुम्हाला होणार आहे. व्यापारधंद्यात पूर्वी जे हितसंबंध निर्माण केले होते त्याचा कुठे ना कुठेतरी उपयोग होईल. नोकरीच्या ठिकाणी एखादा मदतनीस तुमच्याबरोबर आल्यामुळे कामाचा तणाव कमी होईल. मात्र महत्त्वाची कामे स्वतच हाताळा. घरात नवीन जागा किंवा वाहन खरेदीचा बेत ठरेल.

मकर माणसाला एखादी गोष्ट मिळत गेली की त्याची हाव वाढत जाते. या आठवडय़ात सर्व काही चांगले असून एखादी स्वप्नमयी कल्पना तुम्हाला आकर्षति करेल. त्याचा थोडा पाठलाग केल्यावर असे लक्षात येईल हे मृगजळ आहे. नोकरीच्या ठिकाणी हातात घेतलेले काम पूर्ण झाल्याशिवाय त्याविषयी घोषणा करू नका. नवीन नोकरी स्वीकारताना त्यातील अटी आणि नियमांचा अभ्यास करा. घरामध्ये सर्वाशी जपून बोला.

कुंभ तुम्ही नेहमी तुमच्या करियरला जास्त महत्त्व देता. पण या आठवडय़ात गृहसौख्यालाही महत्त्व द्याल. सभोवतालच्या व्यक्तींना याचे आश्चर्य आणि कौतुक वाटेल. व्यापारउद्योगात तुमच्या प्रयत्नांना नशिबाची जोड लाभेल. त्यामुळे जरी कामात कष्ट पडले तरी एक प्रकारचा आनंदही मिळेल. आठवडय़ाची सुरुवात धनप्राप्तीने हाईल. नोकरदार व्यक्ती एखादे काम वरिष्ठ सांगायच्या आधीच तयार ठेवतील.

मीन स्वभावत: तुमचे व्यक्तिमत्त्व खूप आनंदी आणि परोपकारी आहे, याचा प्रत्यय देणारे हे ग्रहमान आहे. ज्या कारणामुळे तुम्हाला खूप निराशा आली होती ते कारण नाहीसे झाल्यामुळे तुम्ही उत्साही बनाल. व्यापारउद्योगात नवीन कामाचे आकर्षण ठेवण्यापूर्वी सध्याच्या गिऱ्हाईकांचे समाधान करा. एखाद्या प्रश्नात गुंतागुंत निर्माण झाली असेल तर त्यात काहीतरी मार्ग मिळेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on February 23, 2018 1:01 am

Web Title: astrology 23 feb to 1 march 2018