09 August 2020

News Flash

राशिभविष्य : दि. २३ ते २९ ऑगस्ट २०१९

शनी-चंद्राच्या प्रतियोगामुळे आत्मविश्वास ढळू शकेल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष शनी-चंद्राच्या प्रतियोगामुळे आत्मविश्वास ढळू शकेल. परंतु नको त्या काळज्या करत बसू नका. कामातील दिरंगाईमुळे अंगात सुस्तपणा भरेल. नोकरी-व्यवसायात सतर्क राहणे जरुरीचे आहे. आळस झटकून सहकारीवर्गाच्या मदतीने उभारी आणण्याचा प्रयत्न कराल. जोडीदार आपली द्विधा मन:स्थिती समजून घेईल. मनमोकळ्या चच्रेतून कौटुंबिक समस्यांवर उपाय शोधाल. नसा, शिरा आखडणे, मणक्यावर ताण येणे यांसारख्या त्रासांचा सामना करावा लागेल.

वृषभ गुरू-चंद्राच्या समसप्तम योगामुळे जोडीदाराची मोलाची साथ मिळेल. त्याचा सल्ला लाभदायक ठरेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. नव्या संकल्पना व्यवस्थापकांपुढे मांडाल. सहकारीवर्गाकडून अपेक्षित साहाय्य मिळेल. कौटुंबिक वातावरण काळजीपूर्वक हाताळावे लागेल. सर्वाच्या मानापमानाच्या भावना जपताना आपली खरी कसोटी असेल. लहान-मोठा प्रवास कराल. युरिन इन्फेक्शन, जळजळ, पाठदुखी अंगावर काढू नका.

मिथुन बुध-नेपच्यूनच्या षडाष्टक योगामुळे दोनदा विचार करून मगच आपले म्हणणे मांडा. अन्यथा विचार व आचार यात तफावत जाणवेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. सहकारीवर्गाला अचानक आपल्या मदतीची गरज भासेल. हितशत्रूंकडून फसवणूक होण्याची शक्यता! जोडीदार आपल्या व्यस्त वेळापत्रकातूनही कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी वेळ काढेल. अतिविचार करून डोक्याला चिंता व ताण देऊ नका. वैचारिक विश्रांतीची गरज भासेल.

कर्क गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे धार्मिक, सामाजिक वा राजकीय क्षेत्रात कार्य कराल. बोलणी यशस्वी ठरतील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. नोकरी-व्यवसायात आíथक लाभ संभवतो. परंतु अतिरिक्त जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. सहकारीवर्गाला साहाय्य कराल. जोडीदाराची परिस्थिती समजून घ्याल. कुटुंबातील सदस्यांना दिलेला शब्द पाळा. त्यांच्या आवडीनिवडीनुसार लहानशा समारंभाचे आयोजन कराल. पोटाचे आरोग्य सांभाळा.

सिंह शुक्र-मंगळाच्या युतियोगामुळे आचार-विचारात कलात्मकता येईल. जोडीदाराची हौसमौज पुरवाल. स्वतच्याही आवडीनिवडी चोखंदळपणे जोपासाल. मनाजोगती खरेदी कराल. नोकरी-व्यवसायात मोठय़ा उत्साहाने नव्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवाल. सहकारीवर्ग कायदे क्षेत्रातील औपचारिकता पूर्ण करण्यात साहाय्य करेल. कौटुंबिक वातावरण आनंदी व समाधानी राहील. उत्सर्जन संस्थेचे विकार सतावतील. योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.

कन्या चंद्र-शुक्राच्या लाभयोगामुळे उच्च अभिरुची जोपासाल. संगीत, वाचन, लेखन असे छंद मनाला आणखी उभारी देतील. नोकरी-व्यवसायात नव्या ओळखी लाभदायक ठरतील. सहकारीवर्ग आपले काम वेळेवर पूर्ण करेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. लहान-मोठे प्रवास कराल. वैचारिक पातळीवर चर्चा करून कौटुंबिक प्रश्न सोडवाल. अ‍ॅलर्जी, त्वचा विकार अंगावर काढू नका.

तूळ शुक्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे शुक्राच्या कलात्मकतेला हर्षलच्या शक्तीची जोड मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात ध्येयाकडे वाटचाल कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. सहकारीवर्ग एखाद्या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर घेऊन ती पूर्ण करून दाखवेल. कोर्ट-कचेरीची कामे वेग घेतील. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात प्रगती करेल. त्याच्या अधिकारात वाढ होईल. ओटीपोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना मन द्विधा होईल. मनात खळबळ उडेल. भावनांवर ताबा ठेवा. जिद्दीला चिकाटीची जोड द्यावी. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ कामाचा दबाव आणतील. आपल्या क्षमतेप्रमाणेच जबाबदारी स्वीकारा. सहकारीवर्ग आपल्या कामात साहाय्य करेल. जोडीदाराच्या मागण्या, हट्ट प्रेमाने पुरवाल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवण्याचा प्रयत्न कराल. पित्तप्रकोप टाळा. हृदय व मणका यांचे आरोग्य जपा.

धनू रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे अधिकारपद भूषवाल. कर्तृत्वाला नवी दिशा मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा चांगला पािठबा मिळेल. सहकारीवर्गाकडून अपेक्षित मदत वेळेवर मिळाल्यामुळे विशेष लाभ होतील. कौटुंबिक समस्या भेडसावतील. मित्रपरिवारासोबत मनमोकळी चर्चा कराल. समस्येवर तात्पुरता तरी उपाय सापडेल. जोडीदारासह विचारविनिमय करून काही महत्त्वाच्या बाबतींत पाऊल पुढे टाकाल. डोळ्यांची काळजी घ्यावी.

मकर बुध-प्लुटोच्या षडाष्टक योगामुळे भावंडांच्या समस्यांवर उपाय शोधावे लागतील. आणि यात यशही मिळेल. जुने त्वचा विकार पुन्हा डोकं वर काढतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण जाईल. तरीदेखील प्रयत्न न सोडता स्वतला कामात झोकून द्याल. सहकारीवर्गाची उल्लेखनीय साथ लाभेल. आपल्या व्यस्त दिनक्रमातून जोडीदारासाठी थोडा वेळ राखून ठेवाल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न कराल.

कुंभ मंगळ-हर्षलच्या अग्निराशीतून होणाऱ्या नवपंचम योगामुळे मंगळाच्या शक्तीला हर्षलच्या चेतनेची साथ मिळेल. धडाडी, उत्साह व इच्छाशक्ती प्रबळ होईल. नोकरी-व्यवसायात तंत्रज्ञानात प्रगती कराल. वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सहकारीवर्ग मदतीची तयारी दाखवेल. पण ऐन वेळी मदत मिळेलच असे नाही. त्यांच्यावर विसंबून राहू नका. पर्यायी योजना तयार ठेवा. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात जास्त व्यग्र असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाल.

मीन गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे विद्याव्यासंग जोपासाल. उच्चशिक्षणात प्रगती कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मते मान्य करावी लागतील. सहकारीवर्गाकडून फारशी अपेक्षा नको! महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकू नका. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. कुटुंबासाठी मौलिक योगदान कराल. मित्रमंडळी मदतीला धावून येतील. साथीजन्य विकारांपासून सावध राहा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2019 1:01 am

Web Title: astrology 23 to 29 august 2019
Next Stories
1 राशिभविष्य : दि. १६ ते २२ ऑगस्ट २०१९
2 राशिभविष्य : दि. ९ ते १५ ऑगस्ट २०१९
3 राशिभविष्य : दि. २६ जुलै ते १ ऑगस्ट २०१९
Just Now!
X