News Flash

दि. २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०१५

मेष : तुम्ही एका नवीन वळणावर येऊन पोहोचणार आहात.

01vijayमेष तुम्ही एका नवीन वळणावर येऊन पोहोचणार आहात. व्यापार-उद्योगात नेहमीची कार्यपद्धती बाजारामध्ये घडणाऱ्या घडामोडींमुळे फारशी उपयोगी पडणार नाही. त्याऐवजी काहीतरी नवीन आणि चांगले तुम्हाला करावेसे वाटेल. परंतु त्यातील यशाचे प्रमाण अनिश्चित असल्यामुळे दोन्ही डगरींवर हात ठेवायचे तुम्ही ठरवाल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या दुटप्पी धोरणाचा राग येईल. घरामध्ये नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याकरता वेळ आणि पसे राखून ठेवणे भाग पडेल. स्वत:च्या आवडीनिवडीवर मुरड घालावी लागेल.

वृषभ गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ज्या शुभ घटनेची वाट बघत होता त्यासंबंधी काही कार्यक्रम निश्चित झाल्यामुळे तुमचे मन शांत होईल. सकृद्दर्शनी सर्व काही चांगले वाटेल. व्यापार-उद्योगात कामकाज चांगले होईल, पण रोखीचे व्यवहार करताना तुमचे चित्त विचलित होऊ देऊ नका. नोकरीमध्ये जी कामे सहकाऱ्यांवर किंवा मध्यस्थांवर सोपवलेली असतील तर त्यावर अधूनमधून देखरेख ठेवा. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये सर्वाचे हट्ट पुरवण्याच्या मागे पसे कधी खर्च झाले याचा पत्ता लागणार नाही.

मिथुन एखाद्या कामामध्ये ज्या वेळी तुम्ही लक्ष घालता त्या वेळी कल्पकता आणि रसिकता याचा उत्तम वापर करता, पण त्या नादात कधी कधी दैनंदिनीकडे तुमचे कळत-नकळत दुर्लक्ष होते आणि नंतर त्याचा तुम्हाला त्रास होतो. व्यापार-उद्योगात फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता स्वत:ची टिमकी मिरविण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. पण स्पर्धक मात्र तुमच्या विरुद्ध कंडय़ा पसरविण्याचा प्रयत्न करतील. नोकरीमध्ये घाईगडबडीमध्ये वरिष्ठांच्या सूचना विसरून जाऊ नका. बेकार व्यक्तींना काम मिळेल.

कर्क ज्या वेळी इतरांना तुमच्याकडून मदत हवी असते त्या वेळी खुशामत करून ते तुम्हाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण मतलब साध्य झाल्यानंतर तुम्हाला सहजगत्या विसरतात. व्यवसाय-उद्योगातील नवीन कामाविषयी बोलणी करून ठेवा, परंतु त्याचे व्यवहार आहे त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. दैनंदिन कामात उत्पन्न चांगले असल्याने तुम्हाला पशाची चिंता वाटणार नाही. नोकरीच्या ठिकाणी तुमची संस्था आणि वरिष्ठ यांच्याविषयी मतप्रदर्शन करताना सावध राहा. घरामध्ये सर्व काही चांगले असेल.

सिंह ज्या कामात उत्सुकता खूप ताणली गेलेली होती अशी कामे मार्गी लागायला सुरुवात होईल. पशाविषयी तुमच्या राशीला बरेच आकर्षण असते. व्यापार-उद्योगात नेहमीपेक्षा जास्त पसे मिळविण्याचा तुमचा बेत असेल तर त्याला पूरक अशी एखादी संधी चालून येईल, पण थोडे पुढे गेल्यानंतर दिसते तसे नसते म्हणून जग फसते याचा अनुभव येण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये अधिकाराचा योग्य कारणाकरिताच वापर करा. घरामध्ये नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्याशी जपून बोला. तुमची प्रतिष्ठा पणाला लागण्याची शक्यता आहे.

कन्या तुमच्या मनामध्ये एखाद्या प्रिय व्यक्तीच्या किंवा घटनेच्या बाबतीत चिंता राहील. व्यवसाय-उद्योगात कामाचा डोलारा जरी मोठा दिसला आणि पसे जरी जास्त मिळाले तरी अनपेक्षित कारणांकरिता ते पसे खर्च करावे लागतील. नोकरीमध्ये मौजमजेच्या वेळेला सर्वजण पुढे येतील, पण कामाच्या वेळी मात्र सहकारी मागे हटतील. घरामध्ये किरकोळ कारणांवरून जोडीदाराशी रुसवेफुगवे होतील. शेजारी आणि ओळखीच्या व्यक्तींच्या बाबतीत विचित्र अनुभव येईल.

तूळ ग्रहमान चांगले लाभले की माणसाच्या इच्छा-आकांक्षा वाढायला सुरुवात होते आणि मारुतीच्या शेपटीप्रमाणे त्या लांबत जातात. व्यापार-उद्योगात काम चांगले होईल, परंतु खेळत्या भांडवलासाठी कर्ज काढावे लागेल. त्याची परतफेड वेळेत करा. नोकरीमध्ये चांगले काम करूनही वरिष्ठ त्याची दखल घेणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला राग येईल. घरामध्ये नवीन वाहन, वास्तू अशा गोष्टींकरिता गुंतवणूक करावीशी वाटेल. मात्र तेथे ‘नाकापेक्षा मोती जड’ असा प्रकार होऊ देऊ नका. नातेवाईक, आप्तेष्ट यांची असूया जाणवेल.

वृश्चिक ज्या व्यक्तींकडून मदत मिळण्याची अपेक्षा ठेवली होती त्यांच्याकडून मदत न मिळाल्याने तुमची निराशा होईल, पण अनपेक्षित मार्गाने कोणीतरी आयत्या वेळी साथ दिल्याने तुम्हाला बरे वाटेल. व्यापार-उद्योगात बरेच काही करायची इच्छा असेल. परंतु काही अनपेक्षित अडथळ्यांमुळे फेरफार करावे लागतील. आíथक गुंतवणूक करताना स्वत:च्या मर्यादांचा नीट विचार करा. नोकरीमध्ये संस्थेकडून मिळणाऱ्या सवलतींचा आणि अधिकारांचा गरजेपेक्षा जास्त वापर कराल. घरामध्ये सगळ्यांची मने सांभाळाल.

धनू एकीकडे भरपूर काम तुमच्या वाटय़ाला आलेले असल्यामुळे त्यात जास्तीत जास्त वेळ घालविणे आणि मेहनत करणे आवश्यक होईल. तर दुसरीकडे मौजमजेचा मोहही अनावर होईल. व्यापार-उद्योगात विक्री वाढविण्यासाठी अधिक मेहनत घ्याल. शक्यतो रोखीच्या व्यवहारांना प्राधान्य द्याल. नोकरीमध्ये एखाद्या कामाच्या निमित्ताने वरिष्ठ तुमची बडदास्त ठेवतील. तुम्ही केलेला आळस मात्र त्यांना आवडणार नाही. घरामध्ये तुम्ही प्रत्येकाचे मानपान सांभाळाल, पण त्यात उणीव राहिल्यास टीका करण्याची संधी मिळेल.

मकर ज्या गोष्टी तुम्ही इतरांवर अवलंबून ठेवाल त्या तुमच्या पद्धतीने पार न पडल्याने मनावर एक प्रकारचा दबाव राहील. व्यापार-उद्योगात इतर वेळेला हातात आलेले गिऱ्हाईक तुम्ही सोडायला तयार होत नाही, पण या आठवडय़ात गिऱ्हाईकच तुम्हाला काही थापा मारून किंवा प्रलोभने दाखवून तुमच्याकडून जास्त सवलती मिळवतील. नोकरीमध्ये वरिष्ठांविषयी किंवा संस्थेविषयी मतप्रदर्शन करू नका. घरामध्ये नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्याबरोबर गळ्यात गळे घालायला जाऊ नका.

कुंभ तुमची दैनंदिनी तुम्हाला फारसे स्वातंत्र्य देणार नाही, त्यामुळे थोडीशी चिडचिड होईल. व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण वाढत राहिल्याने भरपूर पसे मिळण्याची तुम्हाला खात्री वाटेल, पण प्रत्यक्षात उधारीचे व्यवहार जास्त होतील. रोखीचे व्यवहार हाताळताना तुमचे चित्त विचलित होऊ देऊ नका. नोकरीमध्ये जे काम इतरांच्या दृष्टीने कठीण होते ते तुम्ही लवकर पूर्ण करून दाखवाल. पण त्यासंबंधी बढाया मारल्यात तर ते इतरांना सहन होणार नाही. घरामध्ये पाहुण्यांची मानपान सांभाळणे थोडेसे जड जाईल.

मीन कधी कधी भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही योग्य काय आणि अयोग्य काय हे विसरून एखादी चूक करता. नंतर त्याचा तुम्हाला पश्चात्ताप होतो. नोकरीमध्ये आयत्या वेळी वरिष्ठांनी त्यांचा बेत बदलल्यामुळे केलेल्या मन लावून केलेल्या कामाचे फारसे महत्त्व राहणार नाही. नवीन नोकरी स्वीकारताना कामासंबंधी नीट माहिती करून घ्या. घरामध्ये तुमच्या प्रेमळ आणि दिलदार स्वभावाचा सर्वजण उपयोग करून तुमच्यावरील कामाचा ताण वाढवतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 1:03 am

Web Title: astrology 24
टॅग : Astrology,Bhavishya
Next Stories
1 दि. १८ ते २४ सप्टेंबर २०१५
2 दि. ११ ते १७ सप्टेंबर २०१५
3 दि. ४ ते १० सप्टेंबर २०१५
Just Now!
X