28 February 2020

News Flash

राशिभविष्य : दि. २४ ते ३० मे २०१९

हाती घेतलेले काम पूर्ण करणे दिसते तेवढे सोपे नाही याची जाणीव होईल.

मेष

हाती घेतलेले काम पूर्ण करणे दिसते तेवढे सोपे नाही याची जाणीव होईल. सातत्य जपणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात नव्या गोष्टींची सुरुवात आनंदाने कराल. सहकारीवर्गाला हवी असलेली सर्व प्रकारची मदत कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदार त्याच्या व्यापात मग्न असेल. घशाचे आरोग्य जपा. साथीचे आजार होण्याच्या शक्यता आहेत. रक्त तपसण्या करून घ्याव्यात.

वृषभ

बुध-नेपच्यूनच्या केंद्र योगमुळे आपल्या कार्यक्षेत्रात जगावेगळी झेप घ्याल. लेखन, संशोधन यात मोलाचे कार्य कराल. मनासारखे यश न मिळाल्याने चिडचिड होईल. नोकरी- व्यवसायात वरिष्ठ पाठिंबा देतील. सहकारीवर्गाची चांगली मदत मिळेल. आपणही त्यांना मदत कराल. जोडीदार आपल्या भावना समजून घेईल. घरातील ज्येष्ठांना वेळ द्यावा लागेल. कौटुंबिक वातावरण गडबडीचे जाईल. अचानक लघवीचे विकार उद्भवतील. जाणकारांचा सल्ला घ्यावा.

मिथुन

भाग्यस्थानातील चंद्र-नेपच्यून युती योगामुळे कामात नवीन प्रेरणा मिळेल. कलेला वाव मिळेल. नोकरी-व्यवसायात आपले म्हणणे वरिष्ठांना मान्य होईल. सहकारीवर्गाची बाजू स्पष्टपणे मांडाल, याचा त्यांना चांगला फायदा होईल. जोडीदारासह असलेल्या मतभेदांवर शांतपणे विचार करावा लागेल. कौटुंबिक वातावरण ठीक राहील. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. रक्ताभिसरण वा उत्सर्जन संस्थेचे त्रास उद्भवतील.

कर्क

चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे दुसऱ्याला मदत करण्याच्या संधीचा लाभ घ्याल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणे कठीण जाईल. प्रयत्न करा पण अट्टहास नको. सहकारीवर्ग मदतीसाठी सज्ज असेल. जोडीदार आपलेच म्हणणे खरे करेल. तूर्तास तरी त्याचे ऐकून घेण्याशिवाय पर्याय नाही. कौटुंबिक वातावरण तणावरहित करण्याचा प्रयत्न कराल. मानसिक त्रास सहन करावे लागतील.

सिंह

रवी-चंद्राच्या केंद्र योगामुळे नव्या तसेच नावीन्यपूर्ण गोष्टींची सुरुवात मोठय़ा उमेदीने कराल. आत्माकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र हे एकमेकांना पोषक ठरतील. आपल्या कामाच्या उत्साहाने वरिष्ठांचे मन जिंकाल. सहकारीवर्गाला सर्वतोपरी मदत कराल. ते या मदतीची परतफेड योग्य वेळी करतील. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही ठेवाल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. आरोग्य चांगले राहील. नियमित व्यायाम करणे मात्र आवश्यक.

कन्या

बुध-शनीच्या षडाष्टक योगामुळे समाजात राहण्यापेक्षा एकटे राहून विचार करणे पसंत कराल. न उलगडणारी कोडी नक्की उलगडतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ कामाचा किंवा वेळेचा दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. न डगमगता सामोरे जावे. तृतीय (पराक्रम) स्थानातील गुरू साहाय्यकारी ठरेल. कौटुंबिक वातावरण हलके करण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराची चांगली साथसंगत लाभेल

तूळ

शुक्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे आवडत्या कामात मन रमेल. आपल्या छंदाला योग्य न्याय द्याल. नोकरी-व्यवसायात कल्पक, नावीन्यपूर्ण गोष्टी अमलात आणाल. इतरांनाही याचा फायदा होईल. सहकारीवर्गाच्या हिताचा विचार कराल. घरात मात्र जोडीदाराला समजून घेणे कठीण जाईल. तरीदेखील प्रयत्न सोडू नका. विचारांतीच निर्णय घ्या. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कोणत्याही मुद्दय़ावर सध्या तरी चिकित्सक चर्चा टाळावी.

वृश्चिक

गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे दुसऱ्याला मदत करण्याची तयारी दाखवाल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. हातून दानधर्म होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा चांगला पािठबा मिळेल. सहकारीवर्गाकडून फार मोठय़ा अपेक्षा ठेवूच नका. जोडीदाराला त्याची मते व्यक्त करण्याची संधी द्याल. त्याच्या मतांवर सारासार विचारदेखील कराल. कौटुंबिक वातावरणात संतुलन राखाल. पित्तविकार व मूत्रविकार यासंबंधी काळजी घ्यावी.

धनू

एका वेळी अनेक कामे हाती घ्याल. प्रत्येक कामाला न्याय देताय ना याची खबरदारी घ्या. डोक्यात विविध विचारांचे जाळे तयार होण्याची शक्यता आहे. या जाळ्यात गुरफटून जाऊ नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील. सहकारीवर्ग साहाय्य करण्याची तयारी दाखवेल. जोडीदाराच्या लहान-मोठय़ा अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न कराल. विचारांती आणि चच्रेने त्यावर उपाय सुचवाल. डोळ्यांची काळजी घ्या.

मकर

शनी-बुधाच्या षडाष्टक योगामुळे समाजात मिसळण्यापेक्षा एकटे राहणे पसंत कराल. लहान-मोठे प्रवास कराल. आपल्याला आवडेल अशा गोष्टींमध्ये रमून जाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ दबाव आणतील. खचून जाऊ नका. लाभस्थानातील गुरू पाठबळ देईल. तसेच सहकारीवर्गाचे सहकार्य मिळेल. जोडीदार आपल्याला नीट समजून घेईल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही ठेवण्याचा प्रयत्न कराल. वात, पित्तविकार होण्याची शक्यता.

कुंभ

चंद्र-नेपच्यूनच्या युती योगामुळे मानसिक शक्ती वाढेल. स्फूर्तिदायी व प्रेरणादायी घटना घडतील. परोपकार कराल. कलेच्या उपासनेत वेळ सत्कारणी लावाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची वाहवा मिळवाल. सहकारीवर्ग अपेक्षित साथ देणार  नाही. जोडीदाराच्या साहाय्याने कौटुंबिक समस्यांवर हळुवारपणे उपाय शोधाल. याचा कुटुंबातील नातेसंबंधांवर चांगला परिणाम दिसून येईल. मनस्वास्थ जपावे लागेल. जास्त चिकित्सा टाळा.

मीन

चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे विद्याव्यासंगात मन रमवाल. हातून धार्मिक गोष्टी घडतील. मानसिक आनंद मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताप्रमाणे कृती करावी लागेल. सहकारीवर्गाच्या समस्या वरिष्ठांपुढे मांडण्याचे धाडस कराल. जोडीदाराचा भावनिक आधार आपल्यासाठी लाखमोलाचा ठरेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कामाचा ताण घेऊ नका.

First Published on May 24, 2019 12:02 am

Web Title: astrology 24 to 30 may 2019
Next Stories
1 राशिभविष्य : दि. १७ ते २३ मे २०१९
2 राशिभविष्य : दि. १० ते १६ मे २०१९
3 राशिभविष्य : दि. ३ ते ९ मे २०१९
Just Now!
X