सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष शनी-चंद्राच्या लाभयोगामुळे नेहमीपेक्षा थोडा जास्त विचार करून पुढचे पाऊल टाकाल. कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य द्याल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा कराल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल.  चिकाटी सोडू नका. सहकारीवर्गाच्या समस्या समजून त्यांचे प्रश्न व्यवस्थापकांपुढे मांडाल. जोडीदाराचे मत पटले नाही तरी त्याचे म्हणणे ऐकून घ्याल. कौटुंबिक वातावरण उत्साही व नियमबद्ध ठेवाल. अपचनाचा त्रास होईल.

वृषभ चंद्र-गुरूच्या केंद्रयोगामुळे आपल्या कार्याला राजाश्रय मिळेल. लोकांना उपयोगी पडेल असे उपक्रम राबवाल. नोकरी-व्यवसायात आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती कराल. बौद्धिक व आíथक लाभ होतील. सहकारीवर्गाच्या वतीने झगडून त्यांचे हक्क त्यांना मिळवून द्याल. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. समजून घ्याल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे बनवाल. कुटुंब सदस्यांसह संवाद साधाल. ओटीपोटासंबंधित त्रास उद्भवतील. वैद्यकीय सल्ला आवश्यक!

मिथुन चंद्र-नेपच्युनच्या समसप्तम योगामुळे नव्या कामासाठी चेतना मिळेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. नावीन्याकडे कल असेल. नोकरी-व्यवसायात मनाप्रमाणे निर्णय न घेता आल्यास दु:ख करत बसू नका. पर्यायी मार्ग शोधाल. यात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारीवर्गाकडून साहाय्याची अपेक्षा सध्या तरी न ठेवणे! जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रश्नांनी त्रस्त असेल. आपल्या अडचणी त्याला सांगण्याची ही वेळ नव्हे! कुटुंब सदस्यांना योग्य मार्गदर्शन कराल.

कर्क चंद्र व शुक्र या दोन स्त्री-ग्रहांच्या युतीयोगामुळे चोखंदळपणे खरेदी करण्याचा आनंद लुटाल. कलाक्षेत्रात प्रगती कराल. नोकरी-व्यवसायात आनंदाने व उत्साहाने कामाच्या ठिकाणाचे रूप पालटाल. वरिष्ठांच्या संमतीने नव्या योजना अमलात आणाल. सहकारीवर्गाला मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराची अभिरुची जपाल. एकमेकांसह वेळ आनंदात घालवाल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. आरोग्याच्या किरकोळ वाटणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको.

सिंह रवी-हर्षलाच्या षडाष्टक योगामुळे सारासार विचार न करता घाईघाईने निर्णय घ्याल. हेकेखोरपणे आपले विचार इतरांवर लादू नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताप्रमाणे वागावे लागेल. ज्येष्ठ मंडळी मोलाचा सल्ला देतील. सहकारीवर्गासह व्यवहार करताना रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या इतक्या वेगाने इतरांना धावता येत नाही या विचारांनी चिडचिड होईल. जोडीदार आपल्याला समजून घेईल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल.

कन्या रवी-चंद्राच्या युतीयोगामुळे संसर्गजन्य आजाराला बळी पडाल. प्रतिकारशक्ती कमी होईल. मानसिक दगदग कमी करा. नोकरी-व्यवसायात कायद्याच्या विरोधात जाऊन कोणत्याही गोष्टी करू नका. अंगाशी येतील. सहकारीवर्ग मदत करेल, पण त्याच्याही काही मर्यादा असतील. स्वत:च्या बळावर जी झेपेल तीच आणि तेवढीच जबाबदारी स्वीकारा. मनोधर्य वाढवा.

तूळ चंद्र-नेपच्युनच्या नवपंचम योगामुळे बौद्धिक पातळी उंचावेल. कलेला पोषक वातावरण मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रेरणादायी घटना घडतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नवनिर्मितीचा आनंद मिळेल. सहकारीवर्गाकडून अपेक्षित साहाय्य मिळेल. कामाला गती येईल. जोडीदार आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडेल. आपल्यावरील भार हलका करेल. ज्येष्ठ कुटुंब सदस्यांची काळजी घ्यावी लागेल. पचन व उत्सर्जन संस्था जपावी.

वृश्चिक शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे कष्टाची तयारी दाखवाल. लांबणीवर पडलेल्या कामांना गतिमान कराल. नोकरी-व्यवसायात भरीव कार्य कराल. एखाद्या गोष्टीचा नुसताच विचार न करता ती आचरणातही आणाल. सहकारीवर्गासह प्रगतिपथावर वाटचाल कराल. जोडीदार आपली स्थिती समजून घेईल. त्याची बाजूदेखील ऐकून घेणे आवश्यक! रागावर व शब्दांवर नियंत्रण ठेवा. मित्र परिवार योग्य सल्ला देईल. पित्तविकार डोके  वर काढतील.

धनू चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे जोम व जोश वाढेल. उत्साहात नव्या कामाला सुरुवात कराल. पण सातत्य राखणे आवश्यक! उतावळेपणा उपयोगाचा नाही. नोकरी-व्यवसायात अडचणींवर मात करावी लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळून निर्णय घ्यावे लागतील. सहकारीवर्ग मदत करण्यासाठी सज्ज असेल. जोडीदारासह वाद न घालता संवाद साधण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. सर्दी, पडसे, अंग दुखणे, श्वसनाचे त्रास यांवर उपाय करा.

मकर गुरू-चंद्राच्या लाभयोगामुळे अडल्यानडल्याची सेवा कराल. जुन्या परंपरा जपाल. नातेवाईकांना मदत कराल. सत्त्वगुणांचा विकास होईल. काटकसर करून कुटुंबातील सदस्यांना बचतीचे महत्त्व पटवून द्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारीवर्ग बहुमोल साहाय्य करेल. आपण त्यांचे कृतज्ञ व्हाल. माणुसकीची जाण ठेवाल. कौटुंबिक समस्या शांतपणे सोडविण्यासाठी घरच्यांशी संवाद साधाल. उत्सर्जन संस्थेशी निगडित प्रश्न उद्भवतील.

कुंभ चंद्र-बुधाच्या युतीयोगामुळे चौकस वृत्ती व समयसूचकता यांचा विशेष लाभ होईल. अभ्यासपूर्वक लेखन कराल. नोकरी-व्यवसायात बरेचसे मुद्दे प्रभावीपणे मांडाल. काम व इतर जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाल. सहकारीवर्ग बाकीच्या कामात व्यस्त असल्याने आपली कामे वेळेत पूर्ण करणे जरा कठीण जाईल. जोडीदाराच्या कामात काही अडचणी आल्याने तो चिंतित असेल. अशा वेळी आपला धीराचा शब्द त्याला भावनिक आधार देईल. अपचनाचा त्रास संभवतो.

मीन गुरू व शुक्र या दोन नसíगक शुभग्रहांच्या शुभयोगामुळे वेळेवर मदत मिळेल. हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना आपले मत पटेल. काही जुनी कामे मात्र लांबणीवर पडतील. सहकारीवर्ग आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडतील. त्यांची बाजू ऐकून घ्याल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. पोटाचे विकार बळावतील. औषधोपचार करावा.