News Flash

राशिभविष्य : दि. २८ जून ते ४ जुलै २०१९

रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे बरीचशी कामे झटपट हातावेगळी कराल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे बरीचशी कामे झटपट हातावेगळी कराल. मानसिक संघर्ष कमी होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना आपले म्हणणे समजावून द्याल. ज्येष्ठ जाणकारांचा सल्ला उपयोगी ठरेल. सहकारी वर्गाच्या मदतीसाठी विशेष मेहनत घ्याल. जोडीदाराची जी मते आपल्याला पटत नाहीत त्यावर सध्या तरी चर्चा नको. इतर बाबींमध्ये एकमेकांना चांगली साथ द्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील.

वृषभ चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे मनोबल वाढेल. संवेदनशील क्षेत्रात विशेष प्रगती कराल. कला, लेखन, सादरीकरण यात आपला ठसा उमटवाल. नोकरी-व्यवसायात परदेशासंबंधित कामांना गती मिळेल. सहकारी वर्ग वेळेत काम पूर्ण करेल. जोडीदारासह ठरवल्याप्रमाणे गोष्टी कृतीत आणाल. घरासाठी नवीन वस्तूंची खरेदी कराल. कुटुंबासाठी खर्च कराल. एकंदरीत घरातील वातावरण आनंदी राहील. डोळ्यांचे आरोग्य जपावे लागेल.

मिथुन चंद्र-हर्षलच्या लाभयोगामुळे मानसिकतेला शक्ती व वेग मिळेल. आपल्या ज्ञानपिपासू वृत्तीला हा योग पोषक ठरेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ चांगले मिळेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. सहकारी वर्ग मदत मागेल. मित्रमंडळींकरता अचानक धावपळ करावी लागेल. खर्च समोर उभे ठाकतील. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रश्न भेडसावतील. त्याची स्थिती समजून घेणे आवश्यक. छाती भरून येणे, श्वास लागणे याकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क चंद्र-मंगळाच्या युती योगामुळे कष्ट करण्याची तयारी दर्शवाल. मनोधर्य वाढेल. करार करताना व्यवहारकुशलता दाखवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांसह वाद न घालता त्यांच्या म्हणण्यानुसार वागावे. सहकारी वर्ग मदत करणे टाळतील. सध्या तरी त्यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा न ठेवणे उत्तम! जोडीदाराच्या भावनांचा मान राखाल. त्याला योग्य मार्गदर्शन कराल. परदेशी प्रवासाचे योग येतील. वेळेवर जेवण व पुरेशी झोप घेतल्यास आरोग्य चांगले राहील.

सिंह रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे मन आनंदी व उत्साही राहील. प्रगतीचा मार्ग सुकर होईल. नोकरी-व्यवसायात डोळे व कान उघडे ठेवून अंतिम निर्णय घ्याल. एखाद्या करारातील छुप्या अटींचा साकल्याने अभ्यास करा. सहकारी वर्गाच्या अडचणी दूर करताना आपल्यावरच काही बेतणार नाही ना, याची खबरदारी घ्यावी. जोडीदाराची साथ चांगली लाभेल. एकमेकांना सांभाळून घ्याल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी उद्भवतील.

कन्या चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे नावीन्यपूर्ण कल्पना सुचतील. नोकरी-व्यवसायातील चालू प्रकल्पात याचा उपयोग होईल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गासह वाद नको. जोडीदार आपली परिस्थिती समजून घेईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. संसर्गजन्य विकारांची लागण होऊ शकते. काळजी घ्यावी. लवकर उतार पडेल.

तूळ चंद्र-हर्षलच्या लाभयोगामुळे कला व बौद्धिक क्षेत्रात विशेष लाभ होतील. अद्ययावत तंत्रज्ञानाचा आणि कलात्मक दृष्टीचा सुंदर मिलाफ दिसून येईल. नोकरी-व्यवसायात लाभ स्थानातील राहू व्यवहाराची बाजू चांगली सांभाळेल. सहकारी वर्गाकडून वेळेपूर्वी कामे पूर्ण करून घ्याल. जोडीदार आपला हट्ट बाजूला ठेवून सर्वाच्या भल्यासाठी पावले उचलेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. आíथक गुंतवणूक कराल. प्रदूषित पाण्यामुळे पोटाच्या तक्रारी उद्भवतील.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या युतीयोगामुळे धाडसी व आग्रही वृत्तीला जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेल्या कामांचा वेग वाढेल. अडीअडचणींवर मात कराल. सहकारी वर्गाचा सल्ला फायदेशीर ठरेल. जोडीदारासह वाद न घालता त्याचे म्हणणे ऐकून घ्याल. एकमेकांच्या भावना समजून घ्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कुटुंबीयांवर हुकमत गाजवू नका. सर्दी, पडसे, अचानक घसा धरणे यांसारख्या आरोग्यविषयक तक्रारी भेडसावतील.

धनू शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे चंद्राच्या चंचल वृत्तीला शनीच्या संयमाचा लगाम बसेल. कर्तव्याला प्राधान्य द्याल. नोकरी-व्यवसायातील चिवट, रटाळ कामे चिकाटीने पूर्ण कराल. वरिष्ठांचे मन जिंकाल. सहकारी वर्गाकडून कामात चालढकल होईल. त्यामुळे आपल्या कामाचा वेग मंदावेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रातील समस्यांमुळे त्रस्त असेल. त्याची चिडचिड होईल. कुटुंब सदस्यांसह मोकळा संवाद साधणे आवश्यक!

मकर शनीच्या साडेसातीमुळे कार्यपथावर गतिरोधक निर्माण होतील. तरी सातत्य सोडू नका. प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. नोकरी-व्यवसायात स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या विशेष मेहनतीने पूर्ण कराल. सहकारी वर्ग वेळोवेळी मदतीसाठी पुढे येईल. जोडीदारासह भविष्यातील गोष्टींचा आराखडा रेखाटाल. त्याप्रमाणे आíथक नियोजन कराल. कुटुंबासाठी धावपळ करावी लागेल. मानसिक ताण न घेता धीराने घ्याल. नेत्रविकार सतावतील.

कुंभ चंद्र-हर्षलच्या लाभयोगामुळे बौद्धिक छंदासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवाल. नावीन्यपूर्ण संकल्पना अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. ज्येष्ठ जाणकारांचे मार्गदर्शन प्रगतीची दिशा दाखवेल. सहकारी वर्ग हवी तशी साथ देणार नाही. पण अडून राहू नका. जोडीदाराच्या समस्या समजून घ्या. मित्र, नातेवाईक यांच्यासाठी वेळ व पसा खर्च करावा लागेल. मानसिक ताण मोकळ्या चच्रेने दूर कराल. छंदात मन रमवाल.

मीन चंद्र-मंगळाच्या युतीयोगामुळे व्यावहारिक दृष्टिकोन ठेवाल. आपल्यातील सात्त्विक गुणांना मंगळाच्या उत्साहाची व हिमतीची जोड मिळेल. गरजूंना मदत कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मत मान्य करावे लागेल. अडचणींना धर्याने सामोरे जाल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. मणक्याचे आरोग्य जपा. औषधोपचार व व्यायाम उपयोगी पडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 1:01 am

Web Title: astrology 28th june to 4th july 2019
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २१ ते २७ जून २०१९
2 राशिभविष्य : दि. १४ ते २० जून २०१९
3 राशिभविष्य : दि. ७ ते १३ जून २०१९
Just Now!
X