सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष मेहनतीला हुशारीची जोड मिळेल. त्यामुळे प्रयत्न सफल होतील. कर्तृत्वाला यशाची किनार लाभेल. नोकरी-व्यवसायात बढती मिळेल. रेंगाळलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. सहकारी वर्गाला कामासाठी उद्युक्त कराल. जोडीदाराच्या भावभावनांची कदर कराल. एकमेकांचे सूर चांगले जुळतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. धूळ, माती, गंध यांच्या अ‍ॅलर्जीपासून स्वत:ला जपणे आवश्यक!

वृषभ : नुसते काम एके काम न करता जीवनाचा आनंदही लुटाल. आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासह मजेत वेळ घालवाल. यातूनच इतरांना मदतीचा हात पुढे कराल. नोकरी व्यवसायात व्यवहारीपणाने बुद्धिचातुर्याचा वापर कराल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने वरिष्ठांच्या मर्जीनुसार कामे पूर्ण कराल. जोडीदाराची उत्साही साथसोबत लाभेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. आरोग्य चांगले राहील.

मिथुन : कष्टाचे चीज झाल्याचे समाधान लाभेल. हातून समाजकार्य होईल. धार्मिक यात्रा घडतील. काळाच्या पुढे जाऊन काही विचार मांडाल. पण ते सर्वानाच पटतील, रुचतील असे नाही. नोकरी व्यवसायात कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. जोडीदार नेहमीपेक्षा जास्त व्यस्त राहील. आपल्याला फारसा वेळ देऊ शकणार नाही. एकमेकांना समजून घ्यायची हीच वेळ आहे!

कर्क : केलेल्या कामाचे कौतुक होणे आणि त्यातून आर्थिक लाभ होणे म्हणजे दुग्धशर्करा योगच! नोकरी व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाला आपल्या अधिकार पदावरून चांगली मदत कराल. कुटुंबातील ताणतणाव वैयक्तिक पातळीवर चर्चा करून कमी करायचा प्रयत्न कराल. आपल्या विचारांशी जोडीदार सहमत नसेल. त्याला म्हणणे समजावून सांगाल. त्याचे जोडीदाराचे म्हणणे ऐकून घ्याल. आपले मानसिक स्वास्थ्य जपा.

सिंह : केलेल्या कामाचा अपेक्षित मोबदला मिळणे यासारखा दुसरा आनंद नाही. स्वत: पुढाकार घेऊन रखडलेली कामे हातावेगळी कराल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्ग योजलेली कामे वेळेत पूर्ण करेल. जोडीदाराच्या बुद्धिचातुर्यामुळे अडचणींवर मात करता येईल. एकमेकांच्या गुणांचे कौतुक कराल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. ज्येष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. व्यायामाच्या सवयीमुळे आरोग्य चांगले राहील.

कन्या : वरिष्ठांच्या मताप्रमाणे काम करून त्यांची वाहवा मिळवाल. सहकारी वर्गाच्या मदतीने प्रगतीपथावर वाटचाल कराल. जोडीदाराशी मतभेद झाले तरी त्याच्या बद्दलचा आदर कायम राहील. नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र मैत्रिणी यांच्या भेटीगाठीतून आनंद मिळवाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रवासात येणाऱ्या अडचणींवर मात कराल.

तूळ : हाती घेतलेल्या कामांचा वेग वाढेल. वेळेचा सदुपयोग कराल. स्वत:साठी आणि आप्तेष्टांसाठी वेगळा वेळ काढून ताणतणावापासून दूर राहाल. कलेच्या क्षेत्रात नव्या कल्पना अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. सहकारी वर्गाची मनधरणी करावी लागेल. जोडीदाराचे प्रेमाचे नाते अलगद हाताळावे लागेल. त्याचा रुसवा दूर करण्यासाठी त्याच्या मनाप्रमाणे वागाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील.

वृश्चिक : शैक्षणिक किंवा क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवाल. कष्टाचे चीज झाल्याचा आनंद इतरांसमवेत शेअर कराल. आपल्या प्रत्येक कार्यात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी उत्साह वाढवतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि समाधानी राहील. जीवनाकडे सकारात्मकतेने बघाल. नोकरी-व्यवसायात जास्तीच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. चिडचिड नको.

धनू : कामातील तोच तोपणाचा कंटाळा आल्याने नव्या वाटा शोधाल. हाती घेतलेले काम नव्या पद्धतींचा अवलंब करून पुढे न्याल. वरिष्ठांची नाराजी पत्करून परंतु सहकारी वर्गाच्या मदतीने कामे पूर्ण कराल. वेळेचे भान राखाल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. धकाधकीच्या जीवनातही आनंद मिळवाल. जोडीदाराच्या तटस्थ आणि व्यावहारिक निर्णयांबाबत नाराजी व्यक्त कराल. कौटुंबिक वातावरण मात्र आनंदी आणि खेळकर राहील.

मकर : कोणत्याही कामाच्या पूर्ततेसाठी जीवापाड मेहनत घ्याल. या मेहनतीला समर्पक विचारांची जोड द्याल. कोणावरही अन्याय होणार नाही याची खात्री बाळगाल. आपले धीराचे दोन शब्द कुटुंबीयांचा आत्मविश्वास वाढवतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ पाठीशी उभे राहतील. सहकारी वर्गाचे योग्य वेळी साहाय्य मिळेल. जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रात व्यस्त असल्याने त्याला समजून घ्यावे लागेल. आरोग्य ठीक राहील.

कुंभ : ‘एक मार्गी आपले आपण काम करत राहणे’ हा आपला स्वभाव! तत्परता आणि अचूकपणा यांमुळे नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची वाहवा मिळवाल. नेहमीपेक्षा मोठय़ा आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सहजपणे पार पाडाल. कुटुंबातील सदस्यांसह वैचारिक चर्चा रंगतील. नव्या-जुन्या मतप्रवाहांचा संगम साधाल. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. अडीअडचणीतून मार्ग काढून पुढे जाल. अनारोग्याची चाहूल लागताच वैद्यकीय मदत घ्यावी.

मीन : वैचारिक गोंधळामुळे गडबडून न जाता ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन योग्य वेळी कामी येईल. कामासाठी लहान-मोठे प्रवास कराल. प्रवासाची तसेच कामाची तयारी चांगल्या प्रकारे करा. अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागेल. जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा. आपले विचार, भावना योग्य शब्दांत मांडाल.