18 February 2019

News Flash

भविष्य : २९ जून ते ५ जुलै २०१८

कोणत्याही व्यक्तीला कधीही मदत लागली तरी ती करायला तुम्ही तत्पर असता.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष कोणत्याही व्यक्तीला कधीही मदत लागली तरी ती करायला तुम्ही तत्पर असता. या तुमच्या गुणांचे कौतुक होईल. व्यापार-उद्योगात तुमच्या कष्टापेक्षा तुमचे नियोजन आणि दूरदृष्टी उपयोगी पडेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतील. घरामधील वयोवृद्ध व्यक्तीच्या सल्ल्याचा तुम्हाला उपयोग होईल. नवीन जागा खरेदी करताना कागदपत्रे नीट तपासून बघा.

वृषभ थोडासा आराम करण्याची इच्छा जागृत होईल. अशावेळी कामाच्या वेळी काम आणि इतर वेळेला आराम असा सुवर्णमध्य तुम्ही निवडून काढाल. व्यापार-उद्योगात नवीन पद्धतीचे काम नाइलाजाने सुरू करावे लागेल. जुन्या ओळखी तुम्हाला उपयोगी पडतील. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या निमित्ताने वरिष्ठ जादा सवलत द्यायला तयार होतील. त्याचा योग्य कारणाकरिता उपयोग करा. घरामध्ये पूर्वी लांबलेले कार्य निश्चित होईल.

मिथुन गेल्या एक-दोन आठवडय़ामध्ये तुम्हाला झालेल्या मनस्तापाची तीव्रता कमी होईल. व्यापार-उद्योगातील सरकारी अडथळे दूर झाल्यामुळे प्रगतीचा मार्ग खुला होईल. पशाची आवक वाढल्यामुळे केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमच्या कामाचे महत्त्व पटल्यामुळे तुम्हाला आवश्यक ते स्वातंत्र्य मिळेल. घरामधील मतभेद वरिष्ठांच्या सल्ल्यामुळे कमी होतील.

कर्क मनामध्ये जे विचार असतील ते कृतीमध्ये आणण्याकरिता जे धाडस लागते ते मिळविण्याकरिता विशेष कष्ट पडतील. व्यापार-उद्योगातील तुमचे बेत बुलंद असतील. त्याकरिता तुम्हाला ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ या नीतीचा अवलंब करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी नेहमीच्याच कामाविषयी धास्ती असेल. जास्त विचार करू नका. कामाला लागा. सप्ताहाच्या मध्यानंतर आवडत्या व्यक्तींना भेटण्याचा योग चालून येईल.

सिंह गेल्या ३-४ आठवडय़ांमध्ये वातावरणामध्ये काही तणाव निर्माण झाला असेल तर त्यावर चांगला उपाय मिळेल. व्यापार-उद्योगात आठवडा कष्टदायक आहे, पण तुमचे अंदाज आणि प्रयत्न यांचा चांगला समन्वय झाल्यामुळे ठरविलेली कामे आटोक्यात आणाल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामामध्ये अडथळे निर्माण झाले होते त्यामध्ये तुम्ही एखादी युक्ती शोधून काढाल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींनी दिलेला सल्ला उपयोगी पडेल.

कन्या ग्रहमान तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढविणारे आहे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करीत आहात त्यामध्ये आपली वेगळी प्रतिमा तुम्ही निर्माण कराल. व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने संपूर्ण आठवडा धावपळीचा आणि दगदगीचा जाईल. नोकरीमध्ये एखादे अवघड काम इतरांना न जमल्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर लादतील. त्यामध्ये सफल व्हाल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये आवडत्या व्यक्तीच्या जीवनातील शुभप्रसंग साजरा होईल.

तूळ महत्त्वाचे ग्रह तुम्हाला अनुकूल असल्यामुळे जी गोष्ट मनामध्ये आहे ती तुम्ही पूर्ण कराल. या आठवडय़ामध्ये विचार आणि कृती यांचा उत्तम समन्वय होईल. व्यापार-उद्योगात चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त काहीतरी नवीन करावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही घेतलेले निर्णय संस्थेच्या फायद्याकरिता उपयोगी पडतील. घरामध्ये, जागेमध्ये बदल करण्याविषयी काही निर्णय झाले असतील तर त्यावर शिक्कामोर्तब होईल.

वृश्चिक पेरल्याशिवाय उगवत नाही या म्हणीची आठवण ठेवा. जे काम तुम्हाला नजीकच्या भविष्यात करायचे आहे त्याची पूर्वतयारी करायला सुरुवात करा. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात गडबडीत होईल. नोकरीत एखादे काम पूर्ण करण्याकरिता सहकाऱ्यांशी मस्काबाजी करावी लागेल. घरामधल्या व्यक्ती वरवर तुमचे कौतुक करतील, पण कामाच्या वेळेला कोणीच उपयोगी पडणार नाही.

धनू सभोवतालच्या व्यक्तींशी तुम्ही संबंध कसे ठेवता यावर आठवडय़ाचे यश अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या तत्त्वाशी तडजोड करावी लागेल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात धनलाभाने होईल.  नोकरीच्या ठिकाणी जादा काम करून जादा पसे मिळतील. कामाचा व्याप वाढल्याने स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होईल. घरामध्ये महत्त्वाची कामे ठप्प झाली असतील तर त्यात मुंगीच्या पावलाने सुधारणा होईल.

मकर ‘विनासहकार नाही उद्धार’ हे तुम्हाला चांगले माहीत असते. या आठवडय़ामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेले काम आणि ओळखी यांचा तुम्हाला उपयोग होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमची व्यावहारिक हुशारी संस्थेला उपयोगी पडेल. वरिष्ठांना तुमचे कौतुक वाटेल. बदलीच्या कामात विलंब होण्याची शक्यता आहे. घरामध्ये दूरदृष्टी ठेवून तुम्ही केलेले आíथक नियोजन सगळ्यांना उपयोगी पडेल.

कुंभ सप्ताहाच्या सुरुवातीला थोडीशी निराशा असेल. पण अतिविचार करून फारसा उपयोग होत नाही हे लक्षात आल्यानंतर तुम्ही कामाला लागाल. त्याचा उपयोग होईल. व्यापार-उद्योगात तुमचे अंदाज आडाखे बरोबर ठरल्याने तुमची कामे जलद होतील. सप्ताहाच्या शेवटी पशाची सोय होईल. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नाही ते काम तुम्ही अक्कल लढवून पूर्ण करून दाखवाल. घरामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार चाला.

मीन स्वभावत: तुमची रास परोपकारी आहे. ज्याला मदतीची गरज असते त्याला मदत करायला तयार व्हाल. या आठवडय़ामध्ये या तुमच्या गुणाचा उपयोग होईल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात आणि आठवडय़ाचा शेवट धनलाभाने होईल. त्यामुळे व्यापारी वर्ग खूश असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या चांगुलपणाचा थोडासा गरफायदा घेतील.

First Published on June 29, 2018 1:01 am

Web Title: astrology 29th to 5th july 2018