News Flash

राशिभविष्य : दि. २० ते २६ सप्टेंबर २०१९

चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे हाती घेतलेले काम व जबाबदारी धडाडीने पार पाडाल.

सोनल चितळे

मेष चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे हाती घेतलेले काम व जबाबदारी धडाडीने पार पाडाल. नोकरी-व्यवसायात अधिकार गाजवाल. परंतु अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका. वरिष्ठांच्या मताप्रमाणे वागावे लागेल. सहकारीवर्गाबरोबर जुळवून घेणे आवश्यक! जोडीदाराची चांगली साथ लाभेल. आíथक नियोजनाबाबत चर्चा करून एकमताने निर्णय घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मूत्राशय किंवा पोट डब्ब झाल्यास औषधोपचार घ्यावा व व्यायाम करावा.

वृषभ चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे काही नव्या गोष्टी शिकून घ्याल व त्याचा अवलंब नित्य व्यवहारात कराल. नोकरी-व्यवसायात आपल्या वागणुकीत केलेले बदल फायदेशीर ठरतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. सहकारीवर्गाच्या मदतीने हाती घेतलेले कार्य वेळेत पूर्ण कराल. जोडीदाराची सोबत लाभदायक ठरेल. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याची प्रगती होईल. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. उत्सर्जन संस्थेचे आरोग्य जपा.

मिथुन मनाचा कारक चंद्र व आत्माकारक रवी यांच्या लाभयोगामुळे गृहसौख्य व कुटुंबसौख्य चांगले मिळेल. नोकरी-व्यवसायात विरोधकांचा प्रतिकार कमी होईल. मानसिक संघर्ष मिटतील. सहकारीवर्ग मदतीची तयारी दाखवतील. नवे करार कराल. आíथक प्रगती होईल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात व्यस्त असल्याने काही प्रश्न आपण हिमतीने सोडवाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. आंत्ररस, विकरे यांचा समतोल राखण्यासाठी वैद्यकीय मदत घ्यावी.

कर्क चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे मानसिक शक्ती वाढेल. मनोधर्य बलवान होईल. नोकरी-व्यवसायात बदलीचे योग संभवतात. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारीवर्गाला केलेल्या मदतीची परतफेड होईल. कामात व्यग्र असल्याने जोडीदाराला कुटुंब सदस्यांची सर्व जबाबदारी स्वीकारणे शक्य होणार नाही. अशा वेळी एकमेकांना समजून घेणे आवश्यक! पडणे, मार लागणे, जखम होणे, त्यात पू होणे, जखम चिघळणे अशा त्रासांवर वैद्यकीय उपाययोजना महत्त्वाची!

सिंह गुरू-चंद्राच्या समसप्तम योगामुळे अडल्यानडलेल्याला मदतीचा हात पुढे कराल. सामाजिक कार्यात हिरिरीने पुढाकार घ्याल. नोकरी-व्यवसायात मार्गदर्शक भाषण करून  सहकारी वर्गाला प्रगतीचा मार्ग दाखवाल. बराच काळ लांबणीवर पडलेला निर्णय आता घ्यावाच लागेल. अनुभवातून खूप काही शिकाल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. कठीण प्रसंगी जोडीदाराच्या सूचना उपयोगी पडतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. पोट व मांडय़ा यांचे आरोग्य जपावे.

कन्या बुध व गुरूच्या लाभयोगामुळे बुधाच्या व्यवहारी वृत्तीचा व गुरूच्या ज्ञानाचा सुरेख मिलाप दिसून येईल. आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांपुढे आपले मुद्दे स्पष्टपणे मांडाल. याचा सहकारीवर्गालादेखील लाभ होईल. जोडीदाराला सद्य:स्थितीत आपल्या भावनिक आधाराची गरज आहे. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. डोकं शांत ठेवा. कफ, दमा यावर औषधोपचार घ्यावेत.

तूळ चंद्र-शुक्राच्या केंद्रयोगामुळे आनंदाचे क्षण साजरे कराल. सकारात्मक दृष्टिकोनातून आजूबाजूच्या परिस्थितीकडे बघाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मतांशी सहमत नसलात तरी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. सहकारीवर्ग कामाच्या बाबतीत मोठा पािठबा देतील. जोडीदारासह जुळवून घ्यावे लागेल. त्याची बाजू ऐकून घ्याल. शांत डोक्याने निर्णय घ्यावा लागेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. पोटाचे विकार बळावतील.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे चंद्राची चंचलता व मंगळाची धडाडी अंतिम निर्णय घेताना मन विचलित करेल. संघर्ष करून जिद्दीने गोष्टी मिळवाल. नोकरी-व्यवसायात आपले म्हणणे दुसऱ्यांवर लादू नका. वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. सहकारीवर्गाची मदत घेऊन हाती घेतलेले कार्य वेळेत पूर्ण कराल. आíथक नियोजन करावे लागेल. अन्यथा खर्चाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक समस्या जोडीदाराच्या मदतीने सोडवाल. डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको.

धनू बुध-प्लुटोच्या केंद्रयोगामुळे आपणास जे सांगायचे आहे ते योग्य शब्दात मांडता येणार नाही. कदाचित त्यामुळे गरसमज वाढतील. नोकरी-व्यवसायात समयसूचकता वापरावी लागेल. सहकारीवर्गाला मदत करावी लागेल. तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे कराल. जोडीदाराच्या मतांशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. कामानिमित्त प्रवास कराल. डोळ्यांवर ताण येईल. फुप्फुसांचे आरोग्य सांभाळावे. श्वसनाचे व्यायाम उपयुक्त ठरतील.

मकर बुध-शनीच्या केंद्रयोगामुळे बुधाची व्यवहारी दृष्टी आणि शनीचा विचारी, संयमी स्वभाव यांचा मिलाप वागणुकीत दिसून येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताप्रमाणे आगेकूच करून स्वत:ची प्रगती करून घ्याल. सहकारीवर्ग जास्तीतजास्त साहाय्य करेल. त्यांच्या अडचणी मोकळेपणाने आपल्यापुढे मांडेल. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. दोघांचे सूर चांगले जुळतील. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न कराल. कार्यशक्ती कमी पडेल.

कुंभ गुरू-नेपच्यूनच्या केंद्रयोगामुळे अडचणीतून मार्ग काढून पुढे जाल. तसे करताना इतर गरजू लोकांना मदतीचा हात द्याल. नोकरी-व्यवसायात आपल्या अनुभवाचे बोल सर्वापुढे मांडाल. सहकारीवर्गाला आवश्यक त्या गोष्टी पुरवाल. कामाला वेग येईल याची खबरदारी घ्याल. जोडीदाराच्या व्यस्त दिनक्रमातूनही तो आपल्यासाठी वेळ राखून ठेवेल. कुटुंबासाठी मोठी आíथक मदत कराल. नातेवाईक व मित्रमंडळींना मार्गदर्शन कराल. प्राणायाम करा.

मीन चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे विचार व आचरणात समतोल राखाल. हाती घेतलेल्या कार्यात प्रयत्नांती यश मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे वर्चस्व मान्य करावे लागेल. थोडा काळ मनाजोगत्या कामापासून दूर राहावे लागेल. संयम राखा. सहकारीवर्गाची मदत घ्याल. जोडीदाराच्या आवडीनिवडी जपाल. त्याच्या सर्जनशीलतेला उत्तेजन द्याल. उष्णतेचे त्रास बळावतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 1:01 am

Web Title: astrology 2oth to 26th september 2019
Next Stories
1 राशिभविष्य : दि. १३ ते १९ सप्टेंबर २०१९
2 राशिभविष्य : दि. ६ ते १२ सप्टेंबर २०१९
3 राशिभविष्य – दि. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०१९
Just Now!
X