13 December 2017

News Flash

दि. ३ ते ९ मार्च २०१७

एकीकडे प्रगतीच्या नवीन वाटा तुम्हाला दिसत असल्यामुळे तुम्ही उत्साही बनाल.

विजय केळकर | Updated: March 3, 2017 6:19 PM

राशिचक्र

01vijay1मेष एकीकडे प्रगतीच्या नवीन वाटा तुम्हाला दिसत असल्यामुळे तुम्ही उत्साही बनाल. तर दुसरीकडे वाढणारे खर्च तुम्हाला चिंतेत टाकतील.  नवीन योजनांसाठी खेळते भांडवल उभे करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुम्हाला पूर्वी जमले नव्हते ते काम तुम्ही निश्चयाच्या जोरावर आटोक्यात आणाल. बेकार व्यक्तींना छोटेसे काम मिळेल. तुमची इच्छा असूनही घराकरिता वेळ देऊ शकणार नाही.

वृषभ प्रत्येक गोष्ट पशामध्ये मोजणारी तुमची रास आहे. पण या आठवडय़ात पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण ठेवा. व्यापार-उद्योगात एखादे चांगले काम मिळण्याकरिता तुम्हाला बराच वेळ आणि पसे खर्च करावे लागतील. पण काम झाल्यानंतर एक प्रकारचे आंतरिक समाधान लाभेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता उत्तम राहील. मात्र कामाचा डोंगर तुमच्यापुढे असल्यामुळे कितीही काम केले तरी ते कमी वाटेल. घरामध्ये एकाच वेळी अनेक डगरींवर हात ठेवल्यामुळे तुमची चिडचिड होईल. राग नियंत्रणात ठेवा.

मिथुन मंगळ तुम्हाला आíथकदृष्टय़ा चांगला ठरणार आहे. थोडेसे पसे हातात आले की तुम्हाला नवीन कल्पना अस्वस्थ करतात. या आठवडय़ात हातातल्या पशाचा विचारपूर्वक वापर करा. व्यापार-उद्योगातील कामांना चालना मिळेल. बरीच कामे ठरवलेल्या वेळेच्या आत पूर्ण करायची असतील. क्वचित प्रसंगी तुम्हाला रात्रीचा दिवस करावा लागेल. नोकरदार व्यक्तींकडून वरिष्ठ नेहमीपेक्षा जास्त काम करून घेतील. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये  कर्तव्यापोटी स्वत:च्या आवडी-निवडी बाजूला ठेवाल.

कर्क ‘कठीण समय येता कोण कामासी येतो’ या म्हणीची तुम्हाला आठवण येईल. पण तुमची रास कोणाकरिता अडून बसणार नाही. त्यानुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने काम सुरू ठेवाल. व्यापार-उद्योगात थोडासा कठीण पण निश्चित यश देणारा मार्ग निवडा. आíथकदृष्टय़ा जरी खडतर काळ असला तरी केलेल्या कामाचे लवकरच फळ मिळेल. नोकरीमध्ये जे काम इतरांना जमलेले नाही ते काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये अनेक आघाडय़ांवर तुम्हाला सज्ज राहावे लागेल.

सिंह स्वभावत: तुमची रास थोडीशी बिनधास्त आहे. या आठवडय़ात याच कारणामुळे जास्त पसे खर्च होतील. व्यापार-उद्योगातील कंटाळवाणे काम संपल्यामुळे तुमचा उत्साह बळावेल. कारखानदार-उद्योगपती नवीन प्रोजेक्टकरिता तरतूद करून ठेवतील. नोकरीच्या ठिकाणी ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ असा अनुभव येईल. वरिष्ठ त्यांच्या स्वार्थाकरिता तुमच्याशी गोड बोलतील.

कन्या मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काही व्यक्ती  मतलब साध्य करण्याकरिता तुमच्याशी गोडीगुलाबीने वागतील. त्यांच्याशी पशाचे व्यवहार जपून करा. एखादे काम मध्यस्थांमार्फत करावे लागेल. नोकरीमध्ये ज्यांच्यावर तुम्ही विसंबून आहात त्यांची आयत्या वेळेला अडचण निघेल. अखेर तुम्ही स्वयंभू बनून ते काम पूर्ण करून टाकाल. शारीरिक कष्ट तुम्हाला पेलवणार नाहीत. याची वेळीच दक्षता घ्या. घरामधल्या एखाद्या व्यक्तीचे हट्ट पुरवावे लागतील. ही बाब थोडी खर्चीक असेल.

तूळ ग्रहस्थिती तुम्हाला थोडीशी कोडय़ात टाकणारी आहे. जे काम व्हायला पाहिजे असेल त्यामध्ये अडथळे आल्यामुळे तुम्ही थोडेसे नाराज व्हाल. व्यापार-उद्योगात तुमच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती तुम्हाला काही नवीन कल्पना सुचवतील. त्या व्यावहारिकदृष्टय़ा उपयोगी पडतील की नाही याची कागदावर आकडेमोड करून बघा. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून केलेल्या कामाचे कौतुक झाल्यामुळे थोडासा हुरूप येईल. घरामध्ये सर्व आघाडय़ांवर तुम्हाला सतर्क राहावे लागेल

वृश्चिक आजकालच्या जगात पशाचे प्रश्न प्रत्येकाला कायमच सतावत असतात. तुम्ही त्याला अपवाद नाही. व्यापार-उद्योगात जे काम हाता-तोंडाशी आले होते ते तांत्रिक कारणामुळे दोन-तीन आठवडे लांबण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही थोडेसे स्वार्थी बनाल. सहकाऱ्यांच्या शब्दांवर जास्त अवलंबून राहू नका. घरामध्ये तुम्ही सर्वाशी सरळ वागायचा प्रयत्न कराल. पण इतर लोक वाकडय़ात शिरले तर तुमची मानापमानाची भावना जागृत होईल.

धनू ‘भगवान के घर देर है मगर अंधेर नहीं’ याची आठवण करून देणारा हा आठवडा आहे. पूर्वी जे काम करून वाया गेले असे वाटत होते, त्या कामाला आता गती यायला लागेल. व्यापार-उद्योगात तुमच्या कार्यपद्धतीमध्ये नुकतेच काही बदल केले असतील तर सुरुवातीला त्याचा त्रास होईल. नोकरीच्या ठिकाणी एक काम संपते तोच वरिष्ठ तुम्हाला दुसरे काम सांगतील. घरामध्ये तुमचे धोरण थोडेसे कडक असेल.

मकर ग्रहमान असे सुचविते की तुम्हाला तुमचे घर आणि करिअर या दोन्ही आघाडय़ांवर लक्ष द्यावे लागेल. कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवा. व्यापार-उद्योगात स्पर्धा तीव्र होईल. त्यात टिकून राहण्यासाठी तुम्हाला तुमचा पवित्रा बदलावा लागेल. काही महागडे बदल करावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कष्टाळू स्वभावाचा सर्व जण फायदा उठवतील. बरीच कामे तुम्ही एकाच वेळी हाताळाल. कामाचा तणाव बराच असेल. घरामध्ये काही नतिक जबाबदाऱ्या तुम्हाला स्वीकाराव्या लागतील.

कुंभ सर्व ग्रहमान तुमचा उत्साह वाढविणारे आहे. ज्या कामात अडथळे आले होते ते काम पूर्ण करण्याचा निर्धार कराल. मात्र काम संपेपर्यंत कोणालाही त्याची कल्पना देऊ नका. व्यापार-उद्योगात उधारीचे व्यवहार जास्त असल्यामुळे पशाची थोडीफार चणचण जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन पद्धतीचे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. तुम्हाला त्याचा अनुभव नसल्यामुळे तुम्ही विचारात पडाल. घरामध्ये प्रत्येक कामामध्ये लक्ष घालायला जमणार नाही.

मीन तुमचे धोरण नेहमी लवचीक असते.  ह्य आठवडय़ात कामाच्या वेळी काम इतर वेळी थोडासा आराम करण्याचा तुमचा इरादा असेल. व्यापार-उद्योगात आधुनिक पद्धतीने काम करावेसे वाटेल. जोडधंदा असेल तर त्याचा उपयोग होईल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामात आळस आला होता त्याच कामाची वरिष्ठांना आठवण येईल. नवीन नोकरीचे काम लांबेल. घरामध्ये कर्तव्याला महत्त्व द्याल. स्वत:ची हौसमौज बाजूला ठेवाल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on March 3, 2017 1:05 am

Web Title: astrology 3 to 9 march