29 February 2020

News Flash

राशिभविष्य : दि. ३१ मे ते ६ जून २०१९

गुरू-शुक्राच्या षडाष्टक योगामुळे मानसिक अस्थर्य व चंचलता जाणवेल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष गुरू-शुक्राच्या षडाष्टक योगामुळे मानसिक अस्थर्य व चंचलता जाणवेल. मानापमानाच्या कल्पना दूर ठेवा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. हितशत्रूंच्या वरकरणी स्तुतीला भुलू नका. सहकारीवर्ग बरीच मदत करेल. जोडीदार व आपल्यातील संशय, शंका, गरसमज वेळीच चर्चा करून दूर कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. ज्येष्ठ मंडळींसाठी विशेष वेळ द्यावा लागेल. पित्त व कफ विकारांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक!

वृषभ शुक्र-शनीच्या नवपंचम योगामुळे शुक्राच्या कलात्मकतेला शनीची व्यावहारिक साथ मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांच्या मनाप्रमाणे वागणे कठीण जाईल. सहकारीवर्ग मात्र आपल्या बाजूने खंबीरपणे उभा राहील. स्वत त्रास सहन करून आपली मदत करतील. जोडीदाराशी चांगले सूर जुळतील. लटका राग, रुसवा प्रेमाने दूर कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. मान लचकणे, शीर दबणे असे त्रास सहन करावे लागतील.

मिथुन बुध-प्लुटोच्या षडाष्टक योगामुळे जमावाच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. आपल्याबद्दल मित्रमंडळी अथवा नातेवाईकांत गरसमज पसरतील. तरीदेखील आपण शब्द जपून वापरावेत. विचारविनिमय करून मार्ग सापडेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सहकारीवर्गाकडून फारशी अपेक्षा न ठेवणे बरे! जोडीदारासह झालेले लहान-मोठे वाद लगेच मिटवून टाकाल. पडणे, मार लागणे, पू होणे यांचा त्रास संभवतो. काळजी घ्यावी.

कर्क चंद्र-शुक्राच्या लाभयोगामुळे मानसिक समाधान मिळेल. चंद्र गृहसौख्य व शुक्र कुटुंबसौख्य देईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. सहकारीवर्ग, मित्रपरिवार, नातेवाईक यांची चांगली मदत मिळेल. नव्या ओळखी होतील. जोडीदाराच्या आरोग्यविषयक तक्रारींकडे लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींसह वेळ आनंदात जाईल. कफ विकारांवर योग्य वेळी औषधोपचार घ्यावेत. चिंता नसावी.

सिंह गुरू-बुधाच्या समसप्तम योगामुळे बुद्धीला व्यावहारिकतेची जोड मिळेल. कलागुणांना वाव मिळेल. आíथक लाभ होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मन जिंकाल. यामुळे आपला व सहकारीवर्गाचा लाभ होईल. कष्टाचे चीज होईल. लहान-मोठे प्रवास फायदेशीर ठरतील. जोडीदाराशी चांगले जुळवून घ्याल. त्याचा सल्ला उपयोगी पडेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण धावपळ कराल. आरोग्य जपा.

कन्या शुक्र-शनीच्या नवपंचम योगामुळे शुक्राच्या कलात्मकतेला शनीची व्यावहारिक बठक मिळेल. आपली कर्तव्ये चोखपणे पार पाडाल. स्वतच्या सुखाचा त्याग करून इतरांच्या उपयोगी पडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सहकारीवर्ग मदतीचा हात पुढे करेल. जोडीदार आपली स्थिती समजून घेईल. आत्मविश्वास वाढवेल. शरीरातील पाण्याच्या पातळीचे भान ठेवा.

तूळ शुक्र-प्लुटोच्या नवपंचम योगामुळे आपल्यातील कलेला वाव मिळेल. धिटाईने जमावासमोर आपली मते मांडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार कामात बदल कराल. आणि तो आपल्या हिताचाच ठरेल. सहकारीवर्गाच्या समस्या वरिष्ठांपुढे प्रभावीपणे मांडाल. जोडीदारासह निर्माण झालेली पेल्यातील वादळे लवकरच शमतील. शब्दाने शब्द वाढवू नये. कौटुंबिक वातावरणातील तणावाचा फुगा हलकेच फोडाल. आरोग्याची साथ मिळेल.

वृश्चिक गुरू-बुधाच्या समसप्तम योगामुळे मन:स्थिती द्विधा होईल. अंतिम निर्णय घेताना अडचणी येतील. कागदोपत्री व्यवहार, करार शक्यतो टाळावेत. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे तंतोतंत पाळावे. यातच आपला लाभ आहे. सहकारीवर्गाचे उत्तम साहाय्य मिळेल. जोडीदाराच्या कार्याबद्दल आपणास अभिमान वाटेल. आपण त्याच्या कार्यात सक्रिय सहभागी व्हाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. ओटीपोट, खांदे व शिरा यांचे आरोग्य जपा.

धनू गुरू-शुक्राच्या षडाष्टक योगामुळे मानसिक चंचलता वाढेल. पोकळ डामडौल कामाचा नाही. त्यापेक्षा कसून कामाला लागा. जबाबदारी टाळू नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्यावर अतिरिक्त कामे सोपवतील. सहकारीवर्गाच्या साहाय्याने मनापासून प्रयत्न कराल. वरिष्ठांचे मन राखाल. जोडीदारासमोर त्याच्या कार्यक्षेत्रात नव्या समस्या उभ्या राहतील. त्याची सद्य:स्थिती जरा समजून घ्या. डोळे व पोटाचे आरोग्य सांभाळा. वैद्यकीय तपासणी करा.

मकर शुक्र-शनीच्या नवपंचम योगामुळे आपली कर्तव्ये चांगल्या प्रकारे पार पाडाल. नवे करार कराल. व्यवहारी वृत्तीमुळे लाभ होईल. नातेवाईकांसाठी कष्ट करण्याची तयारी दाखवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा दबाव वाढेल. सहकारीवर्ग सर्वतोपरी साहाय्य करील. कौटुंबिक वातावरणातील तणाव शांत डोक्याने विचार करून प्रयत्नपूर्वक दूर कराल. जोडीदार सावलीसारखी साथ देईल. दंड व खांद्याचे आरोग्य सांभाळा. दुखणे अंगावर काढू नका.

कुंभ बुध-प्लुटोच्या षडाष्टक योगामुळे बौद्धिक क्षेत्रातील प्रगतीमध्ये अडथळे येतील. आपल्या म्हणण्याचा वेगळाच अर्थ घेतला जाईल. त्यामुळे विनाकारण गरसमज पसरतील. नोकरी -व्यवसायात वरिष्ठांसह बोलताना शब्द जपून वापरावे. सहकारीवर्ग प्रत्येक वेळी आपली बाजू सावरू शकणार नाही. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. आपली स्थिती तो समजून घेईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी डोकं वर काढतील.

मीन चंद्र-शुक्राच्या लाभयोगामुळे बरेच दिवस रखडलेली कौटुंबिक कामे मार्गी लागतील. जाणकार लोकांची मदत मिळेल. नोकरी-व्यवसायात अडीअडचणींवर मात करून योग्य मार्ग शोधाल. सहकारीवर्गाचे साहाय्य मिळेल. आपला आत्मविश्वास वाढेल. जोडीदार आपल्या सगळ्या समस्या समजू शकला नाही तरी भावनिक पािठबा देईल. रक्तातील जीवनसत्त्वे व क्षारांच्या प्रमाणावर लक्ष असावे.

First Published on May 31, 2019 1:01 am

Web Title: astrology 31st may to 6th june 2019
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २४ ते ३० मे २०१९
2 राशिभविष्य : दि. १७ ते २३ मे २०१९
3 राशिभविष्य : दि. १० ते १६ मे २०१९
X
Just Now!
X