04 August 2020

News Flash

दि. ८ ते १४ जानेवारी २०१६

तुमच्या राशीमध्ये काम करण्याची जबरदस्त तयारी असते. पण प्रत्येक वेळी त्याचा उपयोग होत नाही.

lkp34मेष तुमच्या राशीमध्ये काम करण्याची जबरदस्त तयारी असते. पण प्रत्येक वेळी त्याचा उपयोग होत नाही. काही वेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या नीतीचा वापर करावा लागेल. या आठवडय़ात एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली तर तुमचा बराच फायदा होईल. व्यापार-उद्योगात एखादे महत्त्वाचे उद्दिष्ट कोणाच्याही मदतीशिवाय गाठावे लागेल. घरामध्ये तुम्हाला मदतीची गरज असेल. पण सभोवतालच्या व्यक्ती केवळ बघ्याची भूमिका घेतील. त्याचा राग मानू नका.

वृषभ ज्या व्यक्तीची गाठभेट घेणे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, त्या व्यक्तीशी ताबडतोब संपर्क साधा. व्यापार-उद्योगात महत्त्वाची कामे मागे-पुढे जरी झाली तरी तुमचे प्रयत्न चालू ठेवा. आíथक स्थिती साधारण असल्याने काटकसर करावी लागेल. नोकरदार व्यक्तींना त्यांचे लक्ष पूर्णपणे कामावर केंद्रित करावे लागेल. घरातील आवडत्या व्यक्तीशी तात्त्विक मुद्दय़ावरून मतभेद होतील. जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी एखाद्या सामूहिक घरगुती कार्यक्रमात भाग घ्यावासा वाटेल.

मिथुन तुमच्या राशीमध्ये उत्तम कल्पकता आहे. पण या सर्व कल्पना कृतीत आणण्यासाठी तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या साथीची गरज असते. व्यवसाय-उद्योगासाठी भांडवलाची तरतूद करा. तुमचे बेत गुप्त ठेवा. नोकरीच्या  ठिकाणी तुम्हाला नेमून दिलेले काम तुम्ही मनापासून कराल. मात्र वरिष्ठांच्या आज्ञेचा विसर पडू देऊ नका. घरामध्ये प्रिय व्यक्तीशी रुसवे-फुगवे झाले असतील तर तडजोडीची भूमिका घेऊन वादविवाद मिटवून टाका.

कर्क तुमच्या राशीला माणसे अत्यंत प्रिय असतात. त्यांच्याकडून मिळणाऱ्या सहकार्याच्या जोरावर तुम्हाला अनेक गोष्टी करता येतात. व्यापार-उद्योगात काही किचकट कंटाळवाणी कामे पूर्ण करावी लागतील. पण त्यावरच तुमचे यश अवलंबून असल्याने आळस करून चालणार नाही. नोकरीमध्ये वरिष्ठांना खूश ठेवण्यासाठी  त्यांच्या पद्धतीनुसारच काम करावे लागेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचा तुम्ही आदर राखाल. नवीन जागेत स्थलांतर होण्याची शक्यता आहे.

सिंह एखादे मोठे काम पूर्ण करण्याचे तुमच्या मनात असेल तर आता तुम्हाला विद्युत गतीने काम करणे भाग पडेल. तसे केले नाहीत तर नंतर तुमचे वेळेचे गणित मागे-पुढे होईल. व्यापार-उद्योगात महत्त्वाची कामे इतरांवर न सोपवता शक्यतो स्वत:च पूर्ण करा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्याकडून महत्त्वाचे काम पूर्ण करून घेतील. घरामध्ये सकृत्दर्शनी सर्व काही ठीक असेल, पण एखाद्या निमित्ताने तुम्हाला  हौसेमौजेवर इतरांमुळे मुरड घालणे भाग पडेल. एखादा शुभ कार्यक्रम ठरेल.

कन्या या आठवडय़ात तुम्ही मनाची तयारी ठेवली तर तुम्हाला सहजगत्या सर्व गोष्टी हाताळता येतील. व्यवसाय-उद्योगात कामाचा व्याप कमी करण्याकरिता मनात एखादा खास बेत योजाल, मात्र इतरांकडून फारशी अनुमती न मिळाल्याने थोडेसे साशंक बनाल. नोकरीमध्ये जे काम तुम्हाला आवडत नाही, तेच काम वरिष्ठ करायला सांगतील. पण तुम्ही ते अतिशय कौशल्याने उत्तम प्रकारे हाताळून दाखवाल. घरामध्ये तुमच्या सल्ल्याचा उपयोग होईल.

तूळ प्रत्येक काम महत्त्वाचे असल्याने वेळप्रसंगी गतीने काम करावे लागेल. व्यापार-उद्योगात आíथकदृष्टय़ा एखादी अनुकूल घटना घडल्याने तुमच्या इच्छाआकांक्षा पल्लवित होतील. थोडासा जास्त धोका पत्करून भरपूर पसे कमवावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची काही मागणी असेल तर ती पूर्ण करायला वरिष्ठ काही अटींवर तयार होतील,   घरामध्ये आपण आपल्या कर्तव्यात चुकतो आहे, अशी कल्पना मनात येईल.

वृश्चिक ज्या वातावरणाबरोबर तुमचे धागेदोरे चांगल्या पद्धतीने जुळले होते, त्या वातावरणापासून कदाचित लांब जाण्याचे संकेत मिळतील. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात वेगळी आणि चांगली प्रतिमा निर्माण करण्याकरिता भरपूर काम करावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी जी गोष्ट वरिष्ठांना प्रिय आहे ती करून त्याच्या बदल्यात एखादी जादा सवलत मिळवाल. घरामध्ये तुम्हाला फारसे लक्ष देता येणार नाही. त्याचा इतरांना थोडासा राग येईल. नातेवाईक आणि मित्रमंडळींशी जपून बोला.

धनू तुमची रास प्रयत्नवादी आहे. इतर गोष्टींचा जास्त विचार न करता जी गोष्ट आपल्याला करणे शक्य आहे ती करून मोकळे होता. व्यवसाय-उद्योगात काही नवीन संकेत मिळतील. नवीन व्यवहार किंवा करार करण्यापूर्वी जमा-खर्चाचे आकडे निष्णात व्यक्तीकडून समजून घ्या. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादी विशेष सवलत तुम्हाला देतील. घरामध्ये एखाद्या कारणावरून इतरांशी मतभेद होतील. पण बुजुर्ग व्यक्तींच्या सल्ल्यामुळे अशा प्रश्नात तोडगा निघेल.

मकर सहसा इतरांवर अवलंबून राहायला तुम्हाला आवडत नाही. त्यापेक्षा एकटय़ाने काम करणे तुम्ही पसंत करता. व्यवसाय-उद्योगात अपेक्षित मार्गाने पसे उपलब्ध न झाल्याने तुम्ही वेगळ्या मार्गाचा अवलंब कराल. नोकरीच्या ठिकाणी एखादे जोखमीचे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यामुळे तुमचा भाव वधारेल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये सगळ्यांचा मौजमजेचा मूड असेल. पण प्रिय व्यक्ती आजूबाजूला नसल्यामुळे तुमच्या मनाला रुखरुख लागेल.

कुंभ काहीतरी मिळविण्याकरिता काहीतरी गमवावे लागते याची नांदी करणारे हे ग्रहमान आहे. आíथक प्रगतीकरिता कौटुंबिक सुखात कमतरता सहन करावी लागेल. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात पूर्वी जे तुम्ही चांगले काम केले आहे ते पाहून एखादे नवीन काम मिळेल. नवीन प्रोजेक्ट हाती घ्यावासा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या विशेष सवलतीकरिता तुमची निवड केली जाईल. घरामध्ये जोडीदाराचा सल्ला किंवा सक्रिय मदत यामुळे अवघड काम सोपे होईल.

मीन व्यवसाय-उद्योगाच्या कामात तुमची महत्त्वाकांक्षा मोठी असेल. ती पूर्ण करण्याकरिता कोणावरही जास्त अवलंबून राहू नका. नाहीतर ‘दुसऱ्यावरी जो विसंबला..’ असा अनुभव येईल. हातातले पसे गुंतविण्यापूर्वी त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी जे काम नेमून दिले आहे ते तुम्ही पोटतिडकीने पार कराल. नवीन नोकरीच्या कामात प्रगती होईल. घरामध्ये एखादी प्रिय व्यक्ती आजूबाजूला नसल्यामुळे एकाकीपणा जाणवेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2016 1:05 am

Web Title: astrology 34
Next Stories
1 दि. १ ते ७ जाने. २०१६
2 दि. २५ ते ३१ डिसेंबर २०१५
3 दि. १८ ते २४ डिसेंबर २०१५
Just Now!
X