04 August 2020

News Flash

दि. २२ ते २८ जानेवारी २०१६

नोकरीमध्ये वरिष्ठ एखादी खास कामगिरी तुमच्यावर सोपवतील.

01vijayमेष आवश्यक त्या व्यक्तीशी संपर्क न झाल्यामुळे लटकून राहिलेल्या कामामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ असा पवित्रा ठेवा. व्यवसाय-उद्योगात आवश्यक त्या भांडवलाची सोय होईल. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादी खास कामगिरी तुमच्यावर सोपवतील. तुमचा भाव वधारेल. घरामध्ये सगळ्यांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात तुमचे कष्ट मर्यादेबाहेर वाढण्याची शक्यता आहे. लांबलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमावर चर्चा होईल.

वृषभ प्रगतीचा मार्ग थोडासा खडतर आहे असे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीचे नीट नियोजन करा. व्यवसाय-उद्योगात एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहिल्यामुळे तुमची थोडीशी गरसोय होईल. सर्व गोष्टी त्या व्यक्तीच्या सबुरीने घ्याव्या लागतील. नोकरीच्या ठिकाणी मनासारखी प्रगती होईल. पण चुकून एखादे काम तुमच्या हातून विसरले असेल तर वरिष्ठांना तोंडसुख घ्यायची संधी मिळेल. घरामध्ये प्रत्येकाचे विचार वेगळे असल्याने कोणीच कोणाचा फारसा विचार करणार नाही.

मिथुन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही विशिष्ट माणसे विशिष्ट कारणाच्या निमित्ताने जवळ येतात आणि ते काम संपल्यावर लांब निघून जातात. याची तुम्हाला एखाद्या निमित्ताने प्रचीती येईल. व्यवसाय-उद्योगात नेहमीचे काम चालू ठेवून काहीतरी वेगळे करावेसे वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठांना तुमची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कामाच्या स्वरूपात फेरफार करावेसे वाटतील. घरामधल्या व्यक्ती, ज्यांनी तुम्हाला पूर्वी विरोध केला होता त्यांच्याकडून सहकार्याची भाषा ऐकू येईल.

कर्क ज्या व्यक्तींनी दोन-तीन आठवडय़ापूर्वी तुम्हाला सहकार्य द्यायचे मान्य केले होते, अशा कामाला गती येईल. व्यवसाय-उद्योगात आवश्यक कागदपत्रे, भांडवल उपलब्ध झाल्यामुळे तुमच्या कामाला वेग मिळेल. नोकरीमध्ये नवीन पद्धतीच्या कामात तुम्ही हळूहळू रुळायला सुरुवात होईल. नवीन नोकरीच्या कामात प्रगती येईल. घरामध्ये तुमचा मुद्दा किंवा सल्ला इतरांना पटल्यामुळे तुमचा जीव भांडय़ात पडेल. एखादा महत्त्वाचा कार्यक्रम ठरेल. लांबच्या भावंडांशी गाठभेट होईल.

सिंह एखाद्या कामाविषयी अटी आणि नियम तुम्ही इतरांना समजून सांगता, पण स्वत:वर वेळ आली की मग मात्र पळवाट काढता. अशा तुमच्या वागणुकीमुळे इतरांना रागही येईल आणि हसूही येईल. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात नवीन कामाविषयी काही बोलणी किंवा करार करण्यापूर्वी निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीमध्ये ज्या कामात खंड पडला होता त्याला आता मुहूर्त लाभेल. घरामध्ये तुमचा मुद्दा रागाने नव्हे, तर प्रेमाने इतरांना समजावून सांगितला तर तो त्यांना पटेल.

कन्या बरीच कामे तुमच्यासमोर असूनही ज्यातून तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा आहे, अशा कामाला प्राधान्य द्याल. व्यापार-उद्योगात एखाद्या कारणाने तुम्हाला मरगळ आली असेल तर ती नाहीशी करणारी घटना घडेल. नोकरीत तुम्ही थोडेसे स्वार्थी बनाल. स्वत: जास्त काम न करता हाताखालच्या व्यक्तींकडून काम करून घ्याल. संस्थेकडून मिळणाऱ्या सुविधांचा पुरेपूर फायदा उठवाल. घरामध्ये प्रिय व्यक्तीच्या बाबतीत एखादी खुशखबर कळेल.

तूळ एखाद्या प्रश्नामध्ये परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्यावर मार्ग निघाल्याने तुमचे मन शांत होईल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात काही कारणाने सध्या चालू असलेली कार्यपद्धती बदलून नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करावासा वाटेल. व्यावसायिक व्यक्ती नवीन करारमदार करून त्यांच्या कामात चांगला दर्जा संपादन करतील. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या प्रश्नात तुम्ही दिलेला सल्ला वरिष्ठांना आणि सहकाऱ्यांना उपयोगी पडेल.

वृश्चिक वया आठवडय़ात तुमच्या या गुणाचा तुम्हाला सर्व आघाडय़ावर चांगला उपयोग होईल. व्यवसाय-उद्योगात जादा भांडवलाची गरज भासेल. आíथक संस्थेकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही शब्द टाकलात तर तुम्हाला आवश्यक तो प्रतिसाद मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांची व्यक्तिगत आणि संस्थेची गरज म्हणून तुम्हाला विशेष सवलत आणि सुविधा द्यायला तयार होतील. घरामधल्या व्यक्तींनी तुमचा अवमान केला असेल तर त्यांना प्रत्युत्तर देण्याची तुम्हाला संधी मिळेल.

धनू तुम्ही तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता चाकोरीबाहेरचा मार्ग स्वीकारायला तयार व्हाल. व्यवसाय-उद्योगात एखादे नवीन काम मिळणार असेल तर त्यामध्ये उत्साहाने सहभागी व्हाल.  नोकरीमध्ये वेगळ्या कामगिरीच्या निमित्ताने तुमच्या सभोवतालचे वर्तुळ बदलेल. त्यामध्ये तुम्ही लवकर रममाण व्हाल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने बाजारात फेरफटका होईल. स्वत:च्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट करायला तुम्ही उत्सुक असाल.

मकर कोणत्याही कामात जरी अडथळे आले तरी त्याला न जुमानता तुम्ही तुमच्या मार्गाने प्रगती करत रहा. व्यवसाय-उद्योगात तांत्रिक अडथळ्यामुळे एखादे काम थांबून राहिले असेल तर त्यावर तुम्ही युक्तीने मार्ग शोधून काढाल. नोकरीच्या ठिकाणी आपण बरे व आपले काम भले असा दृष्टिकोन ठेवा. नवीन नोकरीच्या कामात प्रगती होईल. घरामध्ये ज्या व्यक्तींनी पूर्वी तुम्हाला नकारघंटा ऐकवली होती त्यांच्याकडून आता सहकार्याची भाषा ऐकू येईल.

कुंभ एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला करायची असते, त्यावेळेला त्याचे विचारमंथन तुमच्या मनात चालू असते. योग्य वेळ आली की तुम्ही त्याचा फायदा घेता. या आठवडय़ात एखादी संधी चालून येईल. व्यापार-उद्योगात आíथक कामे काही कारणाने अडून राहिली असतील तर त्यातले तांत्रिक अडथळे दूर होऊन कामाला गती मिळेल. नोकरीमध्ये एखाद्या कामामध्ये आनंद घ्याल. मात्र वरिष्ठांच्या सूचना विसरू नका. घरामध्ये माझे तेच खरे असा तुमचा बाणा राहील.

मीन ज्या तांत्रिक कारणाने महत्त्वाच्या कामात अडसर निर्माण झाला होता तो दूर होण्याची शक्यता तुम्हाला आशावादी बनवेल. व्यापार-उद्योगात कामाचा पसारा वाढविण्याकरिता जादा भांडवलाची गरज असेल तर आíथक संस्था किंवा हितचिंतकांकडे शब्द टाका. नोकरीच्या ठिकाणी कठीण कामात तुम्ही बाजी माराल. वरिष्ठ तुमच्यावर खूश होऊन एखादी वेगळी कामगिरी तुमच्यावर सोपवतील. घरामधल्या व्यक्ती त्यांच्या स्वार्थापोटी तुमची स्तुती करतील.
विजय केळकर –

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2016 1:03 am

Web Title: astrology 36
Next Stories
1 भविष्य : दि. १५ ते २१ जानेवारी २०१६
2 दि. ८ ते १४ जानेवारी २०१६
3 दि. १ ते ७ जाने. २०१६
Just Now!
X