12 July 2020

News Flash

दि. २९ जाने. ते ४ फेब्रु. २०१६

नोकरीमध्ये तुमच्या कामाचा दर्जा उत्तम राहील.

मेष- थोडीशी वाकडी वाट करून  व चाणक्यनीती उपयोगात आणून उद्दिष्ट गाठावे लागेल. व्यावसायिक लोकांनी इतरांवर जास्त अवलंबून न राहता आपले काम स्वत:च्या पद्धतीने हाताळले तर त्यात यशाची खात्री वाटेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाचा दर्जा उत्तम राहील. मात्र वरिष्ठ त्यामुळे त्यांची अपेक्षा वाढवतील. घरामध्ये तुमच्या सल्ल्याचा आणि सहवासाचा इतरांना आधार वाटेल. तसे ते मान्य करणार नाहीत. एखादा घरगुती कार्यक्रम ठरेल.

वृषभ-
स्वभावत: तुम्ही व्यवहारी असल्यामुळे जशी परिस्थिती असते तसे तुम्ही तुमचे धोरण लवचीक ठेवून काही तरी मार्ग शोधता. या सर्व गुणांचा आता तुम्हाला फायदा होईल. व्यवसायधंद्यात  जी गोष्ट तुमच्या खिशाला परवडेल, त्याचाच फक्त विचार करा. नोकरीमध्ये वरिष्ठ आणि संस्था यांच्या दृष्टीने जी कामे महत्त्वाची आहे त्यांना प्राधान्य देणे चांगले. बेकार व्यक्तींना तडजोड करून काम मिळेल. घरामध्ये प्रत्येकाच्या गरजा भागवण्यासाठी वेळ आणि पसे राखून ठेवणे भाग पडेल.

मिथुन-
तुमचे व्यक्तिमत्त्व बहुढंगी असते याची जाणीव करून देणारे ग्रहमान आहे. व्यवसाय-उद्योगात आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखविण्याकरिता गिऱ्हाईकांसमोर नवीन प्रस्ताव ठेवाल. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना एखादे नवीन काम मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरीमध्ये जे काम इतरांना जमले नाही ते काम करण्याकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील, पण त्यामुळे तुमचे कष्ट वाढतील. घरामध्ये एखाद्या खर्चीक कार्यक्रमातून तुम्ही तुमची हौसमौज भागवून घ्याल.

कर्क-
परिस्थिती कशीही असो त्यासमोर हात न टेकता तुम्ही तुमच्याच पद्धतीने आणि आनंदित राहून चांगले काम करून दाखवता. व्यवसाय-उद्योगात समोरच्या व्यक्तीचे धोरण काय आहे हे पाहून तुम्ही तुमचा पवित्रा ठरवाल. आíथक बाजू सुधारण्याची लक्षणे दिसू लागतील. नोकरीमध्ये एखादे काम कष्टदायक काम तुम्हाला हाताळावे लागेल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींकडून सहकार्य मिळविण्याकरिता त्यांची मनधरणी करावी लागेल.

सिंह-
जे काम करायचे तुमच्या मनात आहे त्यासाठी कितीही कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. त्याला कोणीही विरोध केलेला तुम्हाला चालणार नाही. व्यवसाय-उद्योगात कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता जास्त काम करण्याचा तुमचा इरादा असेल. पशाची आवक वाढल्याने तुमच्यातला उत्साह वाढेल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी तुम्ही जादा काम कराल. घरामध्ये सर्वाना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न कराल.

कन्या-
ज्या कामामध्ये गती येत नव्हती, त्यामध्ये ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ या नीतीचा वापर करून तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य कराल. व्यापार किंवा उद्योगात भावनेच्या आहारी न जाता व्यवहाराच्या निकषावर काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. खेळते भांडवल उपलब्ध झाल्यामुळे कामात गती येईल. नोकरीच्या ठिकाणी गुंतागुंतीच्या कामात तोडगा निघाल्याने सुटकेचा नि:श्वास टाकाल. नवीन नोकरीच्या कामात गती येईल. नवीन वाहन/वास्तूत गुंतवणूक करावीशी वाटेल.

तूळ-
तुमच्यातील कल्पकतेला आणि रसिकतेला उधाण आणणारे ग्रहमान आहे. जे काम कराल त्यामध्ये आपली वेगळी प्रतिमा दिसली पाहिजे, असा तुमचा आग्रह असेल. व्यापारउद्योगात इतर वेळी शांतपणे विचार करून कृती करणारे तुम्ही या आठवडय़ात एखादा उपक्रम सुरू कराल. मात्र जमाखर्चाची नीट न्याहाळणी करा. नोकरीमध्ये प्रत्येक ठिकाणी महत्त्व मिळावे, अशी तुमची अपेक्षा असेल. घरामध्ये इतरांच्या शब्दालाही मान द्या.

वृश्चिक-
समोरची व्यक्ती कशी वागते-बोलते त्यानुसार आपण नेमका काय पवित्रा घ्यायचा हे तुम्ही ठरविता. व्यापार-उद्योगाच्या कामात तुमचे अंदाज-आडाखे सुयोग्य ठरल्याने, बरोबर ठरल्यामुळे एखाद्या चांगल्या संधींचा फायदा घेता येईल. पशाची आवक वाढेल. नोकरीमध्ये वरिष्ठ नेमके काय काम सांगतील याचा विचार करून तुम्ही त्याच कामाला महत्त्व द्याल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये तुमच्या पद्धतीने तुम्ही सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल.

धनू-
अनेक गोष्टी एकाच वेळी सुरू ठेवण्याचा तुमचा इरादा असेल. व्यवसाय-धंद्यात ज्या कामातून तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे, अशा कामाला प्राधान्य द्या. किरकोळ कामे हाताखालच्या व्यक्तींवर सोपवा. आíथक बाजू सुधारण्याकरिता हितचिंतक किंवा एखाद्या संस्थेकडे मागणी कराल. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुमच्या वाटय़ाला येईल ते तुम्ही उत्साहाने आणि आनंदाने कराल. घरामध्ये तुमच्या परोपकारी स्वभावाची इतरांना चुणूक दिसून येईल.

मकर-
तुमची रास शनिप्रधान असली तरी तुम्ही स्वभावाने अत्यंत लवचीक आहात. जशी परिस्थिती असते त्याचप्रमाणे तुमचे धोरण तुम्ही बदलता. व्यापार-उद्योगात जे तुमच्या मनात आहे ते पूर्ण करण्याकरिता भरपूर मेहनत घ्याल. नवीन काम मिळण्याची शक्यता निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी सर्व कामात लक्ष आहे असे दाखवाल, पण प्रत्यक्षात मात्र जेथे तुमचा आíथक फायदा जास्त आहे त्या कामांना प्राधान्य द्या. कामाच्या स्वरूपातील छोटे-मोठे बदल उपयोगी पडतील.

कुंभ-
तुमच्या कल्पना जगावेगळ्या असतात. त्या इतरांना लवकर समजत नाहीत. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात प्रचंड काम करण्याची तुमच्यात ईष्र्या निर्माण होईल. तुमचे उद्दिष्ट मोठे असल्याने तुम्ही चाकोरीबाहेर जाऊन मार्ग स्वीकाराल. नोकरीच्या ठिकाणी एखादी कल्पना वरिष्ठांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.  नवीन नोकरीच्या कामात थोडा विलंब होईल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींशी तुमची मते पटणार नाहीत, पण अखेर त्यांना तुमच्यापुढे माघार घ्यावी लागेल.

मीन-
अनेक वेळेला तुम्ही चांगले काम करता, परंतु व्यवहाराच्या बाबतीत तुम्ही कुठे तरी कमी पडता. त्यामुळे केलेल्या कामाचे महत्त्व निघून जाते. या आठवडय़ात या एका गोष्टीकडे लक्ष दिले तर तुम्ही बाजी मारू शकाल. व्यापार-उद्योगात कामाचा व्याप वाढवासा वाटेल. नोकरीमध्ये एखाद्या तातडीच्या कामाकरिता वरिष्ठ मोठय़ा विश्वासाने तुमची निवड करतील. नवीन नोकरीच्या कामात तातडीने लक्ष घाला. घरामध्ये इतरांच्या खोडसाळ वृत्तीचा तुम्हाला राग येईल.
विजय केळकर –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2016 1:03 am

Web Title: astrology 37
Next Stories
1 दि. २२ ते २८ जानेवारी २०१६
2 भविष्य : दि. १५ ते २१ जानेवारी २०१६
3 दि. ८ ते १४ जानेवारी २०१६
Just Now!
X