12 July 2020

News Flash

दि. १९ ते २६ फेब्रुवारी २०१६

शक्ती आणि युक्ती याचा वापर करून बरीच कामे हातावेगळी करू शकाल.

मेष शक्ती आणि युक्ती याचा वापर करून बरीच कामे हातावेगळी करू शकाल. मात्र प्रत्येक काम करताना त्यातील बारकावे नीट समजून घ्या. या आठवडय़ात संपूर्ण कालावधी तुम्हाला आव्हानात्मक ठरणार आहे. प्रत्येक आघाडीवर अपेक्षित आणि अनपेक्षित प्रश्न निर्माण झाल्यामुळे क्वचित प्रसंगी तुमचे डोके चक्रावून जाईल. व्यापारात मोठा धोका पत्करू नका. नोकरीत वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. घरामधल्या प्रश्नांवर विचारपूर्वक तोडगा काढाल.

वृषभ महत्त्वाचे ग्रह सध्या तुम्हाला अनुकूल असल्यामुळे भरपूर काम करून भरपूर यश मिळविण्याची तुमची तमन्ना असेल. त्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या व्यक्तींच्या तुम्ही संपर्कात राहाल. हा कालावधी तुमच्या जीवनात अनेक घडामोडी आणणारा आहे. व्यापार-उद्योगात प्रगतीची नवीन दिशा मिळेल. नोकरीमध्ये वेगळ्या स्थळी बदली किंवा कामाच्या स्वरूपात मोठे फेरफार होण्याची शक्यता आहे. घरामध्ये मात्र जोडीदाराच्या स्वास्थ्याविषयी किंवा प्रगतीविषयी चिंता वाटेल.

मुथुन संपूर्ण कालावधी तुम्हाला क्षणाचीही उसंत लाभू देणार नाही. याचे परिणाम तुमचे करिअर, व्यवसाय, नोकरी आणि व्यक्तिगत जीवनावर उमटल्याशिवाय राहणार नाही. व्यापारात स्पर्धकांच्या भीतीमुळे भरपूर काम कराल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि हितशत्रू तुम्हाला डिवचून तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. व्यक्तिगत जीवनात विश्रांती नसल्यामुळे एक प्रकारचा तणाव जाणवेल. व्यापार आणि नोकरीत एखादा नवीन अध्याय सुरू झाल्यासारखा वाटेल.

कर्क तुमच्यातील परोपकारी वृत्ती एखाद्या कारणाने जागृत होईल. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करावेसे वाटेल. नोकरीमध्ये तुमचा सल्ला इतरांना उपयोगी पडेल. घरामध्ये तुमचा सहवास आणि मदत इतरांना मोलाची वाटेल. तुमच्या जीवनात काही वेगळ्या आणि संस्मरणीय घटना घडतील. व्यापार-उद्योगात मोठा धोका पत्करून कमाई वाढवावीशी वाटेल. नोकरीच्या ठिकाणी असुरक्षितता जाणवत राहील. मुलांविषयी, प्रिय व्यक्तीविषयी चिंता राहील.

सिंह सभोवतालची परिस्थिती झपाटय़ाने बदलल्यामुळे नेमके काय करावे असा तुमच्यापुढे प्रश्न असेल. व्यापार-उद्योगात कामाला तोटा नसेल, पण भांडवलाकरिता बरीच मेहनत करावी लागेल. नोकरीमध्ये तुमचा दृष्टिकोन सावध ठेवा. व्यापार-उद्योगात कामाची पद्धत बदलेल. नोकरीमध्ये फेरफार, बदली, परदेशात स्थलांतर होईल. घरामध्ये वडिलोपार्जति इस्टेट, जमीनजुमला अशा प्रकारचे प्रश्न नव्याने डोके वर काढतील. प्रकृतीच्या जुन्या आजारांकडे लक्ष ठेवा.

कन्या साध्या यशाने आता तुमचे समाधान होणार नाही. त्याचे प्रमाण वाढविण्याकरिता भरपूर काम करावेसे वाटेल. व्यापार-उद्योगात जादा प्राप्ती करून देणारे काम स्वीकाराल. नोकरीमध्ये एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल. घरामध्ये प्रत्येक कामात तुमचा पुढाकार इतरांना हवाहवासा वाटेल. संपूर्ण कालावधी तुमच्या दृष्टीने बराच धावपळीचा पण चांगला ठरेल. व्यापार-उद्योगात नवीन कार्यपद्धती अमलात आणाल. नोकरीमध्ये नवीन कामगिरीकरिता तुमची निवड होईल.

तूळ पंचमस्थानातील रवी तुम्हाला तुमचे घर आणि नोकरी, व्यवसाय या दोन्ही ठिकाणी एकदम सक्रिय ठेवणार आहे. व्यापार-उद्योगात ज्या कामातून नफा वाढणार आहे त्यावर लक्ष केंद्रित कराल. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची संधी दृष्टिक्षेपात येईल. संपूर्ण कालावधी तुम्हाला अशांत पण लाभदायक ठरेल. व्यापार-उद्योगात मोठे धाडस करून भरपूर पसे कमवावेसे वाटतील. घरामध्ये महत्त्वाच्या कामात तुमचा पुढाकार असेल.

वृश्चिक व्यापार-उद्योगात वारा वाहील तशी पाठ फिरवण्याचे धोरण ठेवा.  घरामध्ये तुमच्या कामाचे आणि तुमचे महत्त्व वाढेल. संपूर्ण कालावधी घडामोडी घडवून आणणारा आहे. त्याचा तुमच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनावर बराच मोठा परिणाम होईल. व्यापार-उद्योगात नवीन कार्यपद्धती सुरू होईल. नोकरीमध्ये संस्थेच्या धोरणामुळे तुमची बदली किंवा कार्यपद्धतीत बदल होईल. घरामध्ये महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतील, ज्यामुळे तुमच्या नियोजनाला फारसा अर्थ राहणार नाही.

धनू सकृद्दर्शनी सर्व काही ठीक वाटेल, पण तुमच्या अंतर्मनामध्ये एक वेगळीच खळबळ माजलेली असेल त्याचा अंदाज घ्या. व्यापार आणि नोकरीत कोणतेही काम घाईत करू नका. घरामध्ये कर्तव्याला प्राधान्य द्या. या दरम्यान कोणताही धोका न पत्करता आपल्या मर्यादेत राहून काम करा. व्यापार-उद्योगात आíथक बाजू कटाक्षाने सांभाळा. नोकरीमध्ये मेहनत तुमच्या मर्यादेबाहेर जाईल.  घरामध्ये अपेक्षित आणि अनपेक्षित कारणामुळे पसे खर्च होत राहतील.

मकर मोठे काम करण्याची तुमच्यातील महत्त्वाकांक्षा विशेष रूपाने जागृत होईल. व्यापारातील नवीन संधी तुमचे लक्ष आकर्षति करतील. नोकरीमध्ये तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. घरामध्ये प्रत्येक कामात तुमचा पुढाकार राहील. या दरम्यान प्रगतीचा एक नवीन उच्चांक तुम्ही गाठाल. व्यापार-उद्योगात भव्य-दिव्य कामगिरी करून उत्पन्न वाढवाल. नोकरीमध्ये कमाई आणि इतर फायदे वाढविणारे काम तुमच्या वाटय़ाला येईल. घरामधले महत्त्वाचे निर्णय झाल्याने मन शांत होईल.

कुंभ व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे भाग पडेल. नोकरीच्या ठिकाणी सतर्क रहावे लागेल. घरामध्ये नवीन जीवनपद्धतीचा विचार होईल. या दरम्यान ज्या बदलांची नांदी पूर्वी झाली होती, त्याचे नेमके स्वरूप कसे असेल याची कल्पना येईल. व्यापारामध्ये तुमचे इरादे बुलंद असतील. नवीन नोकरी, बढती आणि बदली या सर्वाना महत्त्व येईल. घरामध्ये लांबलेले बेत निश्चित होतील.  नवीन ठिकाणी स्थलांतर आणि प्रॉपर्टी खरेदी शक्य होईल.

मीन व्यापार-उद्योगात नेहमीपेक्षा जादा काम करण्याची तयारी ठेवाल. नोकरीमध्ये महत्त्वाच्या कामाकरिता निवड होण्याचे संकेत मिळतील. घरामध्ये थोडेसे वादविवाद होऊन एखाद्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब होईल. यशाचा मोठा टप्पा तुम्ही गाठू शकाल. व्यापार-उद्योगात देशात किंवा परदेशात मोठय़ा प्रमाणावर काम केल्याचे समाधान मिळेल. नोकरीमध्ये बराच काळ वाट पाहात असलेली संधी मिळाल्यामुळे तुम्ही उत्साही बनाल. घरात सौख्यकारक घटना घडतील.
विजय केळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2016 1:03 am

Web Title: astrology 40
Next Stories
1 दि. १२ ते १८ फेब्रुवारी २०१६
2 दि. ५ ते ११ फेब्रुवारी २०१६
3 दि. २९ जाने. ते ४ फेब्रु. २०१६
Just Now!
X