08 July 2020

News Flash

दि. २९ एप्रिल ते ५ मे २०१६

मेष तुम्ही तुमचे काम बेधडकपणे पार पाडाल.

01vijay1मेष तुम्ही तुमचे काम बेधडकपणे पार पाडाल. व्यापार-उद्योगात तुमचे अंदाज बरोबर ठरल्याने एखाद्या समस्येतून तुमची सुटका होईल. आíथक स्थिती थोडीफार सुधारेल. नोकरीमध्ये अवघड कामात वरिष्ठ आणि हितचिंतक चांगले मार्गदर्शन करतील. नवीन नोकरीच्या कामात जुन्या ओळखी उपयोगी पडतील. घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तीची चिंता असेल तर त्यावर तोडगा निघेल. आवडत्या व्यक्तीच्या जीवनात चांगली घटना घडल्यामुळे सर्वांचा पार्टीचा मूड असेल.

वृषभ  घर आणि नोकरी या दोन आघाडय़ांवर धावपळ होईल. वेळेचे आणि कामाचे कोष्टक व्यवस्थित तयार करा. व्यापार- उद्योगात पसे कमी मिळाल्याने तुम्ही थोडेसे अस्वस्थ व अशांत वाटाल. नवीन कामासंबंधी कोणतीही वाच्यता आधी करू नका. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमचे काम व्यवस्थितपणे कराल, पण अचानक वरिष्ठ एखादे वेगळे काम सांगून चित्त विचलित करतील.

मिथुन आपण केलेले काम उपयोगी पडत नाही अशी भावना तुम्हाला थोडीशी निराश करेल. व्यापार- उद्योगात सगळ्या डगरींवर हात ठेवू नका. पशाच्या कामावर लक्ष केंद्रित करून इतर गोष्टी हाताखालच्यांवर सोपवा. जोडधंदा असणाऱ्यांनी कमाईच्या संधीचा ताबडतोब उपयोग करून घ्यावा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कौशल्यांची संस्थेला गरज असल्याने तुमची बडदास्त ठेवली जाईल. घरामध्ये मतलब साध्य करायचा आहे, त्या व्यक्ती तुमची खुशामत करतील.

कर्क  प्रयत्नांचे फळ मिळते, याची प्रचीती येईल. दोन-तीन महिन्यांपूर्वी ज्यात निराशा होती, त्यात काहीतरी सकारात्मक घडेल. नवीन प्रोजेक्टला गिऱ्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीमध्ये बढती किंवा पगारवाढीची शक्यता आहे. नवीन नोकरीचे प्रयत्न सफल होतील. घरामध्ये आवडत्या व्यक्तीच्या जीवनातील शुभ समारंभ साजरा होईल. लांबचे नातेवाईक भेटतील.

सिंह कोणत्याही कामात माघार न घेता ‘हाती घ्याल ते तडीस न्याल’ असा तुमचा इरादा असेल. व्यापार-उद्योगामध्ये नावीन्यपूर्ण काम कराल. एखाद्या महत्त्वाच्या कमिटीवर तुमची नेमणूक होईल. नोकरीमध्ये बढती किंवा पगारवाढीच्या पूर्वीच्या आश्वासनाची पूर्तता केली जाईल. बदलीकरिता प्रयत्न करा. घरामध्ये तुमच्या निर्णयाचे महत्त्व इतरांना पटेल. इतरांना दिलेला शब्द तुम्ही खाली पडू देणार नाही. नवीन जागा किंवा वाहन खरेदीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

कन्या आशेचा छोटासा किरणही स्फूर्तीदायक ठरेल. कोणावरही विश्वास न ठेवता इतर काही पर्यायांचा अवश्य विचार करा. व्यापार-उद्योगातला खर्च भविष्यात उपयोगी पडेल. मोठय़ा गुंतवणुकीची कामे पुढील एक-दोन आठवडे स्वीकारू नका. नोकरीच्या ठिकाणी तुमचे मन उत्साही असेल. पण शारीरिक मर्यादांचा विचार करा. जास्त भरवसा ठेवू नका. घरामध्ये ‘ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे’ असा प्रत्यय येईल. अर्थातच तुम्ही थोडेसे अलिप्त राहाल.

तूळ माणसांचा योग्य उपयोग करून घ्यायच्या गुणाचा आता तुम्हाला विशेष उपयोग होईल. व्यापार-उद्योगात  मध्यस्थांचा वापर कराल. त्यांच्या आíथक अटी आणि नियमांचा विसर पडू देऊ नका. जुन्या ओळखीतून नवी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आधीच्या कामाचा अचानक उपयोग होईल. लोंबकळलेली काही कामे अचानक गती घेतील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या  सल्ल्यांचा तुम्हाला विशेष उपयोग होईल.

वृश्चिक ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ असा पवित्रा ठेवलात तर तुमची कामे  मुंगीच्या पावलांनी का होईना पुढे सरकतील. व्यवसाय-उद्योगात प्रत्येक कामात अडथळे असल्याने फारसा वेग येणार नाही. निराश होऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कर्तव्यतत्पर राहा. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या प्रश्नामध्ये पुढाकार घेऊन तुम्ही चांगला मार्ग शोधून काढाल. बुजुर्ग  व्यक्तीच्या जीवनात आनंददायी प्रसंग साजरा होईल.

धनू अनुकूलता वातावरणामुळे उत्साह येईल. व्यवसाय-उद्योगात लोंबकळत पडलेल्या प्रश्नाला चांगली कलाटणी मिळाल्यामुळे तुमच्या इच्छा -आकांक्षा पल्लवित होतील. तुम्ही केलेल्या कामाची गिऱ्हाईकांकडून प्रशंसा ऐकू येईल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी पूर्वी एखादे आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण करण्याकरिता वरिष्ठांकडे मागणी करा. घरामध्ये एखादा शुभसमारंभ ठरेल / पार पडेल. दीर्घ काळानंतर लांबच्या व्यक्तीला भेटण्याचा योग येईल.

मकर या आठवडय़ात जास्त काम कराल. व्यापार-उद्योगात प्रलंबित स्वत लक्ष घालून प्रोजेक्टला गती देण्याचा प्रयत्न कराल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या एखाद्या खास कौशल्याचा चांगला वापर करून घेतील. त्याबदल्यात तुम्ही एखादी विशेष सवलत उकळाल. घरामध्ये लांबलेले शुभकार्य निश्चित होईल. आवडत्या व्यक्तीसमवेत वेगवेगळे कार्यक्रम ठरतील. नवीन जागा, वाहन खरेदी करावीशी वाटेल.

कुंभ तुमचा मिश्कील स्वभाव इतरांना दिसून येईल. व्यापार-उद्योगात जनसंपर्क आणि प्रसिद्धी माध्यमांचा तुम्हाला उपयोग होईल. तुमच्या मालाची विक्री वाढविण्याकरिता एखाद्या प्रदर्शनात सहभागी व्हाल. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. काहीजणांना थोडय़ा अवधीकरिता परदेशात जाता येईल. घरामध्ये एखाद्या निमित्ताने छोटा समारंभ ठरेल, त्यामध्ये तुमचा पुढाकार महत्त्वाचा असेल.

मीन नेहमीच्या कर्तव्यामध्ये आधुनिक तंत्राचा वापर कराल, व्यक्तिगत जीवनात मात्र तुमच्यातील धार्मिकता आणि भावुकता विशेषरूपाने दिसून येईल. व्यवसाय- उद्योगात कामाचे प्रमाण वाढल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. एखादी जुनी वसुली करण्याकरिता मोठय़ा व्यक्तीची मदत घ्याल. नोकरीच्या ठिकाणी अवघड कामासाठी वरिष्ठांना तुमचीच आठवण येईल. पण त्यामुळे तुमच्याच कामाचा बोजा वाढेल. घरात मोठय़ा व्यक्तींच्या जीवनातील शुभ प्रसंग साजरा होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2016 1:02 am

Web Title: astrology 48
Next Stories
1 दि. २२ ते २८ एप्रिल २०१६
2 दि. १५ ते २१ एप्रिल २०१६
3 दि. ८ ते १४ एप्रिल २०१६
Just Now!
X