News Flash

दि. ४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०१७

तुमच्या प्रगतीचा वेग हळूहळू वाढत असल्यामुळे स्पर्धकांना तुमच्या-विषयी असूया वाटेल.

Astrology
राशिचक्र

मेष चंद्रग्रहण राशीच्या दशमस्थानात होईल. हे ग्रहण भारतात दिसेल. तुमच्या प्रगतीचा वेग हळूहळू वाढत असल्यामुळे स्पर्धकांना तुमच्या-विषयी असूया वाटेल. व्यापार-उद्योगात आíथक आणि इतर कुवतीचा विचार केल्याशिवाय धाडस करू नका. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या एखाद्या आज्ञेचे विस्मरण होण्याची शक्यता आहे. त्याचा त्यांना राग येईल. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा कारणांवरून वयोवृद्ध व्यक्तींशी मानापमानाचे प्रसंग उद्भवतील.

वृषभ या आठवडय़ात चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसेल. बाहेरून पाहणाऱ्याला तुम्ही अत्यंत शांतपणे काम करताना दिसेल; पण तुमच्या मनामध्ये मात्र अनेक गोष्टींची खळबळ माजलेली असेल. व्यापार-उद्योगात बाजारपेठेमध्ये आपले महत्त्व वाढावण्याच्या नादात बजेटबाहेर पसे खर्च होतील. नोकरीमध्ये सत्तेपुढे शहाणपण नसते याची आठवण ठेवा. तुम्ही केलेले काम तपासून पाहा अणि नंतर वरिष्ठांसमोर सादर करा. घरामध्ये प्रत्येक कामात तुम्हाला गृहीत धरले जाईल. तुम्ही मात्र केवळ आवडीच्या कामाला प्राधान्य द्याल.

मिथुन या आठवडय़ात चंद्रग्रहण होणार आहे. आपण जे काम करतो ते काम इतरांना आवडले पाहिजे असे तुम्हाला वाटेल; पण एखाद्या व्यक्तीने उगाचच टीका केल्यामुळे तुमचा मूड जायला वेळ लागणार नाही. व्यापार-उद्योगात नवीन आणि जुनी  कामे तुम्हाला हाताळावी लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर एखादे अवघड काम पूर्ण कराल. नोकरीमध्ये तुमचे काम बिनचूक होणार आहे या बाबतीत काटेकोर राहा. घरामध्ये सगळ्यांची मने सांभाळताना तारेवरची कसरत होईल.

कर्क या आठवडय़ात चंद्रग्रहण होणार आहे. तुमची रास संवेदनशील आहे. सभोवतालच्या व्यक्तींच्या वागण्या-बोलण्याचा तुम्ही खूप विचार करता. व्यवसाय उद्योगात नवीन हितसंबंध प्रस्थापित करण्यापूर्वी संबंधित व्यक्तींची नीट माहिती काढा. आíथक आवक चांगली असली तरी मिळालेले पैसे अपुरेच वाटतील. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या बोलण्यावर जास्त विश्वास न ठेवता तुमचे काम वेळेत आणि व्यवस्थितपणे पार पाडा. घरामध्ये खर्चाच्या वेळेला तुमच्याकडे बोट दाखवतील.

सिंह कुठल्याही कामाकरिता कोणाचीही मखलाशी करायला तुम्हाला आवडत नाही. व्यापार-उद्योगात प्रतिस्पर्धी काय करतात याकडे तुमचे लक्ष असेल. त्या नादात तुमच्या हातून जास्त पसे खर्च होतील. गुप्त शत्रू डोके वर काढतील. नोकरीमध्ये आपण बरे आणि आपले काम बरे असा दृष्टिकोन ठेवा. सहकाऱ्यांनी दिलेली माहिती पडताळून पाहा. शेजारीपाजारी आणि जोडीदाराशी समंजसपणे वागा. सामाजिक कार्यात विचित्र अनुभव येईल.

कन्या या आठवडय़ात चंद्रग्रहण होणार आहे.  इच्छा-आकांक्षा वाढल्यामुळे तुमचे कशानेच समाधान होणार नाही. त्यामुळे तुम्ही मृगजळाजवळ धावण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात छोटी छोटी कामे करण्यापेक्षा एक मोठा हात मारावासा वाटेल; पण त्यातील संभाव्य धोका काय आहे तो आधीच समजून घ्या. नोकरीमध्ये तुम्ही स्वयंभू राहणे चांगले. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या बाबतीमध्ये तात्पुरती चिंता निर्माण होईल. त्याचे निरसन झाल्यावर तुमचे मन शांत होईल. आवडत्या व्यक्तीचे नखरे सांभाळावे लागतील.

तूळ या आठवडय़ामध्ये चंद्रग्रहण होणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला खूप काम करावेसे वाटेल; पण त्यामागील यश घरामधल्या स्वास्थ्यावर अवलंबून असेल. व्यापार-उद्योगामध्ये  एखादा मोठा हात मारावासा वाटेल. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना बरेच काम मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी काही सांगण्यापूर्वीच तुम्ही ते काम तयार ठेवा. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या प्रश्नांमुळे थोडीशी चिंता राहील. जुने वाद नव्याने डोके वर काढतील.

वृश्चिक तुमची रास अत्यंत बुद्धिमान रास आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या मदतीची गरज असते त्या वेळी तुम्ही जिभेवर साखर पेरता. व्यापार-उद्योगात एखादा खर्चीक प्रस्ताव तुमच्यापुढे असेल. भविष्यकाळात त्यातून तुम्हाला फायदा होईल. जोडधंदा असणाऱ्यांना एखादे आव्हानात्मक काम स्वीकारावे लागेल. नोकरीमध्ये तुमचा कामाचा दर्जा उत्तम राहील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींशी तात्त्विक मतभेद होतील त्याकडे लक्ष न देता त्यांचा मतलब सांभाळा.

धनू प्रत्येक व्यक्ती काही बाबतीत संवेदनशील असते. या आठवडय़ा-मध्ये एखाद्या घरगुती प्रश्नामुळे तुम्ही थोडेसे विचारात पडाल. व्यापार-उद्योगात नवीन कराराचे प्रस्तावातील अटी आणि शर्तीचा विचार केल्याशिवाय त्यावर शिक्कामोर्तब करू नका. नोकरीमध्ये स्वत:चे काम निगुतीने करा. प्रवासाच्या वेळेला महत्त्वाची कागदपत्रे नीट सांभाळा. घरामध्ये  तुमच्या हातून काही चूक झाली तर ती बुजुर्गाना सहन होणार नाही.

मकर स्वभावत: तुम्ही भावुक नाहीत; पण या आठवडय़ामध्ये एखाद्या प्रश्नाचा तुम्ही खूप विचार कराल. व्यापारउद्योगात एखाद्या नवीन प्रस्ताव तुमच्यापुढे येईल. त्यातून बरेच पसे मिळतील असे तुम्हाला वाटेल; पण हा प्रकार म्हणजे ‘दुरून डोंगर साजरे’ असा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. झालेले काम बिनचूक आहे, याची खात्री करून घ्या. घरामध्ये एखाद्या शब्दामुळे जोडीदाराशी गरसमज होण्याची शक्यता आहे. त्याचा जास्त विचार करू नका.

कुंभ एखाद्या कामात तुम्ही तुमचे कौशल्य, बुद्धिमत्ता पणाला लावाल. त्यामुळे तुमची बरीच दमणूक होईल. व्यापारउद्योगात स्पर्धकांच्या तयारीचा अंदाज घ्या. त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. नोकरीमध्ये तुमच्याकडे काही विशेष कौशल्य असेल तर त्याला वेगळी मागणी राहील. वरिष्ठ एखादे जास्त काम तुमच्याकडून पूर्ण करून घेतील. घरामध्ये छोटय़मोठय़ा प्रश्नात मानापमानाची भावना ठेवू नका. हवामानातल्या बदलामुळे प्रकृतीला थोडासा त्रास संभावतो.

मीन तुमचे घर आणि करिअर या दोन्ही आघाडय़ांवर तुम्हाला सतर्क राहण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवा. व्यापार-उद्योगात मत्री आणि पसा या दोन्ही वेगळ्या असतात हे लक्षात ठेवा. पूर्वी केलेल्या कामातून एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला प्रोत्साहन देऊन तुमच्याकडून चांगले काम करून घेतील. घरामध्ये आपुलकीच्या व्यक्तींची हजेरी लागेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2017 1:01 am

Web Title: astrology 4th august to 10th august 2017
Next Stories
1 दि. २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०१७
2 भविष्य : दि. २१ ते २७ जुलै २०१७
3 दि. १४ ते २० जुलै २०१७
Just Now!
X