सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष बुध-हर्षलच्या प्रतियोगामुळे बुद्धिमत्तेचा योग्य वापर कराल. तंत्रज्ञानाचा व्यावहारिक पातळीवर उपयोग करून नाव कमवाल. नोकरी-व्यवसायात कल्पकतेची व्याप्ती वाढवाल. सहकारीवर्गाला कामासाठी उत्तेजित कराल. इतरांच्या कामावर टीका न करता त्यात योग्य ते बदल सुचवाल. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. कौटुंबिक नाती जोपासाल. उष्णतेच्या त्रासामुळे पोटाचे आरोग्य बिघडेल. घरगुती उपाय व सात्त्विक आहार आवश्यक!

वृषभ चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे विचारातील चंचलता वाढेल. धाडसी निर्णय घेण्याची तयारी ठेवाल. नोकरी-व्यवसायात जिद्दीचे रूपांतर हट्टीपणात होऊ देऊ नका. मनोबळाला बुद्धीची जोड मिळेल. सहकारीवर्गाकडून काम वेळेत पूर्ण होईल. जोडीदारासाठी नावीन्यपूर्ण बेत आखाल. सुखाचे दिवस उपभोगता येतील. कौटुंबिक वातावरण समाधानकारक असेल. प्रजनन संस्थेचे प्रश्न सोडवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेणे इष्ट!

मिथुन शुक्र-चंद्राच्या नवपंचम योगामुळे आनंदी व उत्साही वातावरणात खरेदीचा अनुभव घ्याल. रसिकता व कलात्मकता यांचा सुरेख मिलाफ होईल. नोकरी-व्यवसायात प्रगतीकारक घटना घडतील. सहकारीवर्ग इतर प्रकल्पांच्या आयोजनात व्यस्त असेल. भावनिक समतोल राखाल. जोडीदाराला आवश्यक ती वैचारिक मोकळीक व स्वातंत्र्य द्याल. कौटुंबिक वातावरणात चढउतार येतील. सामंजस्याने परिस्थिती हाताळाल. आरोग्य चांगले राहील.

कर्क चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे हुशारी व चपळता वाढेल. मन अस्थिर व चंचल होईल. नको ते विचार मनातून काढून टाका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. सहकारीवर्गाला त्यांच्या चुका दाखवण्यापेक्षा योग्य मार्गदर्शन करून कामाला गती आणाल. जोडीदाराच्या कलाकलाने घ्याल. त्याच्या कार्यक्षेत्रातील व्याप्तीचा मान राखाल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. हाडांची स्थिती विचलित झाल्याने गुडघा वा टाचेला सूज येण्याची शक्यता!

सिंह रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे प्रभावशाली वाणीने व कार्याने उच्च पद भूषवाल. मानसन्मान मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या ओळखी लाभदायक ठरतील. कामानिमित्त लहान- मोठे प्रवास कराल. मोठय़ा योजनांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावाल. सहकारीवर्ग नियमांची चोख अंमलबजावणी करेल. तक्रारीला जागा ठेवणार नाही. जोडीदारासह तात्त्विक मुद्दय़ावर वाद होईल. जुन्या परंपरा व नव्या विचारांचा सुरेख मिलाफ कराल. तापाची लक्षणे दिसतील.

कन्या चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे कलात्मक छंद जोपासाल. स्वत आनंदी राहाल आणि इतरांनाही आनंद द्याल. कला क्षेत्रात नव्या संधी मिळतील. नोकरी-व्यवसायात आपल्या नावीन्यपूर्ण कार्याचा गौरव होईल. आíथक साहाय्य मिळेल. सहकारीवर्गाच्या चांगल्या गुणांचे कौतुक कराल. ज्येष्ठांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. नसा, शिरा आखडणे असा त्रास संभवतो.

तूळ शुक्र-चंद्राच्या केंद्र योगामुळे मनाजोगत्या चोखंदळ खरेदीचा आनंद लुटाल. सुट्टीचा उपभोग घ्याल. उत्तम गोष्टींची अभिलाषा बाळगाल. नोकरी-व्यवसायात कार्यकुशलता दाखवून द्याल. दर्जेदार भाषाशैलीचा प्रभाव पाडाल. सहकारीवर्गाला मदतीचा हात पुढे कराल. जोडीदारासह असलेले वैचारिक वाद बाजूला ठेवून एकमेकांना चांगली साथ द्याल. कुटुंबातील सदस्यांना प्रवासाची संधी मिळेल. फोड, पुळी येऊन त्यात पू साचेल. त्याचा निचरा होणे आवश्यक!

वृश्चिक रवी-नेपच्यूनच्या षडाष्टक योगामुळे मानसिक स्थिती नाजूक होईल. संवेदनशीलता वाढेल. मित्र, नातेवाईक दिलेला शब्द पाळणार नाहीत. यामुळे आपल्या भावना दुखावल्या जातील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारीवर्गासह आपल्या मागण्या व्यवस्थापकांपुढे मांडाल. जोडीदार आपली नाजूक स्थिती समजून घेईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंब सदस्याची प्रगती, बढती संभवते. अचानक पोट बिघडू शकते.

धनू चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे लहानसहान गोष्टींमुळे भावनांचा उद्रेक होईल. हट्टीपणा आटोक्यात ठेवावा लागेल. पडझड होऊन मार लागण्याची शक्यता दिसते. नोकरी-व्यवसायात अधिकारवाणीने हक्क गाजवाल. सहकारीवर्गाला आवश्यक ती मदत कराल. पण अटी लागू कराल. उशिरा का होईना पण केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. जोडीदारासह अविचाराने अंतिम निर्णय घेऊ नका. दोघांचे नुकसान होईल. दंड, खांदे यांचे स्नायू आखडणे असा त्रास उद्भवेल.

मकर शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे साधकबाधक विचार करून निर्णय घ्याल. दीघरेद्योगीपणाचे फळ नक्कीच मिळेल. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. सहकारीवर्ग साहाय्य करेल. मित्रमंडळी व नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. उत्साह वाढेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वतच्या हिमतीने पार पाडाल. जोडीदाराचा भावनिक पािठबा आपली उमेद वाढवेल. कौटुंबिक वातावरणात स्थर्य निर्माण कराल. प्रदूषणामुळे श्वसन संस्था कमजोर पडेल. प्राणायाम हितावह ठरेल.

कुंभ चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे व्यवहारचातुर्याची झलक दाखवाल. चौकस बुद्धीमुळे लाभ होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या विश्वासाला पात्र ठराल. सहकारीवर्ग नव्या अडचणी घेऊन पुढे उभा राहील. अभ्यासपूर्वक पद्धतीने एकेक प्रश्नाची उकल शोधाल. मुद्दे मांडण्यात आपला हात कोणी धरू शकणार नाही. वाचनाची आवड जपाल. जोडीदारासह दोन घटका निवांतपणे घालवाल. सर्वच कामे वेळेवर झालीच पाहिजेत असा अट्टहास सोडा.

मीन रवी व शनी या शत्रू ग्रहांच्या केंद्र योगामुळे महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यात अडीअडचणी येतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा जाच सहन करावा लागेल. त्यांच्या सर्व अपेक्षा आपल्याकडून पूर्ण होणे कठीणच. सहकारीवर्ग मदतीसाठी तत्पर असेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात अधिकार गाजवेल. पोट व मणक्याचे आरोग्य जपावे. वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.