News Flash

राशिभविष्य : दि. ५ ते ११ जुलै २०१९

रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे मानसिक ताण कमी होईल. आत्मविश्वास वाढेल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे मानसिक ताण कमी होईल. आत्मविश्वास वाढेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आगेकूच कराल. यामुळे स्वत:ची व संस्थेची प्रगतिपथावर वाटचाल सुरू होईल. सहकारी वर्ग मदतीसाठी तत्पर असेल. जोडीदारासह चर्चा करून एकमेकांमधील गरसमज दूर कराल. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी शब्दाने शब्द वाढवू नका. औषधोपचाराने कफविकार ताब्यात ठेवा.

वृषभ गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे समाजकार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती कराल. नोकरी-व्यवसायातील अडीअडचणींवर प्रयत्नांनी मात कराल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गाच्या मदतीने व अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवे  काँट्रॅक्ट मिळवाल. वैचारिक व बौद्धिक पातळीवर जोडीदारासह सूर चांगले जुळतील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. घसा व पोट सांभाळा.

मिथुन बुध-मंगळाच्या युतीयोगामुळे बुधाच्या बौद्धिक व वैचारिक शक्तीला मंगळाच्या उत्साहाची साथ मिळेल. कल्पकता वाढेल. परंतु धरसोड वृत्तीला आळा घालणे आवश्यक! नोकरी- व्यवसायात आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडाल. कोणाच्या वर्मावर बोट न ठेवता वाद थोडक्यात मिटवा. जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील. अन्यथा कौटुंबिक वातावरणावर याचा परिणाम होईल. डोकेदुखी, अ‍ॅलर्जी, त्वचाविकार यावर त्वरित औषधोपचार करावा.

कर्क चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे जोश वाढेल. तसेच चंचलताही वाढेल. नोकरी-व्यवसायात स्वत:च्या विचाराने पुढे जाण्याचा प्रयत्न कराल, पण वरिष्ठांना ते रुचणार नाही. सहकारी वर्ग आपला पाय मागे खेचतील. जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रात व्यस्त असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे त्याचे थोडे दुर्लक्ष होईल. आपणास कुटुंबाची विशेष काळजी घ्यावी लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. कुटुंब सदस्यांना प्रवासाचा योग येईल. मज्जासंस्थेचे आरोग्य सांभाळा.

सिंह चंद्र-शुक्राच्या लाभयोगामुळे नवनिर्मितीचा आनंद घ्याल. आवडत्या छंदासाठी वेळ राखून ठेवाल. काम व आराम यांचा समतोल साधाल. मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतील. नोकरी-व्यवसायात जुन्या ज्येष्ठ वरिष्ठांच्या ओळखीतून कामे होतील. सहकारी वर्गाला मदत कराल. जोडीदाराच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. प्रेमाच्या व धीराच्या शब्दांनी एकमेकांना भावनिक आधार द्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रवासयोग संभवतो.

कन्या गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे बहीण, भावंडं, नातेवाईक यांच्या भेटी होतील. मंगल कार्य ठरेल. मनमोकळ्या चच्रेने कौटुंबिक ताणतणाव दूर कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा मान राखावा लागेल. सहकारी वर्गासह वाद टाळावेत. आपण बरे, आपले काम बरे! जोडीदार आपली स्थिती समजून घेईल. समजुतदारीच्या चार गोष्टी सांगेल. पोटऱ्यांत पेटके येतील. हलका मसाज करावा.

तूळ रवी-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे लेखनासाठी नवी प्रेरणा मिळेल. अंत:स्फूर्तीने नावीन्यपूर्ण गोष्टींची निर्मिती कराल. नोकरी-व्यवसायात ध्येय पूर्ण करण्यासाठी आगेकूच कराल. स्वत:बरोबर इतरांच्या प्रगतीला हातभार लावाल. सहकारी वर्गाला त्यांच्या सादरीकरणात मोलाचे मार्गदर्शन कराल. जोडीदाराचा मूड सांभाळून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करावी. कुटुंब सदस्यांना शिस्तीचे धडे द्याल. पायाला जखम होऊन पू होण्याची शक्यता!

वृश्चिक मंगळ-हर्षलच्या केंद्रयोगामुळे झटपट निर्णय घेऊ पाहाल. परंतु समोरच्या परिस्थितीचा साकल्याने विचार करूनच अंतिम निर्णय पक्का करा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांशी वाद टाळावेत. सहकारी वर्ग नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडेल. अविचाराने आíथक उलाढाल करू नये. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रश्नांनी ग्रासून जाईल. त्याला आपल्या साहाय्याची गरज भासेल. मज्जासंस्थेच्या तक्रारी दुर्लक्षित करू नका.

धनू शनी-रवीच्या प्रतियोगामुळे अडीअडचणींवर मात करण्यासाठी अधिक कार्यशक्ती खर्ची पडेल. शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल. नोकरी-व्यवसायात दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जिद्दीने यश मिळवाल. सहकारी वर्गाची वाखाणण्याजोगी मदत मिळेल. जोडीदार आपली स्थिती समजून घेऊ शकणार नाही. वाद टाळावेत. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मूत्रविकार, डोळे व घसा यांचा त्रास होण्याची संभावना!

मकर गुरू-रवीच्या षडाष्टक योगामुळे आरोग्याच्या तक्रारींकडे विशेष लक्ष द्या. वैद्यकीय उपचार करावे लागतील. अ‍ॅलर्जीचा त्रास वाढेल. ओटीपोटाचे आरोग्य सांभाळा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे साहाय्य मिळणे कठीण. नव्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतील. सहकारी वर्ग आपली बाजू सांभाळून घेईल. जोडीदाराच्या कलेने घ्याल. मोकळेपणाने संवाद साधून गरसमज दूर कराल. कौटुंबिक समस्या शांतपणे समजून घ्याव्यात. शब्दाने शब्द वाढवू नये.

कुंभ शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे चिकाटी, सातत्य व संयम यात भर पडेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. नव्या योजना मांडाल. सहकारी वर्गाच्या समस्या व्यवस्थापन समितीपुढे सादर कराल. त्यांना न्याय मिळवून द्याल. नातेवाईकांत गरसमज पसरतील. विशेष प्रयत्नांनी ते दूर कराल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण धावपळीचे राहील. कुटुंब सदस्यांसाठी वेळ व पसा खर्च कराल. पित्त व कफविकार सतावतील.

मीन रवी-शनीच्या षडाष्टक योगामुळे अंतिम निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल. अशा वेळी सारासार विचार करावा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्यावर क्लिष्ट कामे सोपवतील. बौद्धिक व शारीरिक शक्ती जास्त प्रमाणात खर्च करावी लागेल. जोडीदारासह खटके उडतील. कौटुंबिक वातावरणातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न कराल. छाती व बरगडय़ांचे आरोग्य जपा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 1:01 am

Web Title: astrology 5 to 11 july 2019
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २८ जून ते ४ जुलै २०१९
2 राशिभविष्य : दि. २१ ते २७ जून २०१९
3 राशिभविष्य : दि. १४ ते २० जून २०१९
Just Now!
X