07 July 2020

News Flash

दि. १३ ते १९ मे २०१६

नोकरीमध्ये महत्त्वाची कामे हाताळून इतर गोष्टी हाताखालच्या व्यक्तींवर सोपवाल.

01vijay1मेष कामही करायचे आणि जीवनाचा थोडाफार आस्वाद घ्यायचा असा तुमचा दुहेरी हेतू असेल. त्यानुसार तुम्ही तुमचे वेळापत्रक आखाल. व्यापार-उद्योगात कामाचा व्याप वाढविल्याशिवाय फायद्याचे प्रमाण वाढणार नाही असे तुम्हाला वाटल्यामुळे जादा भांडवलासाठी कर्ज घ्याल. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे हाताळून इतर गोष्टी हाताखालच्या व्यक्तींवर सोपवाल. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवासाचे योग संभवतात.

वृषभ जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो त्या वेळी तुम्ही मनातल्या मनात सध्या जे काम चालू आहे त्याचा दर्जा कसा वाढवता येईल याचा विचार करता. या आठवडय़ात अशीच एखादी अफलातून कल्पना तुमच्या मनात येईल. व्यवसाय-उद्योगात सरकारी कामे किंवा कोर्ट व्यवहार यांना गती देण्यासाठी सक्रिय व्हाल. पशाची आवक वाढेल. नोकरीमध्ये प्रत्येक कामात तुमचा पुढाकार असल्यामुळे वरिष्ठ खूश होतील. घरातल्या सर्वाची भिस्त तुमच्यावर असेल.

वृषभ या आठवडय़ात तुमची इच्छा असो वा नसो, काही  गोष्टी तुम्हाला हाताळाव्या लागतील. त्यामध्ये आळस झाला तर हातातील संधी निसटून जाईल. व्यापार-उद्योगात ‘दाम करी काम’ हे लक्षात ठेवून केवळ आíथक व्यवहारांवर लक्ष ठेवा. बँक किंवा इतर मार्गाने पशाची वसुली होणार असेल तर त्यावर लक्ष केंद्रित करा. घरामध्ये स्वत:च्या मतलबाकरिता पसे खर्च करताना भान राहणार नाही. विवाहोत्सुक मंडळींना चांगला सप्ताह आहे.

कर्क ७ ‘मन की खुशी दिल का राज’ या म्हणीची आठवण तुमच्याकडे बघून येईल. या आठवडय़ात इतरांनी तुमच्या म्हणण्याला मान दिला पाहिजे हा तुमचा आग्रह पूर्ण होईल. व्यापार-उद्योगात तुमच्या मनात असलेले काम तडीस जाईपर्यंत तुम्ही स्वस्थ आणि शांत बसणार नाही. नोकरीमध्ये तुमच्या शब्दाला मान दिला जाईल. त्यामुळे भरपूर काम कराल. नवीन नोकरीच्या कामात यश लाभेल. घरामध्ये कुटुंबीयांसमवेत हवापालटाकरिता किंवा कार्यक्रमाकरिता प्रवास घडेल.

सिंह तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे कोणत्याही अवघड कामात मुसंडी मारण्याची तुमची तयारी असेल. अर्थात त्याबरोबर ‘हम करे सो कायदा’ ही तुमची वृत्तीसुद्धा दिसून येईल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात काही धोरणात्मक बदल करून कामाचा वेग वाढविण्यात सफल व्हाल. पशाची आवक सुधारण्याकरिता बरीच मेहनत घ्याल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून घ्याल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींचा हट्ट पुरवाल. मुलांच्या प्रगतीकरिता थोडेसे नियोजन कराल.

कन्या गेल्या तीन-चार आठवडय़ांपासून प्रत्येक काम पूर्ण करण्याकरिता तुमची बरीच धावपळ झाली असेल. जीवनाचा थोडासा आनंद लुटावा असे तुम्हाला वाटेल. व्यापार-उद्योगात, उत्पन्नात खूप वाढ झाली नाही तर अनावश्यक खर्च कमी होतील. परदेश व्यवहारांना गती येईल. नोकरीच्या ठिकाणी कंटाळवाणे काम संपुष्टात येण्याची लक्षणे दिसू लागतील. घरामध्ये इतर सदस्य एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात तुमची इच्छा नसताना तुम्हाला ओढून घेतील.

तूळ स्वभावत: तुम्ही संधीसाधू नाही, पण या आठवडय़ात थोडेसे स्वार्थी बनलात आणि आलेल्या संधीचा फायदा घेतलात तर तुम्हालाच त्याचा उपयोग होईल. व्यापार-उद्योगात योग्य कामाकरिता योग्य व्यक्तीचा निवड करा. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर जास्त अवलंबून राहू नका. घरामधल्या व्यक्तींना खूश करण्याकरिता काही विशेष बेत आखाल, पण त्याची आकडेमोड आधीच करून ठेवा. नाहीतर बजेटबाहेर पसे खर्च होतील.

वृश्चिक एखादी गोष्ट सहजगत्या प्राप्त होत नाही असे पाहिल्यावर तुम्ही प्रयत्न सोडत नाही. उलट त्याच्यामागे हात धुऊन लागता. व्यापार-उद्योगात किचकट व कंटाळवाण्या कामामध्ये थोडीफार सुधारणा दिसू लागेल. नोकरीच्या ठिकाणी अवघड कामाच्या वेळेला वरिष्ठांना तुमची आठवण येईल. त्यानिमित्ताने एखादी विशेष सुविधा बहाल केली जाईल. घरामध्ये एखाद्या मुद्दय़ावरून इतरांचे मतभेद झाले असतील तर त्यामध्ये तुम्ही मध्यस्थी कराल.

धनू ग्रहमान चांगले आहे. त्याचा किती आणि कसा फायदा घ्यायचा हे तुम्हीच ठरवायचे आहे. आठवडय़ाची सुरुवात थोडीशी निराशाजनक होईल, पण नंतर सर्व गोष्टी सुरळीतपणे पार पडतील. व्यापार-उद्योगातील महत्त्वाची कामे तातडीने हाताळा.  नोकरीमध्ये तुमच्या कामाचे महत्त्व असल्याने संस्थेतर्फे तुमची बडदास्त ठेवली जाईल. वरिष्ठ मात्र केलेल्या कामाचे कौतुक करणार नाहीत. घरामधल्या व्यक्ती त्यांच्या मतलबाकरिता तुमची स्तुती करतील.

मकर तुमच्या सहवासात ज्या व्यक्ती येतात त्यांच्याशी तुम्ही नेहमी चांगले हितसंबंध ठेवता. योग्य वेळी त्यांचा उपयोग करून घेऊन तुमचा मतलब साध्य करता. व्यवसाय-उद्योगात मध्यस्थांवर सोपवलेल्या कामांची पाहणी कराल. कमतरता आढळली तर ताबडतोब भरून काढाल. नोकरीच्या ठिकाणी कामात शॉर्टकट घ्यायचा असे तुम्ही ठरवाल, पण त्याचा फारसा उपयोग न झाल्याने नेहमीची पद्धत वापरात आणाल. घरामध्ये पडेल ते काम करण्याची तुमची तयारी असेल.

कुंभ नेहमी तुमचे मन तुम्ही कामात रमविता. त्याच्यापासून थोडे लांब गेलात की बचेन असता, पण या आठवडय़ात कामाच्या वेळी काम करायचे व इतर वेळेला आराम करायचा असा तुमचा इरादा असेल. व्यापार-उद्योगात आपल्या मालाची विक्री वाढविण्याकरिता जुन्या ओळखींचा वापर कराल. नोकरीमध्ये आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे तुम्ही तुमच्या कामाने सिद्ध कराल. घरामध्ये रंगरंगोटी, सजावट वगरे गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल. पाहुण्यांच्या आगमनाची वर्दी लागेल.

मीन हातामध्ये चार पसे खुळखुळले की अनेक नवीन प्रयोग तुम्हाला बघून करावेसे वाटतात. अशी तुमची या आठवडय़ात परिस्थिती असेल. व्यवसाय-उद्योगात कामाचे प्रमाण समाधानकारक असेल. उत्पन्न वाढविण्याकरिता एखादा नवीन प्रयोग करून बघावासा वाटेल. त्याला सुयोग्य व्यक्तींकडून होकार मिळेल. नोकरीमध्ये चांगले काम करून वरिष्ठांना तुम्ही खूश कराल. घरामध्ये एखाद्या विषयावर तुमचे मत किंवा सल्ला इतरांना फायदेशीर ठरेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 1:02 am

Web Title: astrology 50
Next Stories
1 दि. ६ ते १२ मे २०१६
2 दि. २९ एप्रिल ते ५ मे २०१६
3 दि. २२ ते २८ एप्रिल २०१६
Just Now!
X