01vijay1मेष ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या म्हणीची तुम्हाला आठवण येईल. दैनंदिन कामातील तणाव विसरून काही क्षण आनंदात घालवाल. व्यापार-उद्योगात  ताणतणाव कमी असल्याने जे काम तुमच्या हातात असेल त्यावर शांतपणे विचार कराल. जुन्या गिऱ्हाईकांकडून केलेल्या कामाची स्तुती ऐकायला मिळेल. नोकरीमध्ये न आवडणारे काम तुमच्या वाटय़ाला येईल.  घरामध्ये काही कार्यक्रमानिमित्ताने आवडत्या व्यक्तींचे आगत-स्वागत कराल.

वषृभ जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते ती करायला मिळणे यालाच आपण नशिबाचा भाग म्हणतो. तो या आठवडय़ात तुम्हाला मिळेल. तुमच्याजवळ असलेल्या विशेष कौशल्याला वाव मिळाल्यामुळे तुम्ही खूश असाल. व्यापार-उद्योगातील कामाच्या निमित्ताने हितसंबंध जोडले जातील. पशाची आवक सुधारेल. नोकरीमध्ये जे काम इतरांना जमले नाही ते पार पाडून तुम्ही वरिष्ठांशी मर्जी संपादन कराल. घरामध्ये दीर्घकाळानंतर लांबच्या नातेवाईकांशी गाठभेट होईल.

मिथुन एखादी गोष्ट ज्या वेळेला तुम्हाला तीव्रतेने हवी असेल तेव्हा काहीही करण्याची तुमची तयारी असते. याचा प्रत्यय या आठवडय़ात सभोवतालच्या व्यक्तींना येईल. व्यवसाय-उद्योगात पूर्वी केलेले काम मिळण्याची शक्यता आहे. कारखानदारांना परदेशात फेरफटका मारावासा वाटेल. नवीन नोकरीच्या प्रयत्नांत असणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहे. घरामध्ये महत्त्वाच्या कार्यक्रमाकरिता नियोजनाचे काम तुमच्यावर सोपवतील. प्रिय व्यक्तीच्या जीवनातील सुखद वार्ता समजेल.

कर्क जे काम सरळ मार्गाने साध्य होत नाही, त्यामध्ये एखाद्या युक्तीचा वापर करून तुम्ही चांगला तोडगा शोधून काढता. या आठवडय़ात तुम्हाला असा पवित्रा ठेवणे फायद्याचे ठरेल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेले चांगले काम आणि तुमचे हितसंबंध यातून एखादी नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. काही खर्च कमी होतील. नोकरीमध्ये भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने एखादी चांगली बातमी कळेल किंवा घटना घडेल. घरामध्ये सर्वानुमते छान कार्यक्रम होईल.

सिंह तुमचे करियर सुधारणे हे तुमचे मुख्य उद्दिष्ट असेल. परंतु बराचसा वेळ घरगुती आणि इतर कामात घालवायला लागल्यामुळे तुमची धावपळ उडेल. व्यवसाय-उद्योगात महत्त्वाची कामे लांबल्यामुळे वेळ कंटाळवाणा जाईल.  नोकरीमध्ये आवडत नसलेले काम करायला लागल्याने चिडचिड होईल. परंतु त्यातूनही तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल.  घरामध्ये ज्या कामात शांतता प्रस्थापित झाली होती, त्यामध्ये अचानक नवीन कलाटणी मिळेल.

कन्या केलेल्या कामाची पावती मिळाली की प्रत्येक व्यक्तीला धन्य झाल्यासारखे वाटते, असा छान अनुभव देणारा हा आठवडा आहे. व्यापार-उद्योगात अभिनव तंत्रज्ञान उपयोगात आणून कामाचा वेग वाढविण्याचा तुमचा इरादा असेल. त्यानिमित्ताने नवीन व्यक्तींशी ओळखी होतील. जुनी वसुली होईल. नोकरीमध्ये स्वत:चे काम पूर्ण करून वेळ मिळाला तर सहकाऱ्यांना मदत कराल. घरामध्ये सगळ्यांना तुमच्या मदतीचा, सल्ल्याचा उपयोग झाल्याने तुमचा भाव वधारेल.

तुळ तुमच्या कर्तृत्वाला झळाळी आणणारे हे ग्रहमान आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात जरी कामाचे प्रमाण कमी असले तरी तुम्हाला एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे तुम्ही खूप आशावादी असाल. सरकारी कामात आणि कोर्ट व्यवहारात गती येईल. नोकरीच्या  ठिकाणी ज्या कामातून तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा आहे असे काम तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी व उत्साही असाल.

वृश्चिक ग्रहमान बदलले की सर्व काही बदलते. ज्यांनी एकेकाळी तुम्हाला निराश केले होते, त्यांच्याकडून आता मदतीचे आश्वासन मिळेल. व्यवसाय-धंद्यात हाताबाहेर गेलेली परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता प्रयत्न कराल. पूर्वी केलेल्या कष्टांचा आणि ओळखींचा तुम्हाला उपयोग होईल. नोकरीमध्ये एखाद्या कामात गुंतागुंत निर्माण झाली असेल तर त्यामध्ये काहीतरी मार्ग मिळेल.  घरामध्ये एखाद्या विषयावर मतभेद झाले असतील तर त्यामध्ये तडजोडीने समेट घडेल.

धनू संकटे आणि अडथळे कोणालाच नको असतात, पण कधी कधी त्यातूनच चांगले शिकायला मिळते हे लक्षात ठेवून निराश होऊ नका. व्यापार-उद्योगात कोणीतरी काहीतरी सांगते, याच्यावर विश्वास न ठेवता तुमच्या मनाचा आवाज ऐका.  नोकरीच्या ठिकाणी इतरांकडे लक्ष न देता तुमचे काम वेळेत आणि बिनचूक करा. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा कारणावरून वादविवाद होतील. इतरांनी तुमच्यावर केलेली टीका तुम्हाला सहन होणार नाही.

मकर ज्या गोष्टी हातातोंडाशी येऊन पूर्वी तुमच्या हातून निसटल्या होत्या, त्या आता परत मिळविण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. या कामात तुम्हाला तुमचे हितचिंतक भागीदार आणि जोडीदाराकडून चांगले सहाय्य मिळेल. व्यापार-उद्योगात मत्री करार किंवा भागीदाराकडून कामाचा विस्तार करावासा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी अवघड कामात गती आल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. काही जणांना थोडय़ा अवधीकरिता विदेशी जाता येईल. घरामध्ये मंगलकार्य ठरेल.

कुंभ पेरल्याशिवाय उगवत नाही या म्हणीची आठवण करून देणारे ग्रहमान आहे. व्यापार-उद्योगात कामाचा वेग आणि प्राप्ती वाढविण्याकरिता सध्याच्या कार्यपद्धतीत काही सुटसुटीत बदल कराल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या अपेक्षा वाढल्यामुळे कामाचा बोजा वाढेल. बेकार व्यक्तींनी मिळालेली संधी सोडू नये. घरामधल्या व्यक्तींना एखादी छानशी कल्पना सुचवाल. त्याचा आनंद सर्वजण घेतील. पण खर्चाचे खापर मात्र तुमच्या डोक्यावर फोडले जाईल.

मीन ज्या कामात यश मिळण्याची बिलकुल शक्यता नव्हती, त्यामध्ये चांगली कलाटणी मिळाल्याने तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्यापार-उद्योगात ज्यांनी तुम्हाला नकारघंटा ऐकवली होती त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. नोकरीमध्ये आवडत्या कामाकरिता तुमची निवड होईल. काहींना परदेशी जाण्याची संधी मिळेल. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या बाबतीत सुवार्ता कळण्याची शक्यता आहे. सगळ्यांच्या पार्टी ठरवण्याचा मूड असेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com