मेष ग्रहस्थिती तुम्हाला थोडीशी अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे स्वस्थ आणि शांत बसले की विचारमंथन चालू होते. अशाच विचारमंथनातून तुमची अंत:स्फूर्ती तुम्हाला साथ देणार आहे. व्यापार किंवा उद्योगात कार्यक्षमता वाढण्यासाठी आधुनिक पद्धतींचा वापर करावासा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा सल्ला वरिष्ठ आणि सहकाऱ्यांना उपयोगी पडेल. घरामध्ये आवश्यक ती डागडुजी कराल. ही बाब जरी खर्चीक असेल.

वृषभ ग्रह तुम्हाला अनुकूल असल्यामुळे तुमची स्थिती ‘अनंत हस्ते कमलाकराने..’ अशी होणार आहे. जी इच्छा कराल ती योगायोगाने पूर्ण होईल. कारखानदारांना देशात किंवा परदेशात नवीन प्रोजेक्ट हातात घ्यावासा वाटेल. व्यापारी वर्गाला गिऱ्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीमध्ये एखाद्या मीटिंगमध्ये तुमचा प्रभाव चांगला असेल. नवीन नोकरीच्या कामात यश लाभेल. घरामध्ये  तुमची कल्पकता आणि व्यावहारिक दृष्टिकोन इतर सदस्यांना उपयोगी पडेल.

मिथुन ज्या कामाविषयी मनामध्ये धास्ती निर्माण झाली होती त्या कामाला चांगली कलाटणी मिळाल्यामुळे तुमचे मनोधर्य वाढेल. व्यापार-उद्योगात परदेश व्यवहारांना गती येईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे महत्त्व वरिष्ठांना पटल्यामुळे तुमचा जीव भांडय़ात पडेल. त्यांच्याकडून तुम्ही विशेष सवलत घ्याल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये तुम्ही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. मात्र कोणालाही कमी लेखू नका. बुकिंग केलेल्या वास्तूचा ताबा मिळेल.

कर्क तुमची एखादी दीर्घकाळची इच्छा साकार झाली तर त्यात आश्चर्य नाही. व्यापार-उद्योगातील कामाच्या निमित्ताने विविध स्तरांवरील व्यक्तींना भेटण्याचा योग येईल. त्यातून भविष्यात उपयोगी पडणाऱ्या काही घडामोडी घडतील. पशांची आवक वाढेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या शब्दाला मान मिळेल. काही जणांना परदेशी जाता येईल. विशेष सुविधा मिळाल्याने काम करताना मजा वाटेल. घरामध्ये हवापालटासाठी छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे.

सिंह व्यावहारिकदृष्टय़ा विचार केला तर या आठवडय़ात तुम्हाला फारसा फायदा होणार नाही, परंतु भविष्यातील नियोजनाकरिता दिशा मिळाल्याने तुमच्या मनाचे समाधान होईल. व्यापार-उद्योगात पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण येईल. एखादा नवीन प्रोजेक्ट तुमचे लक्ष आकर्षति करेल. नोकरदार व्यक्तींना नाईलाजाने एखादे किचकट आणि कंटाळवाणे काम पूर्ण करावे लागेल. घरामध्ये प्रत्येकाची गरज भागवण्याकरिता जवळचे पसे खर्च करावे लागतील.

कन्या लक्ष्मी चंचल आहे हे तुम्हाला माहीत असल्यामुळे  पैसे खर्च करतेवेळी तुम्ही काही तरी युक्ती शोधता आणि हातातले पसे हातात ठेवता. व्यापार-उद्योगात काही जुनी देणी असतील तर ती देऊन टाकाल. नेहमीच्या कामात बरीच दगदग असेल, पण त्यातून पसे चांगले मिळतील. नोकरीमध्ये स्वत:च्या फायद्याकरिता एखादे आव्हानात्मक काम स्वीकारण्याची तुमची तयारी असेल. घरामध्ये तुमच्या आज्ञेनुसार वागले पाहिजे असा तुमचा हट्ट असेल. त्याला थोडासा विरोध होईल.

तूळ एखादे काम करण्यापूर्वी तुमच्या मनात त्याचे नियोजन चालू असते, अशा नियोजनाचा आता उपयोग होईल. व्यापारी वर्गाला पशाची आवक वाढल्याने बरे वाटेल. एखादी जुनी वसुली करायला हे ग्रहमान चांगले आहे. नोकरीमध्ये संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यामुळे तुम्ही खूश असाल. काही जणांना परदेशी जाता येईल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीच्या जीवनातील शुभप्रसंग ठरण्याची शक्यता आहे.

वृश्चिक एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला पाहिजे असते तेव्हा त्याच्याकरिता काहीही करण्याची तुमची तयारी असते. या आठवडय़ामध्ये तुमचा हा जिद्दी स्वभाव एखाद्या अवघड कामात उपयोगी पडेल. व्यापारी वर्गाला स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एखादी नवीन योजना हातात घ्यावीशी वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी सवलत देण्याचे आश्वासन दिले असेल तर त्याची पूर्तता होईल. काहींना थोडय़ा अवधीकरिता परदेशात जाता येईल. घरामध्ये तुम्ही तुमचा शब्द खरा करून दाखवाल.

धून ज्या कामात खूप अडथळे आले होते त्यामध्ये थोडीशी सुधारणा होण्याची चिन्हे दिसू लागतील. तुमची उमेद वाढेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात स्पर्धकांनी तुमची कोंडी केली असेल तर त्यावर हिमतीने मार्ग काढाल. जुन्या ओळखी काही प्रमाणात उपयोगी पडतील. नोकरीच्या ठिकाणी बेचव कामातून सुटका होण्याची चिन्हे दिसू लागतील. बेकार व्यक्तींना एखादी संधी दिसून येईल. घरामध्ये जोडीदाराच्या सल्ल्याचा तुम्हाला प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षरीत्या उपयोग होईल.

मकर तुमची वाटचाल कठीण आहे, हे माहीत असूनही तुम्ही मागे हटायला तयार होणार नाही. मात्र या नादात भलताच धोका पत्करू नका. व्यापार-उद्योगात जास्त पसे मिळविण्याची घाई असेल. योगायोगाने त्याला अनुसरून एखादी व्यक्ती भेटल्याने तुमच्यातील ही ईष्र्या अधिक तीव्र होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा उत्साह प्रचंड असेल. त्याचा वरिष्ठ/सहकारी योग्य प्रकारे उपयोग करून घेतील. घरामध्ये एखाद्या प्रश्नात बघ्याची भूमिका न घेता योग्य निर्णय घेऊन टाकाल.

कुंभ कोणतेही काम एकटय़ाने करायला तुम्हाला आवडते. पण या आठवडय़ात इतरांकडून तुम्ही कसे सहकार्य मिळवता त्यावर तुमचे यश अवलंबून असणार आहे. व्यापार-उद्योगात खर्चामध्ये काटछाट करणे म्हणजेच फायदा वाढविणे असे वाटेल. जुने गिऱ्हाईक किंवा तुमच्या पूर्वीच्या ओळखी यामुळे काही प्रमाणात फायदा होईल. नोकरीमध्ये तुम्ही केलेल्या सूचना वरिष्ठांना आवडतील. घरामध्ये जोडीदाराशी तात्त्विक कारणावरून वादविवाद होतील, पण मिटायला वेळ लागणार नाही.

मीन कोणतेही काम धुमधडाक्याने करताना तुमच्या मनात एक प्रकारची भीती असते. पण या आठवडय़ात मात्र एखादी नवीन कल्पना सुचेल आणि त्याचाच पाठपुरावा करावासा वाटेल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना समाधानी ठेवण्यासाठी तुमची कल्पकता दिसून येईल. जोडधंदा असणाऱ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. नोकरीच्या ठिकाणी किचकट कामातून शक्यतो स्वत:ची सुटका करून घ्याल. घरामध्ये मुलांच्या विचारांचा तुमच्यावर जास्त प्रभाव असेल.
विजय केळकर

response.lokprabha@expressindia.com