01vijay1मेष वाळवंटात ओएॅसिस दिसल्याप्रमाणे तुमची स्थिती होईल. जरी काही प्रश्न तुमच्यापुढे असेल तरी त्यावर तुम्ही हिमतीने मार्ग काढाल. व्यापार-उद्योगात  आíथक परिस्थिती सुधारण्याची लक्षणे दिसतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एखादे आमिष दाखवून तुमच्याकडून युक्तीने काम करून घेतील. थोडा वेळ मिळाला की तुम्ही हलके फुलके क्षण अनुभवाल. घरामध्ये एखाद्या नवीन व्यक्तीच्या सहवासामुळे वातावरणात उत्साह येईल.

वृषभ स्वभावत: तुम्ही रसिक आणि कलासक्त आहात. त्याचबरोबर जगाचा व्यवहारही नीट सांभाळता. या आठवडय़ात या दोन्हींचा उत्तम समन्वय दिसून येईल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात बाजारातील चढ-उतारांचा फायदा घेऊन तुम्हाला एखादे धाडस करावेसे वाटेल. त्याकरिता आवश्यक असणाऱ्या व्यक्तींची चांगली साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी इतरांकडून कौतुक होईल. घरामध्ये एखादा विशेष कार्यक्रम ठरवायचा असेल तर सर्वाची भिस्त तुमच्यावर राहील.

मिथुन ग्रहमान तुमच्यामध्ये एक नवीन जोम आणि उत्साह निर्माण करणारे आहे. इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. परंतु त्याकरिता भलतेच धाडस करू नका. व्यवसाय-उद्योगात फायदा आणि उलाढाल वाढविण्याकरिता काही नवीन करार-मदार होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुमच्या विशेष कौशल्याला मागणी असेल. त्या निमित्ताने विशेष भत्ता किंवा सवलत मिळेल. घरामध्ये एखाद्या महत्त्वाच्या कार्याची नांदी होण्याची शक्यता आहे.

कर्क ज्या गोष्टींकरिता तुम्ही बरेच दिवस थांबला होता, ती प्रत्यक्षात घडल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. माणसे जमविण्याचा छंदातूनही तुमचा चांगला फायदा होईल. व्यापार-उद्योगात भांडवलाची गरज असेल तर त्याकरिता आवश्यक प्रयत्न करा. व्यापारातील वसुली वाढल्याने पूर्वीची कर्जे फेडता येतील. जोडधंदा लाभदायक ठरेल. नोकरीमध्ये विशिष्ट कामाकरिता जादा सवलत देण्याकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये एखाद्या समारंभाच्या निमित्ताने खरेदी करण्याचे ठरेल.

सिंह सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार नाहीत, पण या आठवडय़ात कामात एक पाऊल पुढे पडल्याचा तुम्हाला आनंद होईल. व्यापार-उद्योगात चालू असलेल्या खर्चामध्ये काटकसर करायचे तुम्ही ठरवाल. तुमचा हा निर्णय म्हणजे ‘तेरडय़ाचा रंग तीन दिवस’ असा प्रकार असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामाचा इतरांनी कंटाळा केला होता ते काम तुम्ही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर पार पाडाल. घरामध्ये सदस्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करणे आवश्यक होईल.

कन्या कितीही मिळाले तरी त्याचे समाधान होत नाही. याचा प्रत्यय या आठवडय़ात तुमच्याकडे बघून येईल. व्यापार-उद्योगात प्राप्तीचे प्रमाणसुद्धा चांगले असल्याने तुम्हाला बरे वाटेल. पण एखादी गुंतवणूक करायला लागल्याने हातातले पसे खर्च करावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी जास्त काम काढून घेण्यासाठी वरिष्ठ तुमची स्तुती करतील. घरामध्ये अनावश्यक कारणांकरिता पशाची तरतूद करावी लागेल. नातेवाईक, मित्रमंडळी तुमच्याकडून पार्टी उकळतील.

तूळ स्वभावत: तुमची रास जीवनाचा आनंद उपभोगणारी आहे. पण तुमची मन:स्थिती द्विधा होईल. तुम्हाला कामही करावेसे वाटेल आणि जीवनाचा आनंदही घ्यावासा वाटेल. व्यापार-उद्योगातील कमाई चांगली असेल. तरीही एखादा नवीन प्रयोग करून बघावासा वाटेल. जोडधंद्यात चांगली प्रगती होईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना एखादी चांगली संधी आकर्षति करेल. घरामध्ये बराच काळ अपेक्षित असणारी एखादी चांगली बातमी कळेल.

वृश्चिक सभोवतालची परिस्थिती जरी तुम्हाला खूप अनुकूल नसली तरी तुमची उमेद वाढेल. तातडीची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. व्यापार-उद्योगात पूर्वीचे काही हितसंबंध तुम्हाला उपयोगी पडतील. जोडधंद्यातून थोडीफार साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन कामात तुम्हाला सहभागी करून घेतले जाईल. घरामध्ये सांसारिक अडीअडचणींकडे दुर्लक्ष करून थोडेसे मनोरंजन करायचे ठरवाल. काही नवीन बेत मनात असतील तर ते इतरांना बोलून दाखवाल.

धनू ग्रहमान तुम्हाला अनुकूल होत असल्यामुळे तुमची निराशा कमी व्हायला सुरुवात होईल. गेल्या दोन-तीन महिन्यांत जी कामे ठप्प झाल्यासारखी वाटत होती त्याला गती येईल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेले काम आणि हितचिंतकांची मदत या दोन्हींचा उपयोग होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांचा गरसमज झाला असेल तर तो दूर होण्याची शक्यता आहे. घरामध्ये काही कारणाने लांबलेला एखादा कार्यक्रम सर्वानुमते निश्चित होईल. वातावरणामध्ये चतन्य निर्माण होईल.

मकर तुमच्या कल्पकतेला भरपूर वाव देणारा हा आठवडा आहे. त्याच्याकरिता आवश्यक असणाऱ्या पशांची तरतूद करावी लागेल. व्यापार-उद्योगात प्रयत्नांती परमेश्वर हा तुमचा नियम असतो, पण या आठवडय़ात मात्र जास्त कमाई करण्याकरिता एखादा वेडावाकडा मार्ग निवडावासा वाटेल. नोकरीमध्ये तुम्ही केलेले कष्ट संस्थेच्या उपयोगी पडतील. पण वरिष्ठ विशेष सवलती द्यायला लगेच तयार होणार नाहीत.

कुंभ ग्रहमान तुम्हाला हळूहळू अनुकूल बनणार आहे. ज्या व्यक्तींनी पूर्वी तुम्हाला नकारघंटा ऐकवली होती त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांकडून काही नवीन कल्पना मिळतील. उलाढाल, फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता त्याचा तुम्हाला वापर करावासा वाटेल. सरकारी कामे आणि कोर्ट व्यवहारांकडे लक्ष द्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमची गरज असल्यामुळे तुमची खुशामत केली जाईल. घरामध्ये एखादे रेंगाळलेले काम गती घेईल.

मीन एखादे काम तुम्ही हातामध्ये घेतले की ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला चन पडत नाही. या आठवडय़ामध्ये तुमची दगदग आणि धावपळ वाढणार आहे. व्यवसाय-उद्योगात एखादी नावीन्यपूर्ण कल्पना तुमच्या मनात िपगा घालेल. त्याकरिता आवश्यक असणाऱ्या माणसांची आणि पशांची जुळवाजुळव करावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामाचा तुम्ही कंटाळा केला होता ते काम करण्याकरिता वरिष्ठ आग्रह धरतील. घरामध्ये किरकोळ कारणावरून इतरांशी रुसवेफुगवे होतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com