01vijayमेष गुरू षष्ठस्थानात येईल. तुमची परिस्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी करणारी आहे. जी गोष्ट तुम्हाला मनापासून आवडते ती करायला वेळ मिळणार नाही. या उलट नको त्या कामात लक्ष घालावे लागेल. व्यवसाय-उद्योगात कोणत्या व्यक्तींशी साथसंगत घ्यावी याविषयी मनात गोंधळ राहील. नोकरीच्या ठिकाणी सहकारी त्यांच्या मतलबापुरते तुमच्याशी गोड बोलतील.  घरामध्ये ‘ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे’ या म्हणीचा प्रत्यय येईल.

वृषभ या आठवडय़ात गुरू पंचमस्थानात येईल. कुटुंबवत्सल असे तुमच्या राशीचे वर्णन केले जाते. घरामधल्या प्रत्येक गोष्टीत  तुम्हाला महत्त्व मिळाले पाहिजे अशी तुमची अट असते. व्यवसाय-उद्योगात कामामध्ये थोडीशी शिथिलता येईल. सगळी कामे स्वत: न हाताळता केवळ आíथक गोष्टींकडे तुमचे लक्ष असेल. घरामध्ये तुमचे महत्त्व वाढविण्याकरिता तुम्ही एखादी युक्ती शोधाल. मुलांच्या वागण्याकडे आणि उपद्व्यापाकडे लक्ष ठेवावे लागेल.

मिथुन गुरू चतुर्थस्थानात येईल. एकाच वेळी अनेक विचार तुमच्या मनात असल्यामुळे नेमक्या कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे यासाठी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. व्यापारउद्योगात महत्त्वाची कामे स्वत: हाताळाल. जोडधंद्यातून काम मिळेल. पण त्यासाठी हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. नोकरीमध्ये केवळ आपल्याच कामावर लक्ष केंद्रित करा. वरिष्ठांच्या सूचना निगुतीने पाळा. घरामध्ये एखाद्या महत्त्वाच्या घटनेची नांदी होण्याची शक्यता आहे.

कर्क गुरू तृतीयस्थानात येईल. ज्या कामांना तुमच्या दृष्टीने महत्त्व आहे, अशी कामे हातात घेऊन त्याला ताबडतोब गती द्याल. व्यापार-उद्योगात सप्ताहाची सुरुवात लाभदायक होईल. पूर्वी पूर्ण केलेल्या कामाचे पसे मिळाल्यामुळे तुम्हाला हुरूप येईल. महत्त्वाच्या गाठीभेटी झाल्यामुळे काही नवीन बेत ठरतील. नोकरीमध्ये एखाद्या मीटिंगमध्ये तुमचा मुद्दा तुम्ही प्रभावीपणे मांडू शकाल. घरामध्ये तुमचे म्हणणे सुरुवातीला इतरांना पटणार नाही, पण नंतर ते योग्य होते असे त्यांना वाटेल.

सिंह या आठवडय़ात गुरू द्वितीयस्थानात येईल. तुमचा मूड मौजमजा करण्याचा असेल, पण तुम्हाला कर्तव्याला महत्त्व द्यावेच लागेल. व्यापार-उद्योगात मनात आलेली गोष्ट कृतीत आणण्यापूर्वी बुजुर्ग व्यक्तींचा सल्ला घ्या, तो तुम्हाला उपयोगी पडेल. नोकरीच्या ठिकाणी झटपट निर्णय घेण्याची प्रवृत्ती तुम्हाला स्वत:ला आणि संस्थेला उपयोगी पडेल. तातडीच्या कामानिमित्त छोटा प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरामध्ये सर्वजण तुमच्या दिलदार वृत्तीचा फायदा घेतील.

कन्या गुरू प्रथमस्थानात येईल. जे काम तुम्ही करणार आहात त्यामधून भरपूर फायदा झाला पाहिजे अशी तुमची अपेक्षा असेल. व्यापार-उद्योगात प्राप्तीचे प्रमाण थोडेसे कमी होईल.  नोकरीच्या ठिकाणी कमी कष्टात जास्त प्रतिसाद मिळावा अशी तुमची अपेक्षा असेल. हाताखालच्या व्यक्तींकडून जास्त काम करून घ्याल. घरामध्ये कोणीही वेडेवाकडे बोललेले तुम्हाला चालणार नाही. केलेल्या कामाचे श्रेय आपल्याला मिळावे असे तुम्हाला वाटेल.

तूळ गुरू व्ययस्थानात येईल. एकामागून एक चांगल्या संधी चालून येत असल्याने तुम्हाला खूप काहीतरी करावेसे वाटेल. व्यवसाय-उद्योगात नवीन प्रस्ताव तुमच्यापुढे येतील. त्याची आकडेमोड कागदावर नीट करा. नवीन करारमदार करण्यापूर्वी त्यातील अटी आणि शर्तीचा नीट अभ्यास करा. नोकरीमध्ये सहकारी गोड बोलून तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. त्याला भुलून न जाता तुमचे काम आधी पूर्ण करा.

वृश्चिक या आठवडय़ात गुरू लाभस्थानात येईल. मनामध्ये अनेक विचारांची गर्दी झाली असेल. तुमची बरीच धावपळ होईल. व्यापार-उद्योगामध्ये लांबलेले प्रश्न सोडविण्याकरिता मध्यस्थांचा वापर करावासा वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठांना जो सल्ला तुम्ही द्याल, त्याचा उपयोग ते स्वत:च्या फायद्याकरिता करतील. सहकाऱ्यांशी तोलून मापून वागा आणि बोला. घरामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी गरसमज असेल तर त्यात समेट घडवून आणायला चांगला आठवडा आहे.

धनू गुरू दशमस्थानात येईल. कोणत्याही कामात घाई-गडबड न करता कासवाच्या गतीने जायचे आणि शर्यत जिंकायची असे धोरण ठेवा. व्यापार-उद्योगात आíथक स्थिती जरी फारशी चांगली नसली तरी हितचिंतकांकडून मदतीचे आश्वासन मिळेल. नोकरीमध्ये जरी आवडीचे काम मिळाले नाही तरी त्रागा करू नका. केलेले काम वरिष्ठांच्या गरजेनुसार आहे की नाही ते तपासून पाहा. नवीन नोकरीच्या कामात थोडासा विलंब होईल. घरामध्ये जोडीदाराशी मतभेद होतील.

मकर या आठवडय़ात गुरू नवमस्थानात येईल. जे काम तुम्ही हाती घेतलेले आहे ते नीट पार पडेल की नाही याविषयी तुमच्या मनात शंका असेल, पण जसजसे तुम्ही कामाला लागाल तसतसे तुम्ही उत्साही बनाल. व्यापार-उद्योगात लांबविलेली कामे हातावेगळी कराल. महत्त्वाच्या व्यक्तीशी भेटून तुम्हाला चांगले संकेत मिळतील. त्यातून एखादा नवीन प्रोजेक्ट सुचेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्याकडून गोड बोलून जास्त काम करून घेतील.

कुंभ या आठवडय़ात गुरू अष्टमस्थानात येईल. सकृत्दर्शनी सर्व काही ठीक वाटेल. तुमची काम करण्याची उमेददेखील खूप असेल. व्यापार-उद्योगात अनेक पर्याय तुमच्यापुढे खुले होतील. त्यातला चांगला पर्याय कुठला हे ठरविण्याकरिता निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या पुढे पुढे केलेत तर जबाबदारी वाढेल. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीची गरज महत्त्वाची असते. ती पूर्ण करण्याकरिता तुम्हाला वेळ आणि पसे हातात राखून ठेवावे लागतील.

मीन या आठवडय़ात गुरू सप्तमस्थानात येईल. या आठवडय़ात जे काही चाललेले आहे त्यावर तुम्ही फारसे समाधानी नसाल. व्यापार-उद्योगात स्पर्धकांविषयी बाजारामध्ये विनाकारण कंडय़ा पिकतील. त्यावर जास्त विश्वास न ठेवता तुम्ही तुमचे काम चालू ठेवा. पशाची गुंतवणूक विचारपूर्वक करा. नोकरीमध्ये एखादे चाकोरीबाहेरचे काम तुम्हाला करावे लागेल. घरामधल्या व्यक्तींच्या वेडय़ावाकडय़ा बोलण्याचा जास्त विचार करू नका. धांदरटपणामुळे तुमच्या हातून सांडलवंड होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com