01vijay1मेष गुरूसारखा भाग्यवर्धक ग्रह राशीच्या षष्ठ स्थानात आला आहे. तेथे त्याचे वास्तव्य एक वर्षांहून अधिक असेल. या दरम्यान तुमच्या निश्चयी आणि मेहनती स्वभावाची खऱ्या अर्थाने परीक्षा होणार आहे. व्यापार-उद्योग आणि नोकरी या आघाडय़ांवर तुम्हाला सतर्क राहून सावधतेने काम केले पाहिजे. व्यापार आणि नोकरीच्या क्षेत्रात महत्त्वाच्या घडामोडी घडतील. घरामध्ये एखाद्या व्यक्तीशी दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.

वृषभ गुरूने राशीबदल करून पंचम स्थानात आलेला आहे. तेथे त्याचे वास्तव्य एक वर्षांहून अधिक काळ असेल. एखादे काम तातडीने करण्याकरिता तुम्ही बरेच प्रयत्न कराल, पण त्याला गती न मिळाल्याने धक्का स्टार्ट पद्धत वापरावी लागेल. या दरम्यान व्यवसाय-उद्योगात प्रगतिकारक घटना घडतील. व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण, सजावट वगरेमध्ये तुम्ही लक्ष घालाल. नोकरीमध्ये पगारवाढ किंवा बढतीची शक्यता आहे. घरामध्ये काही शुभ संकेत मिळतील.

मिथुन गुरू यापूर्वीच राशीबदल करून चतुर्थ स्थानात आला आहे. तेथे त्याचे वास्तव्य आता एक वर्षांहून अधिक काळ असेल. एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये यायचा अवकाश ती ताबडतोब पूर्ण झाली पाहिजे, असा एकंदरीत तुमचा पवित्रा असेल. व्यापार-उद्योगात काही विचित्र अनुभव येतील. नोकरीमध्ये तुमचे बेत इतरांना सांगू नका. घरामध्ये इतरांवर तुम्ही तुमचे विचार लादाल. जमीन-जुमला/ नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्यासंबंधी काही निर्णय अर्धवट राहिले असतील तर ते पूर्ण होतील.

कर्क गुरू नुकताच तृतीय स्थानात आला आहे. तेथे आता त्याचे वास्तव्य एक वर्षांहून अधिक काळ असेल. या दरम्यान तुमचा दृष्टिकोन भव्यदिव्य होईल. ग्रहमान भुलभुलया निर्माण करणारे आहे. व्यापार-उद्योगात चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त नवीन क्षेत्रात विस्तार करावसा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप आणि त्याचबरोबर येणारे अधिकार तुम्हाला मिळतील. घरामध्ये रुसवे-फुगवे आणि नंतर लगेचच समेट होईल. अवघड प्रश्नांची उकल होईल.

सिंह गुरू राशीबदल करून यापूर्वीच धन स्थानात आला आहे. तेथे त्याचे भ्रमण आता एक वर्षांहून अधिक काळ असेल. हा संपूर्ण कालावधी तुमच्या दृष्टीने सौख्यकारक, लाभदायक ठरणार आहे. व्यापार-उद्योगातील कामाचे प्रमाण वाढल्याने उत्पन्नाचे प्रमाणही वाढेल. नोकरीच्या ठिकाणी विशिष्ट कामाकरिता तुम्हाला जादा सवलती, पगारवाढ किंवा भत्ते मिळतील. बेकार व्यक्तींना नोकरी मिळेल. घरामध्ये पूर्वी ठरलेले मंगलकार्य पार पडेल. काही महत्त्वाचे निर्णय होतील.

कन्या गुरू नुकताच राशीबदल करून तुमच्या राशीमध्ये आला आहे. तेथे आता त्याचे वास्तव्य एक वर्षांहून अधिक काळ असेल. राशीतील गुरूच्या भ्रमणामुळे जी कामे लांबली होती, ती मार्गी लागतील. ग्रहमान तुम्हाला थोडेसे स्वप्नाळू बनविणारे आहे. व्यापारामध्ये एखादा नवीन प्रोजेक्ट डोळ्यासमोर असेल. कमी श्रमात जास्त पसे मिळविण्याची तुमची तमन्ना असेल. नोकरीमध्ये कष्टदायक काम संपण्याची चिन्हे दिसतील. घरामध्ये काही महत्त्वाचे बदल दृष्टिक्षेपात येतील.

तूळ गुरू नुकताच राशीबदल करून व्यय स्थानात आला आहे. त्याचे वास्तव्य तेथे एक वर्षांहून अधिक काळ असेल. हा कालावधी तुमच्या दृष्टीने जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्याचा कालावधी आहे. व्यापार-उद्योगात एका हाताने घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने द्यायचे, असा अनुभव येईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमची जबाबदारी वाढवतील. त्यामानाने फायदे देणार नाहीत. घरामध्ये प्रत्येकाच्या गरजा महत्त्वाच्या आणि महागडय़ा ठरतील.

वृश्चिक या आठवडय़ात गुरू राशीबद्दल करून लाभ स्थानात प्रवेश करेल. तेथे त्याचे वास्तव्य एक वर्षांहून अधिक काळ असेल.  ग्रहमान तुमच्या इच्छा-आकांक्षा पल्लवित करणारे आहे, पण त्यासाठी सुखामध्ये कमतरता सहन करण्याची तयारी ठेवा. नोकरी आणि व्यवसायात काहीतरी नवीन करावेसे वाटेल. व्यापार-उद्योगात उत्पन्न वाढविण्याकरिता कष्ट करण्याची तयारी असेल. नोकरीमध्ये वरिष्ठ पगारवाढ किंवा सवलत देतील. घरामध्ये मुलांच्या प्रश्नांवर योग्य तोडगा निघेल.

धनू गुरू राशीबदल करून दशम स्थानात आला आहे. तेथे तो वर्षांहून अधिक काळ राहील. संकटातच आपले खरे हितचिंतक कोण, खोटे कोण याची परीक्षा होते. कोणत्याही प्रश्नांनी डगमगून न जाता प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. नोकरी व व्यापारात चांगले संकेत मिळतील. व्यापारातील अडीअडचणी कमी झाल्याने तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. अवघड कामात सफलता मिळेल. नोकरीमध्ये लांबलेल्या मागण्या पूर्ण होतील. घरामध्ये सबुरीचे धोरण उपयोगी पडेल.

मकर गुरूसारखा भाग्यवर्धक ग्रह नुकताच नवम स्थानात आला आहे. तेथे त्याचे वास्तव्य आता एक वर्षांहून अधिक काळ असेल. हे भ्रमण अनेक दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. तुमच्या महत्त्वाकांक्षेला चालना मिळाल्याने उत्साही दिसाल. व्यापार आणि नोकरीच्या ठिकाणी तुम्ही उसने अवसान आणून काम कराल. व्यापारी वर्गाला देशात किंवा परदेशात काम वाढवावेसे वाटेल. नोकरदार व्यक्तींना एखादी चांगली संधी मिळेल. घरामध्ये लांबलेला शुभ समारंभ पार पडेल.

कुंभ गुरू राशीबदल करून अष्टमस्थानात आला आहे. तेथे त्याचे भ्रमण एका वर्षांहून अधिक काळ असेल. व्यापार-उद्योगातील प्रगतीकरिता मोठे बेत करावेसे वाटतील. जादा पशाची कुमक लागेल. स्वत:ची मर्यादा नीट जाणून प्रत्येक काम हाती घ्या. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मागण्या वरिष्ठांसमोर ठेवा. तुमची महत्त्वाकांक्षा तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, पण ‘अति तेथे माती’ हे विसरू नका. घरामध्ये काही अनपेक्षित खर्चाची नांदी होण्याची शक्यता आहे.

मीन राश्याधिपती गुरूषष्ठ स्थानातून सप्तम स्थानात आला आहे. त्याचे वास्तव्य आता तेथे एक वर्षांहून अधिक काळ असेल. गेल्या वर्षांत ज्या अडथळ्यांना तुम्ही तोंड दिले होते, ते अडथळे आता कमी होऊ लागतील. जी गोष्ट आपल्याला पाहिजे असते ती आपल्याला ताबडतोब मिळत नाही. त्याकरिता धडपड करावी लागते, असा अनुभव व्यापार आणि नोकरीच्या ठिकाणी येईल. घरामध्ये सगळ्यांना मतलबापुरती तुमची आठवण येईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com