01vijayमेष निरभ्र आकाशात अचानक ढग जमा झाल्यांनतर जी परिस्थिती निर्माण होते त्याची तुम्हाला आठवण येईल.  एखादा नवीन प्रश्न उद्भवल्यामुळे तुमचे गणित कोलमडून पडण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात पूर्वी झालेल्या चुकांची तुम्हाला एखाद्या निमित्ताने जाणीव होईल. नोकरीमध्ये चांगली कामे करूनही वरिष्ठ मात्र चुकांवर बोट ठेवतील. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यामुळे आपण नेमके काय चुकलो आहोत याचे तुम्हाला कोडे पडेल.

वृषभ जीवन म्हणजे आशा-निराशेचा लपंडाव असतो, याची आठवण करून देणारा हा आठवडा आहे. ज्या घटनेची तुम्ही आतुरतेने वाट पाहात होता, ती नजरेच्या टप्प्यात येईल. याउलट ज्या गोष्टींकडे तुमचे दुर्लक्ष झाले होते, त्यामुळे त्रास संभवतो. व्यवसाय-उद्योगातील नवीन प्रस्तावावर निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या बाबतीत ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ असे धोरण ठेवा. घरामध्ये जोडीदाराच्या बाबतीत चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे.

मिथुन ज्या संकटाची पूर्वी तुम्हाला चाहूल लागली होती, पण नंतर काही कारणाने त्याकडे दुर्लक्ष झाले होते ते आता पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात हितशत्रूंमुळे त्रास संभवतो. नोकरीच्या ठिकाणी छुपे शत्रूंकडे बारकाईने लक्ष ठेवा.  तुमचे भविष्यातील बेत कोणालाही सांगू नका. घरामध्ये एखाद्या जुन्या प्रश्नाला नव्याने तोंड फुटण्याची शक्यता आहे. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्यावर ताबडतोब औषधपाणी करा.

कर्क ज्या गोष्टी तुम्ही प्रयत्नांवर साध्य करू शकाल त्या तुम्ही नशिबावर सोपवल्यात तर तुमचीच फसगत होईल. व्यापार-उद्योगात इतर अनपेक्षित मार्गाने तुम्हाला मदत मिळाल्याने तुमचे काम होऊन जाईल. महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर विसंबून न राहता स्वयंभू बनणे चांगले. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या प्रश्नामुळे तात्पुरती चिंता निर्माण होईल. आवडत्या व्यक्तींच्या विचित्र वागण्यामुळे तुम्ही कोडय़ात पडाल.

सिंह एक चांगले तर एक वाईट तुमच्या अनुभवाला येणार आहे. करिअरमधल्या प्रगतीमुळे तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल, पण घरामधल्या एखाद्या समस्येमुळे तुम्ही कोडय़ात पडण्याची शक्यता आहे. या दोन्हींचा समन्वय साधणे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल. व्यापार-उद्योगात धनप्राप्ती वाढविण्याकरिता महत्त्वाकांक्षी योजना हाती घ्याल. नोकरदार व्यक्तींना चांगली संधी मिळाल्याने भरपूर काम करावेसे वाटेल. घरामधल्या जुन्या प्रश्नामध्ये तुम्हाला लक्ष घालावे लागेल.

कन्या जे तुमच्याकडे नाही त्याकरिता अस्वस्थ आणि अशांत होऊ नका. व्यवसाय-उद्योगात नवीन पद्धतीच्या कामाची मोच्रेबांधणी सुरू होईल. त्यानिमित्ताने नवीन व्यक्तींशी परिचय होईल. त्या व्यक्तींविषयी सखोल माहिती मिळवा. नोकरीच्या ठिकाणी तुमचे काम शांतचित्ताने केले तर त्याचा दर्जा उत्तम राहील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीच्या सल्ल्याचा तुम्हाला उपयोग होईल. लांबच्या भावंडांविषयी एखादी अर्धवट बातमी कळल्याने गोंधळ उडेल.

तूळ ज्या प्रश्नामध्ये थोडीशी शांतता प्रस्थापित झाली होती त्यामध्ये अचानक काही सनसनाटी घटना घडल्यामुळे तुमचे चित्त विचलित होईल. व्यापार-उद्योगात काही वेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागेल. नोकरीमध्ये कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता स्वयंभू बनणे चांगले. नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्याशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जति इस्टेटीसंबंधी उलटसुलट चर्चा होईल.

वृश्चिक एकीकडे काम करण्याची तुमची उमेद वाढेल, तर दुसरीकडे अनपेक्षित अडथळे निर्माण होतील. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या चुकीमुळे भरुदड सहन करावा लागेल. आíथक व्यवहार काटेकोरपणे सांभाळले तर बरे होईल. नोकरीमध्ये सत्तेपुढे शहाणपण नसते याची आठवण होईल. घरामध्ये सुरुवातीला एखादी गोष्ट तुम्ही इतरांना त्यांच्या पद्धतीने समजून सांगाल; पण त्यांनी न ऐकल्यास तुमचा रागाचा पारा वर जाईल. वाहन आणि मशीन जपून हाताळा.

धनू कोणतेही काम करण्याची तुमची तयारी असेल. ज्या प्रश्नांवर पडदा पडला होता, ते पुन्हा एकदा उग्र स्वरूप धारण करतील. व्यवसाय-उद्योगात एखाद्या संभाव्य धोक्याची तुम्हाला पूर्वसूचना मिळाली असेल व नंतर त्याकडे दुर्लक्ष झाले असेल तर आता तो  प्रश्न तातडीने हाताळावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी मदतीचे आश्वासन देणाऱ्यांनी शब्द फिरवल्यामुळे तुम्हाला एकटय़ाने काम करावे लागेल. घरामधल्या  प्रश्नात तुम्हाला तातडीने हालचाल करावी लागेल.

मकर एखाद्या चांगल्या घटनेमुळे तुमच्यातल्या इच्छाआकांक्षा तीव्र होतील. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या वागण्यामुळे तुम्ही थोडेसे संभ्रमात पडाल. व्यापार-उद्योगात एखादी महत्त्वाची आणि मोठी आíथक समस्या सोडविण्याच्या निमित्ताने खरे हितचिंतक आणि छुपे शत्रू कोण आहेत हे तुमच्या लक्षात येईल. नोकरीमध्ये तुमची सारासार विचारबुद्धी जागृत ठेवा. घरामध्ये मुलांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालावे लागेल. बुजुर्ग व्यक्तींचे मार्गदर्शन त्यांना विशेष उपयोगी पडेल.

कुंभ ज्या कामात तुम्ही लक्ष घालाल ते काम जलदगतीने पार पडेल; पण जिथे तुमचे दुर्लक्ष होईल तिथे काही तरी गोंधळ होण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात प्रत्येक कामाचे भविष्यात काय परिणाम होईल याकडे लक्ष ठेवा. नोकरीच्या ठिकाणी सोपे वाटलेले काम काही कारणाने अवघड होऊन बसेल. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असे तुमच्या लक्षात येईल. घरामध्ये ज्या प्रश्नावर एकमत झाले होते, त्यामध्ये अचानक वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

मीन ‘धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं’ असा अनुभव देणारा हा आठवडा आहे. ज्या व्यक्तींचा तुमच्याशी काहीही संबंध नाही अशा व्यक्तींकडून तुम्हाला चांगली साथ मिळेल. व्यापार-उद्योगात बरेच दिवस मनात घोळत असणारी एखादी कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा संकल्प कराल. नोकरीमध्ये कंटाळवाणे काम संपल्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. घरामध्ये नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याशी वागताना आणि बोलताना त्यांचे अंतरंग जाणून घ्या.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com