News Flash

दि. २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०१६

‘कठीण समय येता कोण कामास येतो’ या म्हणीप्रमाणे सभोवतालच्या व्यक्तींचे अंतरंग समजेल.

01vijayमेष ‘कठीण समय येता कोण कामास येतो’ या म्हणीप्रमाणे सभोवतालच्या व्यक्तींचे  अंतरंग समजेल. व्यवसाय-उद्योगात बदलत्या काळानुसार धोरण बदलणे गरजेचे ठरेल. ज्यांच्याकडून काम करून घ्यायचे आहे, त्यांच्याशी ‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ या रीतीने वागावे लागेल. पशांची तंगी जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कर्तव्यात तुम्ही कुठेही चुकत नाही याची दक्षता घ्या. घरामध्ये सर्वजण तुमच्या आनंदी राहण्याच्या स्वभावाचा फायदा घेतील.

वृषभ अडचणीच्या वेळेला क्षणभर तुमचे मन सरभर होते, पण थोडासा विचार करून तुम्ही त्यावर युक्तीने मार्ग शोधून काढता. या आठवडय़ात तुमच्या या गुणाचा तुम्हाला चांगला उपयोग होईल. व्यवसाय-उद्योगात बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवा. त्यातून तुम्हाला काहीतरी चांगला पर्याय मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी एखादी सवलत देण्याचे पूर्वी मान्य केले असेल तर त्याची त्यांना आठवण करून द्या. बेकार व्यक्तींना काम मिळेल.

मिथुन जीवन म्हणजे आशा-निराशेचा लपंडाव आहे. गेल्या एक-दोन आठवडय़ांतील घटनांमुळे ‘कशातच काही अर्थ नाही’ अशा निष्कर्षांला तुम्ही आला असाल तर एखाद्या अनुकूल घटनेमुळे तुम्ही पुन्हा एकदा आशावादी बनाल. सभोवतालच्या व्यक्तींना तुमच्या वागण्या-बोलण्याचे कोडे पडेल. व्यापार-उद्योगात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. नोकरीमध्ये अवघड कामे शांत चित्ताने हाताळा. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या बाबतीत तणाव निर्माण झाला असेल तर तो कमी होईल.

कर्क ज्यावेळी तुम्ही कामात व्यग्र असता त्यावेळी तुम्हाला कशाचीच आठवण येत नाही. तुमच्याकडे एखादे खास आणि वैशिष्टय़पूर्ण कौशल्य असेल तर त्याचा आता उपयोग होईल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वगुणांना भरपूर वाव मिळेल. घरामधल्या व्यक्तींना तुमच्या सल्ल्याचा आणि सक्रिय मदतीचा, विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठीचे किंवा प्रवासाचे बेत ठरवाल.

सिंह ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ याची आठवण करून देणारे हे ग्रहमान आहे. सहसा कोणत्याही प्रश्नांनी तुम्ही डगमगत नाही. पण या आठवडय़ात एखाद्या विचित्र प्रश्नामुळे तुम्ही थोडेसे विचारात पडाल. व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने आठवडा उत्तम आहे. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाची तुम्हाला पावती मिळेल. नोकरीमध्ये एखाद्या निमित्ताने तुमचा भाव वधारेल. संस्थांकडून विशेष कामगिरीकरिता निवड होईल. घरामध्ये सुख-दु:खाचा वाटा समसमान असेल.

कन्या जी इच्छा मनात आणाल त्याला पूरक वातावरणाची साथ मिळेल. तुमच्या इच्छा-आकांक्षा पल्लवित होतील. व्यापार-उद्योगात एखादे चांगले काम तुमच्या हातून पूर्ण झाल्यामुळे बाजारपेठेतील तुमची प्रतिमा उजळेल. एखाद्या समितीवर तुमची नेमणूक होईल. नोकरीच्या ठिकाणी इतरांना न दिली जाणारी सवलत तुम्हाला मिळेल. घरामध्ये मंगलकार्याची नांदी होईल. बराच काळ एखादी इच्छा तुमच्या मनात तरळत असेल तर ती पूर्ण झाल्याचे समाधान तुमच्या चेहऱ्यावर झळकेल.

तूळ पसा ही एक अशी चीज आहे, ज्यामुळे नवीन नाती जोडली जातात किंवा ती बिघडू शकतात. या आठवडय़ात याबाबत काटेकोर राहा. व्यापारी वर्गाने देण्या-घेण्यावरून कोणाशी संबंध बिघडवू नयेत. जुनी देणी देताना त्रास होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकारी तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतील. त्यामध्ये त्यांचा मतबल असेल, तो वेळीच ओळखा. घरामध्ये इतर सदस्यांचे वागणे दुटप्पी असेल.

वृश्चिक एखाद्या चांगल्या कारणामुळे आपण आनंदी होतो तर जरा काही मनाविरुद्ध झाले तर आपले बिनसायला वेळ लागत नाही. या सगळ्याचा अनुभव देणारे ग्रहमान तुमच्या वाटय़ाला येणार आहे. व्यवसाय-उद्योगात ज्या कामात बिलकूल प्रगती होत नव्हती त्यामध्ये ओळखीच्या व्यक्तीमुळे गती येईल. अपेक्षित पण लांबलेले पसे हातात पडतील. नोकरीमध्ये तुमच्या हातून झालेली चूक निस्तरली गेल्यामुळे तुमचा जीव भांडय़ात पडेल. घरामध्ये वादविवादावर पडदा पडेल.

धनू कोणताही  प्रश्न आपण हाताळू शकू असे तुम्हाला वाटेल. परंतु काम सुरू केल्यावर ‘दिसते तसे नसते म्हणून जग फसते’ असा अनुभव येईल. तुमचा पवित्रा सावध ठेवा. व्यापार उद्योगात जुनी देणी द्यावी लागतील. पसे मिळूनही ते शिल्लक न पडल्याने थोडेसे वाईट वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठांना काय पाहिजे आहे याचा अंदाज घ्या. नाहीतर त्यांचा गरसमज होईल. घरामध्ये एखादा प्रश्न विनाकारण लोंबकळत पडला असेल तर त्यावर तोडगा शोधून काढाल.

मकर ग्रहमान तुम्हाला स्फूíतदायक आहे. प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावे ही तुमची इच्छा आता तीव्र होईल. त्यासाठी वेळप्रसंगी धाडस करण्याची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात नवीन करार किंवा महत्त्वाच्या कामासंबंधीची बोलणी काही कारणाने लांबवली असतील तर त्याला हळूहळू चालना मिळेल. खर्च उपलब्ध झाल्याने खेळते भांडवल हातात असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची मागणी वरिष्ठांनी लांबवलेली असेल तर ती पूर्ण होण्याची लक्षणे दिसू लागतील.

कुंभ ‘मानलं तर समाधान’ अशी तुमची परिस्थिती असणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या मिळणे तुम्हाला अवघड होईल. व्यवसाय-उद्योगात उत्पन्नात चढ-उतार झाल्यामुळे मनात थोडीशी चिंता राहील, पण हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नका. नोकरीच्या ठिकाणी नेहमीच्या कामातून चूक होण्याची शक्यता आहे. ती निस्तरताना बरीच धावपळ उडेल. घरामध्ये इतरांच्या कलाने तुम्हाला वागावे लागेल त्याचा थोडासा मानसिक त्रास होईल.

मीन माणसं जोडणे आणि त्यांच्याशी हितसंबंध वाढविणे याची तुम्हाला स्वाभाविक आवड आहे. या तुमच्या स्वभावाला खतपाणी घालणारे ग्रहमान आहे. व्यवसाय-उद्योगात नवीन काम मिळाल्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह संचारेल. जाहिरात आणि प्रसिद्धी यांचा चांगला उपयोग होईल. नोकरीमध्ये नावीन्यपूर्ण काम करण्याची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या संस्थेकडून केलेल्या कामाची दखल घेतल्यामुळे बरे वाटेल. घरामध्ये एखादे शुभकार्य ठरेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2016 1:03 am

Web Title: astrology 64
Next Stories
1 दि. १९ ते २५ ऑगस्ट २०१६
2 दि. १२ ते १८ ऑगस्ट २०१६
3 दि. ५ ते ११ ऑगस्ट २०१६
Just Now!
X