News Flash

दि. १६ ते २२ सप्टेंबर २०१६

नोकरीच्या ठिकाणी तुमची गरज वरिष्ठांना कळल्यामुळे तुमच्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील.

01vijay1मेष तुमच्या जीवनामध्ये काही ना काही कारणामुळे जी खळबळ माजली होती ती शांत होण्याची लक्षणे दिसू लागतील.  व्यवसाय-उद्योगात आíथक नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई करण्याकरिता एखादा नवीन मार्ग शोधाल. नोकरीच्या ठिकाणी तुमची गरज वरिष्ठांना कळल्यामुळे तुमच्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील. घरामध्ये तुमचा कधी न दिसणारा व्यवहारी स्वभाव सभोवतालच्या व्यक्तींना लक्षात येईल.

वृषभ मंगळाने गेल्या आठ महिन्यांत तुमच्या जीवनावर प्रचंड प्रभाव टाकला होता, त्याचा खरा अर्थ तुम्हाला आता समजेल. आग विझली तरी त्याची धग बाकी राहते, याची आठवण येईल. व्यापार-उद्योगात तुमच्या मर्यादा लक्षात घेऊन कामाची पद्धत ठरवाल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी प्रयत्न कराल. घरामध्ये एखाद्या कारणावरून वादविवाद किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर तो मिटवण्याचा प्रयत्न करावासा वाटेल. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी जाणवतील.

मिथुन मंगळाने तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढविल्या आणि तणावही निर्माण केला. त्याची तीव्रता आता हळूहळू कमी होईल. तुम्हाला नशिबाची थोडीशी साथ द्यायला उपयोगी पडेल. व्यापार-उद्योगात अपेक्षित यश मिळविण्याकरिता सध्याच्या कार्यपद्धतीत बदल करायचे ठरवाल. नोकरीच्या ठिकाणी बदली किंवा कामाच्या स्वरूपात बदल हवा असेल तर त्याकरिता प्रयत्न करा. घरामधल्या काही न चुकवता येणाऱ्या कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागेल. हवापालटासाठी प्रवास कराल.

कर्क मंगळाने गेल्या सात-आठ महिन्यांत प्रिय व्यक्तीच्या बाबतीत काही चिंता निर्माण केली असेल तर आता त्याचे नक्की स्वरूप कळेल. व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण थोडेफार कमी होईल. जुनी देणी दिल्यामुळे बरे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी  वेगवेगळ्या पद्धतीचे काम हाताळण्याची तुम्हाला संधी लाभेल. घरामध्ये आवडत्या व्यक्तीच्या शब्दाला तुम्ही मान द्याल. पण त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे तुम्हाला थोडेसे वाईट वाटेल.

सिंह मंगळाने वर्षांच्या सुरुवातीपासून तुमचे स्वास्थ्य जणू काही हिरावून घेतले होते. आता तुम्ही थोडासा विसावा घेऊ शकाल. व्यवसाय-उद्योगात अनावश्यक खर्च कमी होतील. पशाची आवक साधारण राहील. नोकरीच्या ठिकाणी नवीन जागेवर तुमची नेमणूक होण्याची शक्यता आहे. काही जणांना कामानिमित्त छोटी परदेशवारी करता येईल. घरामध्ये आवडत्या व्यक्तीला खूश ठेवावे लागेल.  जागेतील बदल किंवा जुने घरगुती वाद यावर काहीतरी निर्णय होईल.

कन्या मंगळाने गेल्या सात-आठ महिन्यांत तुमची प्रचंड धावपळ केली. आताही एक ना अनेक योजना तुमचे लक्ष आकर्षति करतील. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात काही महत्त्वाची कामे मार्गी लागण्याचे संकेत मिळतील. तुमच्या हालचालींना वेग येईल. नोकरीमध्ये जरी कामाचा पसारा जास्त असला तरी तुम्ही त्याच्याकरिता आवश्यक तेवढे बळ देऊ शकणार नाही. घरामध्ये प्रत्येकजण आपापल्या कामात गर्क असल्याने कोणाचाच कोणाला ताळमेळ लागणार नाही.

तूळ मंगळाने गेले सात-आठ महिने तुमच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनाला एक वेगळे वळण दिले असेल. त्याचे खरे स्वरूप आता तुमच्या लक्षात येईल. व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण थोडेसे कमी झाल्यामुळे तुम्ही निश्चिंत बनाल. नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही धडाडीने घ्याल. व्यक्तिगत जीवनात सर्वकाही ठीक असून किरकोळ उखाळ्यापाखाळ्यांमुळे थोडासा तणाव जाणवेल.

वृश्चिक गेल्या सात-आठ महिन्यांत तुमच्या जीवनामध्ये अनेक घडामोडी घडल्या असतील. त्याचा नेमका काय परिणाम होईल याचा तुम्हाला अंदाज येईल. पण तणाव कमी होईल हे निश्चित. व्यापार-उद्योगात ‘अनुभवाने माणूस शहाणा होतो’ हे लक्षात येईल. नोकरीमध्ये तुम्हाला अनपेक्षित असलेले बदल आता होऊ शकतील. व्यक्तिगत जीवनामध्ये कोणाशी कसे वागायचे हे तुम्ही ठरवून टाकाल. घरामध्ये जुनी प्रॉपर्टी विकून त्यातून पसे मिळविण्याचा निर्णय होईल.

धनू ग्रहमान तुम्हाला एखाद्या नवीन वळणावर नेऊन ठेवणार आहे. वर्षांच्या सुरुवातीला जे बेत तुम्ही ठरविले होते त्यामध्ये बरेच अडथळे आले. आता ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता तुम्ही प्रयत्न कराल. व्यापार-उद्योगात आíथक स्थिती सुधारणे हे तुमचे मुख्य उद्दिष्ट असेल. नोकरीमध्ये विविध टेबलांवर किंवा वेगळ्या ऑफिसमध्ये बदली होण्याची शक्यता आहे. घरामध्ये विनाकारण लोंबकळत पडलेल्या प्रश्नावर तोडगा शोधाल.

मकर मंगळाने वर्षांच्या सुरुवातीपासून तुमचे आचारविचार बदलले.  खूप काम करून खूप पसे मिळवण्याची इच्छा निर्माण केली. आता तुम्हाला या सगळ्यातील फायदे-तोटे समजून येतील. व्यापार-उद्योगात एखादा मोठा प्रोजेक्ट तुमचे लक्ष आकर्षति करेल. मोठय़ा भांडवलाची गरज भासल्यास त्याची सोय तुम्ही कराल.  नोकरीमध्ये तुमचे अधिकार वाढण्याची शक्यता निर्माण होईल. घरामध्ये काही नतिक कर्तव्ये तुम्हाला पार पाडावी लागतील.

कुंभ मंगळाने वर्षांच्या सुरुवातीपासून अनेक घडामोडी घडवून आणल्या त्याचा तुमच्या जीवनमानावर बराच चांगला-वाईट परिणाम झाला असेल. त्याचे निश्चित स्वरूप तुमच्या लक्षात येईल. व्यापार धंद्यात एखाद्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करावासा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी गेल्या काही महिन्यांत नवीन पद्धतीचे काम सुरू केले असेल तर त्याचे परिणाम तुमच्या लक्षात येतील. घरामध्ये काही कारणाने विस्कळीतपणा आला असेल तर तो मार्गी लावाल.

मीन ग्रहमान मोठय़ा बदलाची नांदी करणारे आहे. जे विचार बराच काळ तुमच्या मनात तरळत होते ते आता कृतीत आणण्याकरिता तुम्ही अधीर असाल. त्याकरिता आवश्यक असणारी मनाची तयारी कराल. व्यवसाय किंवा उद्योगात जुन्या कार्यपद्धतीचा कंटाळा येईल. नावीन्यपूर्ण काम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कराल. नोकरीमध्ये बदली किंवा कामाच्या स्वरूपात बदल होण्याचे संकेत मिळतील. घरामध्ये तुमच्यातील देवभोळेपणा जागृत झालेला दिसेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2016 1:06 am

Web Title: astrology 66
Next Stories
1 दि. ९ ते १५ सप्टेंबर २०१६
2 दि. २ ते ८ सप्टेंबर २०१६
3 दि. २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०१६
Just Now!
X