News Flash

दि. २३ ते २९ सप्टेंबर २०१६

जे मिळेल ते स्वीकारून पुढे चला.

01vijay1मेष गेल्या काही महिन्यांत ज्या गोष्टींकरिता तुम्ही जंग जंग पछाडले होते ती गोष्ट आता कोणाच्या तरी मदतीमुळे मिळण्याची चिन्हे दिसू लागली, पण त्यामध्ये तुम्हाला स्वारस्य नसेल. जे मिळेल ते स्वीकारून पुढे चला. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेले काम उपयोगी पडेल. नोकरीमध्ये कंटाळवाण्या कामातून तुमची सुटका होण्याची चिन्हे दिसू लागतील. घरामध्ये एखाद्या व्यक्तींशी विनाकारण दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर करता येईल.

वृषभ दीर्घकाळाची मनोकामना पूर्ण करण्याकरिता तुम्ही निगुतीने प्रयत्न कराल. त्यामध्ये काही अडथळे असतील तर बुजुर्ग व्यक्तींचा सल्ला आणि सक्रिय मदत तुम्हाला उपयोगी पडेल. व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण थोडेसे कमी असल्यामुळे तुम्ही चिंतेत पडाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याकरिता आव्हानात्मक काम तुम्हाला स्वीकारावे लागेल. घरामध्ये मौजमजा आणि कर्तव्य या दोन्हीला महत्त्व द्यावेसे वाटेल. जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

मिथुन तुमचे घर आणि नोकरी-व्यवसाय या दोन्ही आघाडय़ांवर  सक्रिय राहून काम करण्यासाठी आवश्यक असणारे दैनंदिनीतील बदल करून ठेवावे लागतील. व्यवसाय-उद्योगात आपल्या कामाचा दर्जा वाढविण्यासाठी विशेष बेत आखाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या आग्रहाखातर एखादे अवघड काम हातात घेणे भाग पडेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींची इच्छा पूर्ण केल्याने तुम्हाला एक प्रकारचे आंतरिक समाधान लाभेल.

कर्क ज्या ठिकाणी तुम्ही आता आहात त्या ठिकाणी उत्साहाने काम करून सगळ्यांची मने जिंकता या तुमच्या गुणाचा आता तुम्हाला चांगला उपयोग होईल. व्यापारउद्योगात एखादे नवीन पद्धतीचे काम तुम्हाला सुरू करण्यासाठी विचारमंथन सुरू होईल. आवश्यक ती साधनसामग्री आणि माणसांची जुळवाजुळव तुम्ही करून ठेवा. परदेश व्यवहाराला गती असेल. नोकरीमध्ये अवघड काम फत्ते करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल.

सिंह एक ना एक अनेक कारणांमुळे जी कामे तुम्हाला थांबवावी लागलेली होती ती तुम्ही आता स्वत:हून हातात घ्याल. व्यापार-उद्योगात जरी फारसे सौदे झाले नाहीत तरी आíथक स्थिती चांगली असेल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामातून जास्त सुविधा किंवा भत्ते मिळतात अशा कामाकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये एखादा चांगला कार्यक्रम ठरवावा असा तुमचा मनोदय असेल. त्यासाठी पशाची तरतूद कराल. नवीन जागा किंवा वाहन खरेदी कराविशी वाटेल.

कन्या गेल्या दोन-तीन आठवडय़ांत एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर तुम्ही अडून राहिलेले असाल तर त्यामध्ये आता ठोस उपाय मिळेल. व्यापार-उद्योगात पूर्वी जे काम वाया गेले आहे, असे वाटत होते ते उपयोगी पडेल. कारखानदार आणि उद्योगपती मोठा करार किंवा व्यवहार करण्याच्या विचारात असतील. नोकरीमध्ये संस्थेत एखादा प्रश्न गुंतागुंतीचा झाला असेल तर त्यात तुम्ही चांगला मार्ग शोधून काढाल. घरामधल्या मोठय़ा व्यक्तीच्या जीवनातील प्रसंग साजरा होईल.

तूळ ग्रहमान एका हाताने घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने द्यायचे असे असणार आहे. व्यापार-उद्योगात पसे अडकून पडले असतील तर ते परत मिळण्याची आशा निर्माण होईल. कारखानदारांना नवीन प्रोजेक्टकरिता मोठी गुंतवणूक करावी लागण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमची खुशामत करतील. महत्त्वाचे काम तुमच्याकडून करून घेतील, पण श्रेय तुम्हाला देणार नाहीत. घरामध्ये एखादे मोठे कार्य पार पाडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक मनामध्ये काही विवंचना निर्माण झाल्या असतील तर त्यातून बाहेर पडण्याकरिता तुम्ही निकराने प्रयत्न कराल. त्यात हळूहळू यश मिळेल. व्यापार-उद्योगात वसुली झाली नसेल तर अवश्य प्रयत्न करा. अर्धवट राहिलेली कामे हळूहळू वेग घेतील. नोकरीच्या ठिकाणी केलेले काम कधी वाया जात नाही हे लक्षात ठेवून तुमच्या प्रयत्नात कसूर करू नका. घरामध्ये ज्यांनी तुम्हाला पूर्वी अपमानास्पद वागणूक दिली होती, त्यांना तुम्ही तुमचे महत्त्व दाखवून द्याल.

धनू बऱ्याच अडथळ्यांमुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत झाला असेल तर त्याला चांगल्या वातावरणामुळे चालना मिळेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात एखादी महत्त्वाची आणि मोठी व्यक्ती तुम्हाला मदत करण्याचे आश्वासन देईल. विस्ताराचे बेत पुन्हा एकदा तुमच्या मनात येतील. नोकरीच्या ठिकाणी जी संधी पूर्वी तुमच्या हातून निसटलेली होती ती परत आल्याने तुमच्या इच्छा-आकांक्षा पल्लवित होतील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल.

मकर ‘भगवान के घर देर है, अंधेर नही’ या उक्तीची आठवण येईल. हातातोंडाशी आलेल्या कामामध्ये पूर्वी तांत्रिक कारणामुळे तुमची गरसोय झाली असेल तर त्यात सुधारणा होईल. व्यवसाय-उद्योगात खूप मोठय़ा योजना तुमच्या मनात असल्याने घडय़ाळ्याच्या काटय़ाकडे न पाहता तुम्ही रात्रंदिवस काम कराल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. जादा पगारासाठी सध्याच्या नोकरीत बदल करावासा वाटेल. घरामध्ये एखादे मंगलकार्य ठरेल.

कुंभ अनेक ग्रह चांगले असल्यामुळे तुम्हाला बरेच काम करावेसे वाटेल, परंतु प्रकृतीची साथ कशी मिळेल यावर यश अवलंबून असणार आहे.  व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात मनासारखे काम मिळेल. पण बरेचसे व्यवहार उधारीचे असतील. नोकरीच्या ठिकाणी एखादी मागणी मान्य करून घेण्यासाठी वरिष्ठांच्या कलाने वागावे लागेल. जादा काम करून जादा पसे मिळवता येतील. घरामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तींच्या शब्दाला मान दिला तर तुमचाच फायदा होईल.

मीन गेल्या दोन-तीन आठवडय़ांपूर्वी जी कामे रखडलेली होती त्या कामाला वेग मिळेल. तुम्हाला भरपूर काम करावेसे वाटेल. व्यापार-उद्योगात एखादी नवीन योजना कार्यान्वित केली असली तर त्याला गिऱ्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. बाजारपेठेत तुमची पत वाढेल. नोकरीमधल्या मीटिंगमध्ये सहकारी तुमची ढाल करतील. त्यांची एखादी मागणी पूर्ण होईल. बेकार व्यक्तींना तात्पुरते काम मिळेल. घरामध्ये एखादा महत्त्वाचा कार्यक्रम ठरेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2016 1:06 am

Web Title: astrology 67
Next Stories
1 दि. १६ ते २२ सप्टेंबर २०१६
2 दि. ९ ते १५ सप्टेंबर २०१६
3 दि. २ ते ८ सप्टेंबर २०१६
Just Now!
X