08 March 2021

News Flash

दि. १४ ते २० ऑक्टोबर २०१६

एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये आली की ती ताबडतोब पूर्ण करण्यावर तुमचा भर असतो.

01vijay1मेष एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये आली की ती ताबडतोब पूर्ण करण्यावर तुमचा भर असतो. त्यानुसार या आठवडय़ात तुमचा कामाचा वेग अचाट-अफाट राहील. व्यापार-उद्योगात धाडस करण्याचा मोह होईल. मात्र अंथरूण पाहून पाय पसरा. नोकरीमध्ये वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करून एखादी विशेष सवलत मिळवा. सहकाऱ्यांना त्याची असूया जाणवेल. घरामध्ये काटकसर करायचे ठरवाल, पण  एखादा महागडा बेत निश्चित  होईल.

वृषभ सहसा तुम्ही कोणावरही रागवत नाही, पण या आठवडय़ात तुमच्या संयमाची परीक्षा गाठून एखाद्या कारणाने हे तुमचे उग्ररूप घडण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात प्राप्ती वाढविण्यासाठी एखादा धोका पत्करण्याची तुमची तयारी असते. मात्र बेकायदेशीर काम करू नका आणि योग्य व्यक्तीशी संगत ठेवा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. घरामध्ये धावपळ असेल. पण सगळय़ांची मोट बांधणे कठीण होईल.

मिथुन कोणताही निर्णय घेताना तुम्ही नको इतका विचार करता. पण या आठवडय़ात तुमचा प्रकार ‘आधी कृती आणि नंतर विचार’ असा असणार आहे. आपण केलेली चूक तुम्ही मान्य करणार नाही. व्यवसाय-उद्योगात, बाजारपेठेत आपले वेगळेपण प्रस्थापित करण्याकरिता एखादी सनसनाटी जाहिरात किंवा घोषणा कराल.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अचानक कामाच्या स्वरूपातील तात्पुरता बदल किंवा वेगळय़ा टेबलावर बदली करतील. घरामध्ये सर्व काही ठीक असेल.

कर्क स्वभावत: तुम्ही शांत आहात. सहसा तुम्ही कोणावरही रागवत नाही. पण या आठवडय़ामध्ये एखाद्या व्यक्तीच्या वेडय़ावाकडय़ा वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे तुमच्या मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात तुमचा कामाचा झपाटा उत्तम असेल. प्रतिस्पर्धी मात्र तुमच्याविषयी गरसमज निर्माण करून तुम्हाला चिथवण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही शांत राहा. नोकरीमध्ये सहकारी तुमच्या चांगुलपणाचा गरफायदा उठवतील.

सिंह इतरांनी तुमचे कार्यक्रम बदलले की तुम्हाला राग येतो. पण या आठवडय़ात तुम्हीच काही बेत ठरवाल आणि थोडय़ा वेळाने ते रद्द कराल. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यामुळे किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व असते याची आठवण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी अतिउत्साह आवरा. संस्थेविषयी मत प्रदर्शन करणे टाळा. घरामध्ये आवडत्या व्यक्तीशी किरकोळ कारणांवरून खटके उडतील.

कन्या या आठवडय़ात व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनातील काही मोठे बदल तुम्हाला करायचे असतील. त्या संबंधित घोषणा तुम्ही कराल. सभोवतालच्या व्यक्तींना थोडेसे आश्चर्य वाटेल. व्यापार-उद्योगात विस्तार करण्यासाठी बाजारातील प्रतिष्ठित जागी स्थलांतर करावेसे वाटेल. नोकरीमध्ये कामाच्या पद्धतीत छोटे-मोठे बदल करून तुमचे अधिकार वाढवाल. पण हाताखालच्या व्यक्तींना राग येईल. घरामध्ये प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे घडावी, यासाठी सर्वाशी खुबीने वागाल.

तूळ सभोवतालचे वातावरण एवढे खास नसेल. पण तुम्ही मात्र एखाद्या कल्पनेने भारावून जाल आणि त्याचाच पाठपुरावा कराल. व्यापार-उद्योगात छोटय़ा कामातून फारशी कमाई होणार नाही. त्याऐवजी एखादा मोठा हात मारावा असे मनोमन वाटेल. नोकरीमध्ये तुमच्या कामात गुप्तता राखा. किरकोळ कारणावरून सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. घरामध्ये लांबच्या भावंडाविषयी अर्धवट बातमी कळेल.

वृश्चिक सर्व अडीअडचणी बाजूला ठेवून विरंगुळा मिळविण्याकरिता तुम्ही जीवनाचा थोडासा आस्वाद घ्यायचे ठरवाल. तुमचे मूड क्षणाक्षणाला बदलत राहतील. व्यापार-धंद्यात कोणत्याही गिऱ्हाईकांशी फटकून वागू नका. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी बोलताना शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात ठेवा. तुमचा कामाचा वेग उत्तम राहील. घरामध्ये लहान-मोठे बदल करून ते सजविण्याचे नियोजन कराल. छोटय़ाशा कार्यक्रमामुळे वातावरणात वेगळा बदल होईल.

धनू ग्रहमान तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढविणारे आहे. ज्या कामात तुम्हाला पूर्वी खूप गरसोय सहन करावी लागली होती, त्यामध्ये प्रगती करायचे ठरवाल. गरज पडली तर धाडसही कराल. व्यापार-उद्योगात पसे चांगले मिळतील. नोकरीमध्ये तुमची एखादी मागणी वरिष्ठांनी पूर्ण केली नसेल तर त्याची त्यांना आठवण करून द्या. घरामध्ये एखाद्या प्रश्नावरून तुमच्या रागाचा पारा वर जाईल. सगळ्यांनी आपले ऐकले पाहिजे असा तुमचा अट्टहास असेल.

मकर चांगले ग्रहमान आले की इच्छा-आकांक्षा वाढतात. क्वचितप्रसंगी धोका पत्करण्याचीसुद्धा तयारी असते. तशी आता तुमची स्थिती असेल. व्यापार-उद्योगात जितके जास्त काम तितकी जास्त कमाई असे समीकरण असल्यामुळे तुम्ही अविश्रांत मेहनत घ्याल. बाजारपेठेतील नावीन्यपूर्ण योजनेत सहभागी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी फटकून वागू नका. घरामधल्या व्यक्ती तुमच्या शब्दाला मान देतील. पण तुमचे तेवढय़ाने समाधान होणार नाही.

कुंभ ग्रहमान सुधारल्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळीच ईष्र्या दिसून येईल. तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता वेळप्रसंगी तुम्ही साहस करायला तयार व्हाल. व्यापार-उद्योगात जुनी वसुली करताना गिऱ्हाईकांशी हितसंबंध बिघडू देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या जवळ संस्थेविषयी मतप्रदर्शन करू नका. वरिष्ठांसमोर तुमच्या मागण्या ठेवा, पण त्याकरिता हट्ट करू नका. सांसारिक जीवनात खट्टा मिठा अनुभव येईल. प्रत्येक सदस्य स्वत:च्या पद्धतीने बेत ठरवतील.

मीन ग्रहमान परस्परविरोधी आहे. व्यक्तिगत जीवनात तुम्ही प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक कराल. पण करिअर आणि व्यवसायामध्ये अचानक काही घडामोडी घडतील. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात एखादा मोठा हात मारावा असा विचार तुमच्या मनात येईल. मात्र निर्णय घाईने घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर तुमची नेमणूक होईल. तुम्हाला हा एक धक्का असेल. त्याला इतरांकडून विरोध होईल. पण तुम्ही जुमानणार नाही.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 1:01 am

Web Title: astrology 70
Next Stories
1 दि. ७ ते १३ ऑक्टोबर २०१६
2 दि. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०१६
3 दि. २३ ते २९ सप्टेंबर २०१६
Just Now!
X