01vijay1मेष गेल्या एक-दोन आठवडय़ात जी कामे थांबविली होती त्या कामाला वेग देण्यासाठी आता तुम्ही सक्रिय बनाल.  व्यवसाय-उद्योगात सरकारी किंवा कोर्ट कामे रेंगाळली असतील तर त्यामध्ये स्वत: लक्ष घालून आवश्यक त्या हालचाली कराल. पशाची आवक साधारण राहील. नोकरीमध्ये कामाचा व्याप वाढत जाईल. एखादे वेगळे काम तुमच्यावर सोपवले जाण्याची शक्यता आहे. घरामध्ये तातडीचे काम तुमचे लक्ष वेधेल. त्यामुळे पूर्वी ठरलेले बेत बदलतील.

वृषभ ठरविलेले उद्दिष्ट पार पाडण्यासाठी तुम्ही नेहमी काटेकोर असता. व्यापार-उद्योगात पशाची थोडी तंगी असेल. ज्यांना पसे द्यायचे कबूल केले त्यांच्याकडून थोडी जादा मुदत मागून घ्याल. नोकरीमध्ये तुम्ही केलेला आळस वरिष्ठांच्या लक्षात आल्याने जादा काम करावे लागेल. सहकारी तुमच्या चांगुलपणाचा फायदा उठवतील. घरामध्ये एखादा कार्यक्रम ठरल्यामुळे तुम्हाला आलेला कंटाळा दूर होईल. नातेवाईक आणि मित्रमंडळींना एकत्र आणण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन अंगमेहनतीची कामे करण्याचा तुम्हाला आळस असतो. तो या आठवडय़ात विशेषरूपाने जाणवेल. व्यापार-उद्योगात हाताखालच्या व्यक्तींनी केलेले काम नीट तपासून पाहा. त्यामध्ये काही त्रुटी आढळतील आणि त्या दुरुस्त कराव्या लागतील. नोकरीमध्ये इतरांनी केलेले काम तुम्हाला पसंत पडणार नाही. त्याचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला स्वत: काम करावे लागेल. घरामधल्या एखाद्या समारंभाच्या निमित्ताने तुमची हौसमौज तुम्ही पुरवून घ्याल.

कर्क मनामधील नवीन कल्पनांना कृतीत उतरविण्यासाठी जिवापाड मेहनत कराल. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात आपण इतरांपेक्षा वेगळे कसे आहोत हे दाखविण्याकरिता तुम्हाला धाडस करावेसे वाटेल. भागीदारी किंवा मत्रीकराराचे प्रस्ताव पुढे येतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यामधल्या दूरदर्शी स्वभाव तुमच्या संस्थेला आणि सहकार्याना उपयोगी पडेल. नवीन नोकरीकरिता किंवा बदलीकरिता प्रयत्न करा. घरामध्ये सर्व जणांनी आपल्या इच्छा जाणून घ्याव्यात असे तुम्हाला वाटेल.

सिंह ग्रहमान तुमच्या मनाची द्विधा मन:स्थिती निर्माण करणार आहे. सहजगत्या जमतील तेवढीच कामे करून थोडासा आराम करण्याचा तुमचा इरादा असेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात महत्त्वाचे काम नसल्याने ज्या कामाला शांतता आणि मानसिक स्थिरता लागते त्या कामाला प्राधान्य द्या. अर्थप्राप्ती मनाप्रमाणे असेल. नोकरीमध्ये अवघड आणि किचकट कामे टाळण्याचा प्रयत्न कराल. घरामध्ये किरकोळ  मुद्दय़ावरून हास्यविनोदात वेळ घालवयाची संधी मिळेल.

कन्या सहसा तुम्ही तुमचे विचार आणि भविष्यातील बेत कोणाकडेही व्यक्त करत नाही. व्यापारीवर्गाला आíथकदृष्टय़ा आठवडा चांगला आहे. कारखानदारांना नवीन बाजारपेठ शोधण्यासाठी एखादी परदेशवारी कराविशी वाटेल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामात तुमचा फायदा आहे, अशा कामाला प्राधान्य द्याल. तातडीच्या कामाकरिता छोटा प्रवास घडेल. घरामध्ये एखादा खास कार्यक्रम आयोजित केला जाईल. त्यानिमित्ताने आपुलकीच्या व्यक्तींशी गाठीभेटी आणि गप्पागोष्टी होतील.

तूळ या आठवडय़ात तुम्हाला तुमचे करियर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर सतर्क राहणे भाग पडेल. व्यापार-उद्योगात नवीन कल्पना तुमच्या डोक्यात घुसतील. जादा भांडवलाची गरज बँक किंवा इतर मार्गानी पूर्ण होऊ शकेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचा आत्मविश्वास उत्तम राहील. घरामध्ये सगळ्यांची गरज भागवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. मात्र या कारणाने तुमची शारीरिक दगदग वाढली तर चिडचिड होईल.

वृश्चिक तुमचा आत्मविश्वास वाढविणारे हे ग्रहमान आहे. गेल्या आठ-दहा महिन्यांत काही कारणाने जी कामे लांबली होती ती आता हातात घ्यायचे ठरवाल. व्यापार-उद्योगात जे काम चालू आहे त्यातून फारशी कमाई नसल्यामुळे एखादा नवीन प्रोजेक्ट हाती घ्यावासा वाटेल. त्यासाठी आवश्यक ते भांडवल विविध मार्गानी गोळा कराल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एखादी अवघड जबाबदारी तुमच्यावर सोपवतील.  घरामध्ये पूर्वी लांबलेला एखादा सोहळा निश्चित होईल.

धनू कोणतेही काम करताना त्याचे जास्त नियोजन न करता बेधडक कृती करण्यावर तुमचा भरवसा असतो. व्यापार-उद्योगात महत्त्वाची कामे इतरांवर न सोपवता स्वत:च पूर्ण करा. एखादी लाभदायक संधीवर तुम्ही तुटून पडाल. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाच्या निर्णयात वरिष्ठ तुम्हाला सहभागी करून घेतील. पण याच कारणामुळे तुमचे कष्ट वाढण्याची शक्यता आहे. घरामधल्या व्यक्ती एखादे काम तुमच्यावर सोपवतील, परंतु त्यामध्ये तुम्ही टाळाटाळ कराल.

मकर ग्रहमान तुमच्या दृष्टीने लाभदायक आहे. हातातले पसे जरी खर्च झाले तरी पशाचा ओघ चालू राहिल्याने तुम्हाला चिंता नसेल. व्यापार-उद्योगात कामाच्या निमित्ताने नवीन व्यक्ती-बरोबर छोटा व्यवसाय करण्याचा विचार तुमच्या मनात येईल. बेकार व्यक्तींनी मिळणाऱ्या संधीचा ताबडतोब फायदा उठवावा. घरामध्ये प्रत्येक कार्यक्रमात तुमचा पुढाकार असल्याने सर्वाना बरे वाटेल. समारंभाच्या निमित्ताने वेगळ्या व्यक्तींना भेटण्याचा योग येईल.

कुंभ प्रत्येक व्यक्तीची एखादी सुप्त इच्छा दडून राहिलेली असते. ती पूर्ण झाल्यावर जो आनंद मिळतो तसा आनंद या आठवडय़ात तुम्हाला मिळेल. व्यापारीवर्गाला बाजारात मिळणारी प्रतिष्ठा महत्त्वाची वाटेल. समाजोपयोगी काम केल्यामुळे समाधान लाभेल. नोकरीमध्ये काही जणांना खास कामगिरीनिमित्त विशेष सवलत बहाल केली जाईल. घरामध्ये सगळ्यांनी तुम्हाला मोठेपणा दिल्यामुळे तुमचा अहम् सुखावला जाईल. सामूहिक कामात तुम्हाला लक्ष घालावेसे वाटेल.

मीन ग्रह तुमच्यावर प्रसन्न असल्यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण व्हायला चांगल्या संधी निर्माण होतील. व्यापार-उद्योगात पूर्वी ज्यांनी तुम्हाला नकारघंटा ऐकवली होती, त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी संस्थेची काही महत्त्वाची कामे अडून राहिली असतील तर ती पूर्ण करण्याकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. घरामध्ये एखादी इच्छा बरेच दिवस रेंगाळत पडली असेल तर ती पूर्ण करण्याचा तुमचा इरादा असेल. कुटुंबातील सदस्य लांबच्या प्रवासाची टूम काढतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com