01vijay1मेष काही नाती अशी असतात जी जुळतातही अचानक आणि तुटतातही अचानक. त्याचे कारण आपल्याला समजत नाही. असा अनुभव देणारा आठवडा आहे. व्यापार-उद्योगात आपले ग्रहमान बदलले की समोरच्या व्यक्तींची समीकरणे बदलतात. ही गोष्ट विशेष रूपाने प्रत्ययाला येईल. आíथक कारणावरून कोणाशीही संबंध बिघडू देवू नका. नोकरीच्या ठिकाणी सहकारी मौजमजेच्या वेळी पुढे येतील; पण कामाच्या वेळी आपले कोणीच नाही याची खात्री पटेल.

वृषभ बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या असतील. पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करावी यासंबंधी तुमच्या मनात गोंधळ असेल. योग्य व्यक्तीचे पाठबळ न मिळाल्यामुळे ‘एकला चलो रे’ असे धोरण ठेवणे तुम्हाला भाग पडेल. व्यापारउद्योगात कामाचे प्रमाण यथातथाच राहील. घरामध्ये सर्व काही ठीक वाटेल. पण आपुलकीच्या व्यक्तींच्या वागण्यामुळे तुम्ही मधूनच चिंतेत पडाल. घरात येणाऱ्या पाहुण्यांचे आतिथ्य करावे लागेल.

मिथुन तेच तेच काम करण्याचा तुम्हाला मनस्वी कंटाळा येतो. पण या आठवडय़ात तुमचे वेळापत्रक सतत बदलत राहिल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. व्यापार-उद्योगात बराच काळ एखादे काम चालू असेल तर ते संपुष्टात येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी इतरांनी केलेल्या चुका तुम्हाला निस्तराव्या लागतील. त्यामध्ये काही तरी मार्ग काढून तुम्ही सर्वाचे समाधान कराल. घरामध्ये जुन्या मित्रमंडळींबरोबर किंवा लांबच्या नातेवाईकांबरोबर काही कार्यक्रम ठरवाल.

कर्क ‘कळतं पण वळत नाही’ अशी तुमची स्थिती होईल. एखाद्या व्यक्तीवर जास्त अवलंबून राहायचे नाही असे तुम्ही ठरवाल आणि तरीही शेवटच्या क्षणी तेच करावे लागेल. व्यापार-उद्योगात सगळी कामे स्वत: हाताळण्याचा हट्ट धरू नका. नोकरीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे त्या व्यक्तीशी दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. घरामध्ये तेच तेच काम पुन्हा करायला लागल्याने तुमची थोडीशी चिडचिड होईल.

सिंह कामही पाहिजे आणि आरामही पाहिजे अशा मन:स्थितीत तुम्ही असल्याने कोणताच बेत तुम्हाला शांतपणे ठरविता येणार नाही किंवा पार पाडता येणार नाही. शेवटी तुम्ही फुटकळ कामात वेळ घालवाल. व्यापारउद्योगात कोणतेही नवीन प्रयोग न करता नेहमीच्या पद्धतीने काम करा. अपेक्षित व्यक्तींची साथ न मिळाल्याने तुम्हाला स्वयंभू बनावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी मौजमजेच्या वेळेला सर्वजण पुढे येतील. पण कामाच्या वेळी उपयोगी पडणार नाहीत.

कन्या सहसा माणसांविषयी किंवा घटनांविषयी तुमचे अंदाज, अडाखे चुकत नाही. पण या आठवडय़ात त्याविषयी थोडीशी जास्त काळजी घ्या. व्यापार-उद्योगातील प्रगती चांगली असेल. पशाचा ओघ समाधानकारक असेल. नवीन कामे स्वीकारताना जास्त विचार कराल. नोकरीच्या ठिकाणी बरीच कामे तुमच्या पुढे असतील; पण वरिष्ठ जोवर आग्रह धरत नाही तोपर्यंत त्या कामात तुम्ही लक्ष घालणार नाही. घरामध्ये लांबच्या प्रवासाचे बेत ठरण्याची शक्यता आहे.

तूळ एकाच वेळी अनेक कल्पना मनात असल्यामुळे कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे याविषयी मनात गोंधळ उडेल. कोणत्याही परिस्थितीत हाताचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. व्यापारउद्योगात पूर्वी हातात घेतलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या सभोवतालचे वर्तुळ बदलण्याची शक्यता आहे. नवीन व्यक्तींची सावधतेने निवड करा. नोकरीमध्ये एखाद्या वेगळ्या टेबलावर किंवा वेगळ्या स्थळी बदली होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक  जशी सभोवतालची परिस्थिती असते त्यानुसार तुम्ही तुमचा पवित्रा ठरवून काम करता. या आठवडय़ात ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात त्यांचीच काहीतरी अडचण निघाल्याने तुम्हाला ठरलेले बेत बदलावे लागतील. नोकरीमध्ये एखादे जुने प्रोजेक्ट संपल्यामुळे तुमच्या सभोवतालचे वर्तुळ बदलण्याची शक्यता आहे. सुरुवातीला  त्याचा कंटाळा येईल, पण नंतर लवकरच रुळाल. घरामध्ये तुमच्या दैनंदिनीत नेहमीची माणसे जवळ नसल्याने बदल होईल.

धनू तुमच्या स्वभावातील पारंपरिकता आणि आधुनिकता समोरच्या व्यक्तींना एकाच वेळी दिसून येईल. कामाच्या वेळेला तुम्ही नवीन मार्गाचा अवलंब कराल.  नोकरीच्या ठिकाणी एखाद्या जुन्या सहकार्याची अनुपस्थिती तुम्हाला जाणवेल. कामापेक्षा संस्थेत चालणाऱ्या राजकारणाकडे तुमचे जास्त लक्ष असेल. घरामध्ये सर्वजण तुमच्याकडून काहीतरी उकळण्याचा प्रयत्न करतील, तुम्ही कोणालाही दाद लागू देणार नाही.

मकर ज्या वेळेला तुम्ही शांत बसलेले दिसता, त्यावेळी तुमच्या मनात एकच विचार चालू असतो, तो म्हणजे पसे कसे मिळतील. या आठवडय़ात एखादी नवीन कल्पना तुम्हाला आकर्षति करेल. व्यापार-उद्योगात एखाद्या नवीन कामासंबंधी तुम्हाला कुणकुण लागेल. पूर्वीचे काम संपण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीचे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. हे काम तुम्हाला एकटय़ाने करावे लागेल. घरामध्ये मुलांच्या हट्टाला तुम्ही बळी पडाल.

कुंभ विशिष्ट कारणामुळे किंवा कामाच्या निमित्ताने आपल्याला एखाद्या व्यक्तीची खूप सवय होऊन जाते. व्यापार-उद्योगात एखादे काम बंद करून त्या जागी जास्त फायदा देणारे काम सुरू करावेसे वाटेल. तसे करण्यापूर्वी नवीन कामाची कागदावर नीट आखणी करून बघा. नोकरीच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्टकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये कोणीही विरोध केलेला तुम्हाला चालणार नाही. त्यावरून थोडेसे रुसवेफुगवे होतील. मनोरंजनाच्या कामात भाग घ्याल.

मीन नित्यक्रमाचा कंटाळा आल्यामुळे त्यातून स्वतची सुटका करून घेण्याचा तुमचा मूड असेल. जुने काम संपून नवीन कामाचा प्रारंभ होईल. पशाची आवक सुधारेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची तयारी असेल तर जादा काम करून पसे मिळविता येतील. घरामध्ये मनाप्रमाणे एखादा कार्यक्रम असल्याने तुमचा वेळ कसा गेला हे समजणार नाही. नवीन व्यक्तींशी ओळख झाल्यामुळे तुमच्या मनात वेगवेगळ्या कल्पना तरळायला सुरुवात होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com