01vijay1मेष प्रत्येक व्यक्तीचे मन जागृत असते आणि ते नेहमी धोक्याची सूचना देत असते. तशी सूचना तुम्हाला एखाद्या बाबतीत पूर्वी मिळाली असेल आणि तुम्ही सतर्क असाल तर त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. व्यापार-उद्योगात अपेक्षित गिऱ्हाईकांकडून अचानक ‘घूमजाव’ बघायला मिळेल.  नोकरीमध्ये वरिष्ठांचे निर्णय अमलात आणणे भाग पडेल. तुमच्या कामात चुका करू नका. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा कारणावरून मानापमानाचे प्रसंग येतील.

वृषभ आठवडय़ाची सुरुवात थोडीशी नाराजीने होईल. तुमच्या अवतीभोवती असणारी माणसे, सहकारी, शेजारी वगरे व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यामुळे तुम्ही कोडय़ात पडाल. पण ही परिस्थिती लवकरच निवळेल. व्यापार-उद्योगात एखादा नवीन उपक्रम तुमचे लक्ष आकर्षति करेल. नोकरीमध्ये एखादे अवघड काम मार्गी लावू शकाल. पण त्यामध्ये प्रचंड दमणूक होईल. घरामध्ये समारंभाच्या निमित्ताने आपुलकीच्या व्यक्तींशी गाठभेट होईल.

मिथुन ज्या प्रश्नांकडे पूर्वी कळत-नकळत दुर्लक्ष झाले होते, त्याची या आठवडय़ात आठवण येईल. सप्ताहाची सुरुवात थोडीशी खडतर असेल. व्यापार-उद्योगात कायद्याचे काटेकारेपणे पालन करा. तुमचे स्पर्धक तुमच्याविरुद्ध अफवा पसरवून गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करतील. नोकरीमध्ये केलेले चांगले काम विसरून वरिष्ठ झालेल्या चुकांवर बोट ठेवतील. घरामध्ये नातेवाईक आणि बुजुर्गाचे मानापमान सांभाळावे लागतील.

कर्क मानलं तर समाधान अशी तुमची स्थिती आहे. ज्या व्यक्तींकडून मदतीची अपेक्षा होती त्यांनी ती न केल्यामुळे अखेर तुम्हाला स्वयंभू बनावे लागेल. व्यापार-उद्योगात प्रयत्नांवर विश्वास ठेवा. शेअर्स किंवा तशाच प्रकारच्या काम करणाऱ्या व्यक्तींनी जास्त धोका पत्करू नये. नोकरीमध्ये सहकाऱ्यांवर महत्त्वाची कामे सोपवली तर तुमची फजिती होईल. नवीन नोकरीचे काम थोडेसे लांबणीवर पडेल. घरामध्ये मुलांच्या करियरसंबंधी थोडी चिंता वाटेल.

सिंह तोंड झाकलं तर पाय उघडे पडतात, पाय झाकले तर तोंड उघडं पडते या म्हणीची तुम्हाला आठवण येणार आहे. ज्या घरगुती गोष्टींकडे कळत-नकळत तुमच्या हातून दुर्लक्ष झाले होते त्याकडे आता तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. व्यापारउद्योगाच्या क्षेत्रात काही तांत्रिक कारणांमुळे प्रत्येक कामात विलंब संभवतो. सरकारी आणि कोर्टव्यवहार काळजीपूर्वक हाताळा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा मूड बदलत राहील. घरामध्ये एखादे जुने प्रकरण अचानक डोके वर काढेल.

कन्या ‘कळतं पण वळत नाही’ अशी तुमची स्थिती असेल. कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल तर त्यामध्ये स्वयंभू बनणे चांगले. प्रवास करताना महत्त्वाची कागदपत्रे नीट सांभाळा. नोकरीच्या ठिकाणी योग्य व्यक्तींची योग्य कामाकरिता निवड करा. महत्त्वाच्या कामात दुर्लक्ष होऊ देऊ नका. नवीन नोकरी स्वीकारताना त्यातील अटींचा अभ्यास करा. घरामध्ये लांबच्या भांवडांविषयी किरकोळ कारणाने गरसमज होण्याची शक्यता आहे.

तूळ पशाच्या बाबतीत तुमची रास गलथान आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला केलेल्या चांगल्या कामाचा उपयोग होत नाही. या आठवडय़ात ‘सबसे बडा रुपय्या’ हे लक्षात ठेवून इतरांशी सडेतोड वागा. व्यापार-उद्योगात जागेसंबंधी कोणतेही करार करताना त्यातील अटींचा नीट अभ्यास करा. नोकरीमध्ये वरिष्ठांपुढे बढाया मारण्यापूर्वी नीट विचार करा.  इस्टेट आणि कोर्ट व्यवहारातून वादविवाद संभवतात.

वृश्चिक ज्या प्रश्नाविषयी तुमच्या मनामध्ये थोडीफार जाणीव होती अशा प्रश्नात आता तुम्हाला तातडीने लक्ष घालणे आवश्यक होईल. व्यापार-उद्योगात नवीन व्यक्तींशी कोणतेही व्यवहार करताना त्याची विश्वासार्हता पडताळून पाहा. आíथक व्यवहार जपून हाताळा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या शब्दाचे उल्लंघन करू नये. नेहमीचे काम बिनचूक करा. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या प्रकृतीकडे आणि मनस्वास्थाकडे लक्ष द्यावे लागेल. स्वत:ची काळजी घ्या.

धनू जे आपल्याजवळ आहे त्याचा फायदा कसा उठवायचा याचा विचार करा. असे केल्याने तुमची कार्यक्षमता टिकून राहील. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात सबसे बडा रुपय्या याची तुम्हाला आठवण येईल. नोकरीमध्ये तुमचा कामाचा उत्साह दांडगा असेल. त्याचा फायदा घेऊन वरिष्ठ एखादी जास्तीची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन करू नका. घरामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीमुळे किंवा वागण्या-बोलण्यामुळे तुम्हाला त्रास संभवतो.

मकर माणूस म्हटला की इच्छा-आकांशा, सुख-दुख:ही आले. या सगळ्यांचा प्रत्यय देणारा हा आठवडा आहे. एखाद्या कामात अडथळा आल्यामुळे व्यापार-उद्योगात तुम्ही थोडेसे निराश व्हाल. पण दुसऱ्या कारणामुळे तुमची निराशा दूर पळून जाईल. सरकारी नियम आणि कायदे यांच्याकडे लक्ष द्या. नोकरीमध्ये अनेक कामे तुम्ही एकाच वेळी हाताळाल. त्या नादात वरिष्ठांची एखादी सूचना तुम्ही विसरून जाल. घरामध्ये मुलांच्या प्रगतीविषयी तुम्ही थोडेसे साशंक बनाल.

कुंभ ‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’ असा दृष्टिकोन तुम्हाला महागात पडेल. सभोवतालच्या व्यक्तींशी मिळतेजुळते घेण्याचे धोरण ठेवा. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात सरकारी नियम आणि कायदे यांना तोंड देत तुम्हाला काम करावे लागेल. गिऱ्हाईकांबरोबर चर्चा करताना तुमची प्रतिष्ठा पणाला लावू नका. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुम्हाला आवडत नाही ते काम तुम्हाला करावे लागेल.  नवीन नोकरीच्या कामात थोडासा विलंब होईल.

मीन प्रत्येक माणसाच्या भावनांना तुम्ही महत्त्व देता. त्यांच्याकडूनही तसाच प्रतिसाद मिळावा असे तुम्हाला वाटते. पण या आठवडय़ात या बाबतीत थोडीशी निराशा होण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात जी कामे इतरांवर सोपवली होती. त्यामध्ये गोंधळ झाल्यामुळे ते काम पूर्ण करावे लागेल. नोकरीमध्ये इतरांनी केलेली दिरंगाई तुम्हाला चालणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे काम वाढवून घ्याल. घरामध्ये दोन पिढय़ांतील विचारांची तफावत जाणवेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com