मेष ग्रहमान तुमच्या धाडसी स्वभावाला खतपाणी घालणारे आहे. व्यापार-उद्योगात कामकाज वाढण्याचे संकेत मिळतील. जोडधंद्यातून चांगली कमाई होईल. नोकरीच्या ठिकाणी आवडीचे काम मिळाल्यामुळे तुमची तक्रार नसेल. एखाद्या नवीन व्यक्तीशी कामाच्या निमित्ताने मत्री होईल. घरामध्ये आवडत्या व्यक्तीची एखाद्या समारंभाच्या निमित्ताने हजेरी लागेल. त्या व्यक्तीबरोबर खास कार्यक्रम ठरेल. त्यामुळे बरे वाटेल.

वृषभ ग्रहमान तुम्हाला एकदम हलक्या-फुलक्या मूडमध्ये ठेवणारे आहे. कोणाला काय वाटते याचा विचार न करता तुम्ही तुमच्याच पद्धतीने वागण्या-बोलण्याचे ठरवाल. व्यवसाय-उद्योगात हाताखालच्या व्यक्तींवर विश्वास ठेवून त्यांच्यावर काही कामे सोपवा. पशाच्या कामाला स्वत: प्राधान्य द्या. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामाचा तुम्हाला मनस्वी कंटाळा आला असेल तर ते काम तुम्ही टाळण्याचा प्रयत्न कराल. घरामध्ये काही प्रश्नांत तुम्ही जातीने लक्ष घालाल. त्यामुळे अवघड प्रश्नामध्ये मार्ग निघेल.

मिथुन त्याच त्याच कामाचा तुम्हाला कंटाळा येतो; पण थोडासा बदल असेल तर तुम्ही कोणतेही काम उत्साहाने करता. आठवडय़ाची सुरुवात थोडीशी कंटाळवाणी होईल, पण नंतर ज्या घटना घडतील त्यामुळे तुम्हाला थोडीही विश्रांती मिळणार नाही. आíथक प्रगती थोडीशी वाढल्यामुळे तुम्ही खूश असणार आहात. नोकरीच्या कामानिमित्त छोटा प्रवास घडण्याची शक्यता आहे. त्या दरम्यान नवीन व्यक्तींशी ओळख होईल. घरामध्ये तुमच्या सौंदर्याच्या दृष्टिकोनाला भरपूर वाव मिळेल.

कर्क ग्रहमान तुमच्या मनासारखे आहे. या आठवडय़ात कामाच्या वेळी काम आणि इतर वेळेला मौजमजा करण्याचा तुमचा इरादा असेल.  व्यवसाय-उद्योगात भरपूर काम झाल्यामुळे पशाची तुम्हाला चिंता नसेल. बाजारातील प्रतिष्ठित ठिकाणी नवीन ऑफिस किंवा दुकान घेण्याचा तुमचा इरादा असेल. नोकरीच्या ठिकाणी काम करण्याचे स्वातंत्र्य वरिष्ठांनी दिल्यामुळे तुमची कोणतीही तक्रार नसेल. घरामध्ये एखादे शुभकार्य ठरण्याची शक्यता आहे.

सिंह ग्रहमान उत्साहवर्धक आहे. जे चांगले काम तुम्हाला पुढे करायचे आहे त्याची पूर्वतयारी करून ठेवा. त्यासाठी सर्व व्यक्तींचे सहकार्य तुम्हाला मिळवावे लागेल. व्यापार-उद्योगात उलाढाल वाढविण्याची, भरपूर काम करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी स्पर्धा असेल तर त्या स्पध्रेमध्ये भाग घेऊन तुम्ही बक्षीस मिळवाल. घरामध्ये प्रत्येक समारंभामध्ये आपला पुढाकार असावा असे तुम्हाला वाटत राहील

कन्या मौजमजा आणि कर्तव्य यापकी तुम्ही कर्तव्याला अधिक महत्त्व देता, पण या आठवडय़ात कामाच्या वेळी काम आणि इतर वेळी मजा करायची असे तुम्ही ठरवाल. व्यापार-उद्योगात एखादी महत्त्वाची मीटिंग असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमचे वर्चस्व सिद्ध कराल. पशाची आवक वाढेल. नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य मिळेल. जादा सवलती मिळाल्याने तुम्ही खूश असाल. घरामध्ये मनोरंजनाचा एखादा कार्यक्रम ठरेल. एखाद्या निमित्ताने लांबच्या व्यक्तींना भेटण्याचा योग  मिळेल.

तूळ प्रत्येक व्यक्ती स्वार्थी असते. तुम्हीही त्याला अपवाद नाही. या आठवडय़ात जे तुम्हाला पाहिजे आहे ते मिळविण्यासाठी तुम्ही जिभेवर साखर पेराल. व्यापार-उद्योगात भरपूर पसे मिळूनही तुम्ही जास्त मिळविण्याकरिता जिवाचे रान कराल. जोडधंदा असणाऱ्यांनी स्वत:च्या कुवतीनुसार काम स्वीकारावे. नोकरदार व्यक्ती ज्या कामातून फायदा आहे अशाच कामाला प्राधान्य देतील. घरामध्ये तुम्हाला कोणीही नकार दिलेला चालणार नाही.

वृश्चिक ग्रहमान चांगले असल्यामुळे कोणतेही धाडस करण्याची तयारी असेल. ज्या व्यक्तींकडून काम करून घ्यायचे आहे त्यांना खूश ठेवून एखादे आमिष दाखवाल. बाजारपेठेमध्ये तुमचे महत्त्व वाढेल. जोडधंद्यामध्ये नवीन संधी प्राप्त होईल. नोकरीमध्ये तुमच्या आवडीचे काम करण्याची संधी तुम्हाला वरिष्ठ स्वत: देतील. खूप दिवस ज्या गोष्टीकरिता तुम्ही प्रयत्न करीत होता ती गोष्ट घडून येईल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी एखादा छानसा कार्यक्रम आखून ठेवाल.

धनू माणसाचे जीवन म्हणजे न सुटणारे कोडे आहे. एके काळी एखादी गोष्ट मिळविण्याकरिता तुम्हाला नशिबाची साथ मिळाली नाही. या आठवडय़ामध्ये तुम्ही फारसे प्रयत्न न करता काही गोष्टी तुमच्याकडे आपोआप चालून येतील. व्यापार-उद्योगात भागीदारी किंवा मत्री कराराचे प्रस्ताव पुढे येतील. कागदावर आकडेमोड करून मगच निर्णय घ्या. नोकरीच्या ठिकाणी सवलत मिळेल. घरामध्ये आतुरतेने वाट पाहत असलेला एखादा कार्यक्रम ठरेल.

मकर पशावर खूप प्रेम करणारी तुमची रास आहे. हातातून पसे सोडताना तुम्हाला खूप वाईट वाटते; पण या आठवडय़ामध्ये चांगल्या कारणाकरिता तुम्हाला पसे खर्च करावे लागतील. व्यापार-उद्योगात एखादे काम पूर्ण करण्याकरिता मध्यस्थाची मदत घ्यावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी नेहमीची कामे करावी लागतील. त्याव्यतिरिक्त वरिष्ठ एखादे अवघड कामही सोपवतील. घरामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या विचारामध्ये मग्न असेल. कोणाचाच कोणाला ताळमेळ बसणार नाही. प्रकृतीकडे लक्ष ठेवा.

कुंभ ग्रहमान संमिश्र आहे. तुमच्या कामाचा ताणतणाव वाढेल. त्यातून सुटका होण्यासाठी मन बंड करून उठेल. मधूनच तुम्हाला असे वाटेल की, सर्व काही झुगारून देऊन जीवनाचा आनंद लुटावा. व्यापार-उद्योगात कामाचा व्याप वाढत राहील. जनसंपर्क आणि प्रसिद्धी यांना महत्त्व द्यावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी एखादे काम संपविण्याकरिता वरिष्ठांचा तगादा राहील. तुम्ही मात्र तुमच्या पद्धतीनेच काम कराल. घरामध्ये जोडीदाराचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल.

मीन ग्रहमान तुमची परीक्षा पाहणारे आहे. एखादी गोष्ट तुम्हाला तीव्रतेने पाहिजे असेल, पण ती सहजगत्या मिळणार नाही. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ याची आठवण ठेवून निश्चयाने पुढे जा. व्यापार-उद्योगात बाजारातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. जादा भांडवल उभे करावे लागेल. नोकरीमध्ये एखादे साधे आणि सरळ असणारे काम गुंतागुंतीचे वाटेल. घरामध्ये जी गोष्ट तुम्हाला मनापासून आवडते ती करायची तुम्ही ठरवाल. इतरांचा त्याला विरोध होईल.
विजय केळकर
response.lokprabha@expressindia.com