12 July 2020

News Flash

राशिभविष्य : दि. ७ ते १३ जून २०१९

मंगळ-चंद्राच्या लाभयोगामुळे आपल्या साहसी वृत्तीला खतपाणी मिळेल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष मंगळ-चंद्राच्या लाभयोगामुळे आपल्या साहसी वृत्तीला खतपाणी मिळेल. उत्साह वाढेल. हाती घेतलेल्या कामाला गती येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्या कामाच्या पद्धतीबद्दल समाधान व्यक्त करतील. सहकारीवर्गाला मदत कराल. जोडीदाराच्या साहाय्याने आíथक स्थिती उंचावेल. एकमेकांचे सूर जुळतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांना अडचणीच्या काळात मार्गदर्शन कराल. डोळ्यांचे आरोग्य सांभाळा.

वृषभ वृषभ राशीतील रवीचा गुरूसह समसप्तम योग होत आहे. यामुळे आपल्या आनंदी वृत्तीत भर पडून परोपकार कराल. तसेच आपल्या ऐन अडचणीच्या वेळी अनपेक्षित मदत मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना वरिष्ठांपुढे मांडाल. वरिष्ठांनी त्यावर लगेच विचार केला नाही तरी भविष्यात लाभदायक ठरतील. सहकारी वर्ग आपल्या मताला दुजोरा देईल. जोडीदाराशी झालेले तात्त्विक वाद प्रेमाने मिटवाल. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा.

मिथुन बुध-हर्षलचा लाभयोग आपल्या चौकस व शतावधानी वृत्तीला पूरक ठरेल. बुधाच्या बुद्धीला हर्षलाचे प्रोत्साहन मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. कार्यक्षेत्रात सहकारीवर्ग तत्परतेने मदत करेल. मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांना मदत करण्यासाठी धावपळ करावी लागेल. जोडीदाराकडून फारशा अपेक्षा ठेवू नका. कौटुंबिक वातावरणातील तणाव आपल्या विनोदबुद्धीने कमी कराल. पचन व उत्सर्जन संस्था सांभाळाव्यात.

कर्क रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे वृत्ती आनंदी व उत्साही राहील. कामातील अडथळ्यांवर मात करून कार्यपूर्तीचे समाधान मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ कामाचा दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. सहकारीवर्ग मागाल ती मदत करेल. जोडीदाराला त्याच्या समस्या सोडवण्यात मोलाची मदत कराल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आनंद वार्ता समजतील. फोड, पुटकुळ्या, गळू यांपासून त्रास संभवतो. यात पू होणार नाही याची दक्षता घ्या.

सिंह रवी-गुरूच्या समसप्तम योगामुळे कामाला गती येईल. नव्या योजना अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळाल्याने कार्यक्षेत्रात प्रगती कराल. सहकारी वर्गातील काहीजण आपल्या कामात अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील. परंतु आपण आपल्या मार्गानेच पुढे जावे. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या मदतीला धावून जाल. जोडीदाराच्या नव्या कल्पनांना पुष्टी द्याल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्य चांगले राहील.

कन्या भाग्यस्थानातील रवीचा नेपच्यूनशी केंद्रयोग होत आहे. यामुळे भावनेच्या भरात एखादा निर्णय घ्याल. मनाचे चांचल्य वाढेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्यावर नव्या जबाबदाऱ्या सोपवतील. नेटाने व एकाग्रतेने त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सहकरी वर्गाकडून पुरेशी मदत मिळेल. जोडीदारासह केलेला विचारविनिमय लाभदायक ठरेल. आरोग्य बरे राहील.

तूळ चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे सतत प्रयत्नशील राहाल. रेंगाळलेल्या कामांना गती द्याल. केलेल्या कष्टाचे मनाप्रमाणे फळ मिळाले नाही तरी आशा सोडू नका. देर है पर अंधेर नहीं है। नोकरी-व्यवसायात अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या मंडळींकडून लाभ होतील. सहकारीवर्ग तोंडदेखले आश्वासन देईल. जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रातील समस्यांनी त्रस्त असेल. आपले धीराचे दोन शब्द त्याला आधार देतील. तोंड, घसा यांचे आरोग्य सांभाळावे लागेल.

वृश्चिक भाग्येश चंद्र व कम्रेश रवीच्या लाभयोगामुळे केलेल्या कष्टाचे चीज होईल. नावलौकिक मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. नव्या ओळखी लाभदायी ठरतील. सहकारी वर्गाला आपल्या मदतीची गरज भासेल. मोठय़ा मनाने त्यांना साहाय्य कराल. अपेक्षेपेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. कुटुंब सदस्यांना आवडेल अशा गोष्टींसाठी वेळ राखून ठेवाल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष नको.

धनू धनू राशीतील शनीचा रवीशी षडाष्टक योग होत असल्याने हाती घेतलेल्या कार्यात अडचण येईल. परंतु प्रयत्न सोडू नका. आपल्या गुणांची जरी इतरांकडून कदर झाली नाही तरी धीराने घ्यावे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्यावर नव्या जबाबदाऱ्या सोपवतील. ताण न घेता वेळेचे योग्य नियोजन कराल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदारासह तात्त्विक वाद होतील. तुटेपर्यंत ताणू नका. आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवतील.

मकर बुध-हर्षलाच्या लाभयोगामुळे चारचौघांत समयसूचकतेची चुणूक दाखवाल. यामुळे नोकरी-व्यवसायात वरिष्ठांवर आपली छाप पडेल. व्यवसायवृद्धी होईल. हितशत्रूंवर मात कराल. सहकारी वर्ग मदतीचा हात पुढे करेल. जोडीदाराला भावनिक व वैचारिक साथसोबत कराल. त्याचा आत्मविश्वास वाढवाल. कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी थोडी धावपळ करावी लागेल. इतरांना मदत करताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. फुप्फुसांचे आरोग्य जपा.

कुंभ चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे जोम व उत्साह वाढेल. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपले मत ठामपणे मांडाल. नोकरी-व्यवसात वरिष्ठांवर थोडा दबाव आणाल. सहकारी वर्ग आपल्या विचारांना पाठबळ देतील. काहीजण मात्र विरोधात उभे राहतील. ज्येष्ठ जाणकारांची मदत मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. जोडीदार घरासाठी विशेष योगदान देईल. नातेसंबंध जपेल. आरोग्याची चिंता नसावी. आजार विकारांवर योग्य औषधोपचार मिळेल.

मीन गुरू-रवीच्या समसप्तम योगामुळे हातून धार्मिक काय्रे घडतील. दानधर्म कराल. गरजूंना मदत कराल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. उच्च शिक्षणात प्रगती होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ मदत करतील. ज्येष्ठ सहकारी कर्मचारी मोलाचा सल्ला देतील. जोडीदारासह वैचारिक तफावत जाणवेल. तूर्तास तरी सविस्तर चर्चा टाळणे बरे! कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2019 1:01 am

Web Title: astrology 7th june to 13th june 2019
Next Stories
1 राशिभविष्य : दि. ३१ मे ते ६ जून २०१९
2 राशिभविष्य : दि. २४ ते ३० मे २०१९
3 राशिभविष्य : दि. १७ ते २३ मे २०१९
Just Now!
X