19 February 2019

News Flash

दि. ८ ते १४ सप्टेंबर २०१७

आठवडय़ाचे ग्रहमान तुम्हाला स्वयंसिद्ध बनवणारे आहे.

राशिचक्र

मेष आठवडय़ाचे ग्रहमान तुम्हाला स्वयंसिद्ध बनवणारे आहे. व्यापार-उद्योगात प्रत्येक काम लवकर झाले पाहिजे असा तुमचा उद्देश असेल. नोकरीमध्ये जबाबदारीची वेळ आली की वरिष्ठांना तुमची आठवण येईल, पण श्रेय द्यायला विसरतील. नोकरीमध्ये पूर्वी आश्वासन दिलेल्या सुखसुविधा मिळू शकतील. घरामधल्या गुंतागुंतीच्या प्रश्नावर तोडगा निघेल. घरात लांबलेले शुभकार्य ठरेल. तरुणांचे दोनाचे चार हात होतील.

वृषभ ग्रहमान असे सुचवते की, तुम्हाला तुमच्या कष्टांच्या प्रमाणामध्ये यश मिळेल. व्यापार-उद्योगात कामगारांचे प्रश्न आणि कायदेशीर बाजू दोन्ही नीट सांभाळा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य माना. नोकरदार व्यक्तींनी त्यांचे काम निगुतीने करावे. विनाकारण बदल करू नये. व्यापार-उद्योगातील स्पर्धा तीव्र होईल. चालू असलेले काम बंद होण्याची शक्यता आहे.  घरामध्ये थोडासा तणाव राहील. घरातील मोठय़ा व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला अपेक्षित आणि अनपेक्षित विरोधाला तोंड द्यावे लागेल.

मिथुन ग्रहमान संमिश्र आहे. तुमचा कामाचा वेग वाढेल. पण त्याच वेळी घरामधल्या जुन्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल. व्यापार-उद्योगात नवीन पद्धतीचे काम सुरू झाले असेल तर त्याला चांगला वेग येईल. नोकरीमध्ये तुम्ही भरपूर काम कराल;  वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करायला विसरू नका. घरामधल्या मोठय़ा व्यक्तींची मने सांभाळावी लागतील. तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारचे चतन्य निर्माण होईल. ज्या गोष्टी नशिबावर अवलंबून होत्या, त्याला चांगली गती मिळेल.

कर्क व्यापार-उद्योगात जे काम तुम्ही पूर्वी केले होते त्याचा तुम्हाला आíथक आणि इतर दृष्टीने उपयोग होईल. नोकरीमध्ये संस्थेकडून मिळणाऱ्या प्रत्येक सवलतीचा तुम्ही फायदा घ्याल. काहींना परदेशी जाता येईल. घरामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण असेल. गुरू तुम्हाला सौख्यकारक ठरेल. पण आळस करून चालणार नाही. नोकरदार व्यक्तींनी विनाकारण बदल केले नाही तर त्यांना थोडेसे स्वास्थ्य अनुभवता येईल.  घरामध्ये मंगलकार्य ठरेल/ पार पडेल.

सिंह दोन आघाडय़ांवर वेगवेगळे अनुभव देणारे हे ग्रहमान आहे. करियर किंवा व्यवसायामध्ये भरपूर काम करण्याची तुमची इच्छा असेल, पण तांत्रिक अडथळ्यांमुळे ते शक्य होणार नाही. व्यापारामध्ये जुनी देणी वेळेत देऊन टाका. नोकरीच्या ठिकाणी अधिकारांचा योग्य कारणाकरिता वापर करा. घरामध्ये मौजमजा आणि जबाबदाऱ्या या दोन्हीचा समन्वय साधावा लागेल. व्यापारामध्ये विस्तार होईल.

कन्या ग्रहमान असे सुचविते की तुम्ही तुमच्या मर्यादेत राहून काम केलेत तर सर्व काही मनाप्रमाणे होईल. व्यापार-उद्योगात पशाकरिता सरकारी नियम मोडू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा एखादा निर्णय तुम्हाला आवडणार नाही.   या आठवडय़ात गुरू राशीबदल करून धनस्थानात येईल. तेथे तो एक वर्षांहून अधिक काळ राहील. हा संपूर्ण कालावधी तुम्हाला सौख्यकारक ठरणार आहे. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कष्टातून चांगली धनप्राप्ती होईल. नोकरीमध्ये जादा पगारवाढ किंवा भत्ते मिळतील.

तूळ जे काम तुम्हाला करायचे आहे त्यामध्ये जरी अडथळे आले तरी तुम्ही ते पार पाडाल. व्यापार-उद्योगात जुन्या कामातून एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. धनप्राप्ती चांगली होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढल्याने तुमची कॉलर ताठ राहील. घरामध्ये नवीन हितसंबंध निर्माण होतील. दरम्यान तुमची गरसोय कमी करणारी परिस्थिती निर्माण होईल. व्यापार-उद्योगात लांबलेली कामे हाती गती घेतील.  घरामध्ये मंगलकार्य ठरून ते पार पडेल.

वृश्चिक सर्व ग्रहमान तुम्हाला अनुकूल आहेत. मनात आलेली इच्छा तुम्ही पूर्ण कराल. व्यापार-उद्योगात  कायद्याचा भंग करू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही निर्णय कार्यान्वित करू नका. घरामध्ये छोटे-मोठे तात्त्विक भेद  होतील. त्याचा जास्त विचार करू नका. तुमच्या जबाबदाऱ्या वाढवणार आहे. व्यापार-उद्योगात कष्ट जास्त आणि त्यामानाने कमाई कमी होण्याची शक्यता आहे.  घरामध्ये अनपेक्षित खर्च वाढतील.

धनू ग्रह अनुकूल असल्यामुळे स्वत:ची प्रत्येक इच्छा पूर्ण करून घ्याल. व्यापार-उद्योगातील सरकारी आणि कोर्ट व्यवहार मागे लागतील. उत्पन्न वाढण्याची तुम्हाला खात्री वाटेल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामामध्ये वरिष्ठांनी तुम्हाला कमी लेखले होते, त्यामध्ये तुम्ही उत्तम काम करून दाखवाल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या गरजांना प्राधान्य द्यावे लागेल. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. घरामध्ये लांबलेला सोहळा पार पडेल.

मकर एक चांगले तर एक वाईट तुमच्या वाटय़ाला येईल. व्यापार-उद्योगात कामकाज चांगले होईल, पण खर्च काही कारणाने वाढतील. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादी सवलत देतील. घरामध्ये तुम्हाला जास्त लक्ष घालता येणार नाही. त्यावरून राग-लोभाचे प्रसंग येतील. नोकरीत प्रमोशन, चांगल्या संधीकरिता तुमची निवड होईल. व्यापार-उद्योगातील विस्ताराच्या योजना मार्गी लागतील. घरामध्ये एखाद्या महत्त्वाच्या कामात तुमचा सिंहाचा वाटा राहील. पडेल ते काम करण्याची तुमची तयारी असल्याने सर्वाना तुम्ही हवेहवेसे वाटाल.

कुंभ ज्या व्यक्तींनी पूर्वी तुम्हाला नकारघंटा ऐकवली होती त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल. तुमचा उत्साह वाढेल. व्यापार-उद्योगात ज्या कामाला गती येत नाही ते काम बंद करावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामाकरिता तुमची निवड होण्याची शक्यता आहे. घरामध्ये लांबलेल्या प्रश्नावर तोडगा काढायचे ठरवाल. व्यापार-उद्योगातील कामाचा विस्तार होईल. नोकरीतल्या कामात तुमच्यावर झालेल्या अन्यायाची भरपाई होईल.

मीन उसने अवसान आणून तुम्हाला काम करावे लागेल. व्यापार उद्योगात कामगारांकडून गोडीगुलाबीने काम करून घ्याल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या चांगुलपणाचा गरफायदा घेतील. घरामध्ये प्रियजनांविषयी थोडी चिंता राहील. तुम्हाला शनी अनुकूल असल्यामुळे काळजी करायचे कारण नाही. कोणत्याही कामात बेसावध राहू नका.  नोकरीमध्ये विनाकारण बदल करू नका.  घरामध्ये अनपेक्षित कारणामुळे अडचणी संभवतात.
विजय केळकर : response.lokprabha@expressindia.com

First Published on September 8, 2017 1:01 am

Web Title: astrology 8 to 14 september 2017